लसूण शेव

Lasune Shev


लसूण शेव

साहित्य:-

1 वाटी तेल,
4 चहाचे चमचे तिखट ,अर्धा चमचा हळद,
4 चहाचे चमचे मीठ,
एक लसणाचा गड्डा सोलून बारीक वाटावा,
चार वाटी डाळीचे बारीक दळलेले पीठ (ताजे पीठ घ्यावे)
शेव तळण्याकरिता तेल.

कृती:-

एक वाटी तेल पाणी घालून चांगले एकजीव होईपर्यंत हलवावे .त्यात तिखट ,हळद व मीठ घालावे .वाटलेले लसूण पाण्यात कालवून गाळणीने गाळून घ्यावे . आणि त्यात मिसळावे. आणि डाळीचे पीठ घालून मिश्रण तयार करावे.
पसरट कढईत तेल तापवावे .शेवच्या साच्यामध्ये पीठ भरून शेवचा जवंगा घालावा .व मध्यम आचेवर गॅस करून गुलाबी रंगावर शेव तळावी. अशी ही लसूण शेव तयार आहे.

टीप:-

लसूण असल्याने ओवा घालायची गरज नाही. आणि लसूण घालताना गाळून घेतल्याने ताटलीत लसूण अडकत नाही. सर्वत्र एकसारखा वास लागतो.आणि
ही शेव जरा जाडसरच घालावी. चांगली लागते