क्रिकेटमध्ये वापरल्या जाणाऱ्या विविध इंग्रजी संज्ञांची मराठी नावे(Marathi Names Of Different Terms Used In Cricket)

Marathi Names Of Different Terms Used In Cricket
क्रिकेट प्रसिद्ध मैदानी खेळ

क्रिकेट हा मैदानावर प्रत्येकी ११ खेळाडूंच्या दोन संघांदरम्यान, चेंडू(बाॅल) आणि फळी (बॅट) ने खेळला जाणारा मैदानी खेळ आहे. क्रिकेटच्या मैदानाच्या मध्यभागी एक २२-यार्ड लांबीची मुख्य खेळपट्टी असते. तिच्या दोन्ही टोकांना प्रत्येकी ३ लाकडी यष्टी असतात. एक संघ फलंदाजी संघ म्हणून खेळतो. हा संघ जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करतो, आणि त्यांचा प्रतिस्पर्धी संघ क्षेत्ररक्षण करतो. खेळाच्या प्रत्येक टप्प्याला डाव असे म्हणतात. संघाचे दहा फलंदाज बाद झाल्यानंतर किंवा निर्धारित षटके पूर्ण झाल्यानंतर दोन्ही संघ आपापली भूमिका बदलतात. एका किंवा दोन डावांत अतिरिक्त धावा मिळून ज्या संघाची धावसंख्या जास्त असेल तो विजेता संघ म्हणून घोषित होतो.

क्रिकेट


सर्वोच्च संघटना आयसीसी

उपनाव द जंटलमन्स गेम ("The Gentleman's game")

सुरवात १८ वे शतक

माहिती
संघ सदस्य ११ खेळाडू

संघागणिक बदली खेळाडू केवळ जखमी किंवा आजारी खेळाडूसाठी

वेगळ्या स्पर्धा
वर्गीकरण
सांघिक, चेंडूफळी

साधन

क्रिकेट चेंडू, क्रिकेट बॅट, यष्टी
मैदान क्रिकेट मैदान

ऑलिंपिक
१९०० उन्हाळी ऑलिंपिक केवळ


प्रत्येक सामन्याच्या सुरुवातीला, दोन फलंदाज आणि अकरा क्षेत्ररक्षक खेळाच्या मैदानात उतरतात. क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघातील गोलंदाज खेळपट्टीच्या एका टोकापासून, दुसऱ्या टोकाला असलेल्या फलंदाजाकडे (या फलंदाजाला स्ट्रायकर म्हणतात.)

जेव्हा चेंडू फेकतो, तेव्हा खेळाला सुरवात होते. स्ट्रायकर खेळपट्टीवर यष्टीसमोर चार फुटांवर क्रीजमध्ये उभा राहतो. बॅटचा वापर करून चेंडू यष्ट्यांवर आदळण्यापूर्वी अडवणे आणि धावा करता येण्याइतपत टोलवणे ही फलंदाजाची भूमिका असते. दुसरा फलंदाज (नॉन-स्ट्रायकर), खेळपट्टीच्या दुसऱ्या टोकाला गोलंदाजाजवळ क्रीजच्या आतमध्ये उभा राहतो. बाद झालेल्या फलंदाजाला मैदान सोडावे लागते, आणि त्याच्या संघातील दुसरा खेळाडू त्याची जागा घेतो. फलंदाजाला धावा करू न देणे आणि त्याला बाद करणे ही गोलंदाजाची उद्दिष्ट्ये असतात. एकाच गोलंदाजाने एका मागोमाग एक सहा वेळा चेंडूफेक केल्यानंतर चेंडूफेकीचे एक षटक पूर्ण होते. त्यानंतरचे षटक दुसरा गोलंदाज, खेळपट्टीच्या दुसऱ्या बाजूने टाकतो.

*फलंदाज बाद होण्याच्या सामान्य पद्धती*

त्रिफळाचीत : गोलंदाजाने फेकलेला चेंडू थेट यष्ट्यांवर जाऊन आदळला की फलंदाज त्रिफळाचीत होतो..

पायचीत : जेव्हा फलंदाज बॅटऐवजी स्वतःच्या शरीराच्या कोणत्याही अवयवाचा वापर करून चेंडू यष्ट्यांवर आदळण्यापासून रोखतो, तेव्हा तो पायचीत होतो.

झेलबाद : जेव्हा फलंदाजाने टोलविलेला चेंडू हवेत उडून जमिनीवर पडण्याआधी क्षेत्ररक्षक झेलतो, तेव्हा फलंदाज झेलबाद होतो.

धावचीत : फलंदाज क्रीजच्या बाहेर असताना क्षेत्ररक्षकाने चेंडू पकडला आणि तो यष्ट्यांवर मारण्यात यश मिळविले तर फलंदाज बाद होतो ह्याला धावचीत असे म्हणतात.

*धावा मिळवण्याच्या पद्धती*

धावा दोन प्रकारे जमविल्या जातात:

चेंडू पुरेशा ताकदीने टोलवून सीमारेषेपार करून किंवा क्षेत्ररक्षकाने चेंडू अडवून यष्टीच्या दिशेने फेकण्याआधी दोन्ही फलंदाजांनी एकाचवेळी धावून आपल्या जागेवरून खेळपट्टीच्या दुसऱ्या टोकाला पोहोचून.

फलंदाज क्रिजमध्ये पोहोचण्याआधी क्षेत्ररक्षकाने चेंडू पकडला आणि यष्ट्यांवर मारण्यात यश मिळविले तर फलंदाज बाद होतो (ह्याला धावचीत असे म्हणतात).

मैदानावर निर्णय देण्याची भूमिका दोन पंच पार पाडतात.


*************************************************

क्रिकेट खेळातून मराठी हद्दपार…?


*गोलंदाजी मध्ये वापरले जाणारे शब्द*

‘जमिनीला सरपटत जाणारा चेंडू'(ground the ball)

‘डाव्या एस्टीला सोडून जाणारा चेंडू'( wide to leg stump)

पंचांच्या वरच्या दिशेने…(over the wicket)

पंचास वळसा घालून….(round the wicket)

डावखुरा गोलंदाज (left handed bowler)

*फलंदाजी करताना वापरले जाणारा शब्द*

उत्तुंग षटकार ( maximum six)

सिमरेषे जवळ ( near the boundarie)

अप्रतिम झेल ( amazing catch)

यस्टीरक्षक ( wicketkeeper)

फलंदाज (batst man)

गोलंदाज ( bowler)

क्षेत्र रक्षक ( fielder)

डावाची सुरवात ( opening the match)

फलंदाजांचे पद लालित्य ( footwork)

बळी ( wicket)…..

अशा एक ना अनेक मराठी शब्दांनी क्रिकेट या मूळ इंग्रजांच्या खेळास मराठी समालोचनाने त्या काळी या खेळास महाराष्ट्रात घराघरात पोहचवले होते.
कानाला रेडिओ लावून ‘बाळ करमरकर’यांचं धावत वर्णन ऐकून अनेकांना क्रिकेट बऱ्या पैकी समजले. आज क्रिकेट च्या बाजरीकरणात मराठी समालोचन हद्दपार झालं….