वाढदिवसाच्या शुभेच्छा - तुझं व्यक्तिमत्व असंच बहरत राहो.

मराठीमध्ये शुभेच्छा

वाढदिवसाच्या शुभेच्छा

 १) तुझ्या कर्तृत्वाची वेल एवढी बहरलेली...

जीवनाची प्रत्येक फांदी तेवढीच मोहरलेली...

तुझं व्यक्तिमत्व असंच दिवसेंदिवस खुलणारं...

प्रत्येक वाढदिवशी नवक्षितिज शोधणारं.

वाढदिवसाच्या अनंत कोटी शुभेच्छा.


२) आनंदाचे दीप उजळू दे सदैव अपुल्या घरी....

तनामनातून बरसत राहो आनंदाच्या सरी.....

न पडो आपणास कदापिही उणे....

हेच परमेश्वराकडे एकमेव मागणे.

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

सौ.रेखा देशमुख