मराठी शुभेच्छा- उखाणे

मराठी शुभेच्छा-उखाणे
मराठी शुभेच्छा - उखाणे
(सौ.रेखा देशमुख)

१) खांडेकरांचे ग्रंथ, कुसुमाग्रजांच्या कविता...
----रावांचे नाव घेते तुमच्या आग्रहाकरिता.

२) कन्वमुनींचा आश्रम शकुंतलेचे माहेर....
   -----रावांनी दिला मला सौभाग्याचा आहेर.

३) शंकराची पार्वती, वशिष्ठांची अरुंधती....
तशीच मी------रावांची अखंड सौभाग्यवती.

४) गरम गरम खिचडी मध्ये साजूक तूप....
------ राव गेले गावाला. हरपली माझी भूक.

५) नवीन वर्षाचा शुभारंभ करीत येतो पाडवा...
-------रावांच्या सहवासात राहो सदैव गोडवा.

६) काम असेल कठीण , नसते कधी अशक्य. पूर्णविरामानंतर संपते पूर्ण वाक्य. म्हणूनच-------राव म्हणतात, नशिबाला दोष देत संधी गमावू नको, काटेरी मार्ग असेल पण ध्येय कधी सोडू नको.

७) झाडे लावा- वृक्ष जगवा. हाच उपाय आहे पर्यावरण वाचवण्यासाठी----- राव नेहमीच म्हणतात, तू आणि मी जन्मलोच एकमेकांसाठी.

८) दानात दान रक्तदान....
---------रावांचे नाव घेऊन राखते तुमचा मान.

९) स्निग्धता घ्यावी तिळापासून, गोडी घ्यावी गुळापासून....
---------रावांचे नाव घेते आशीर्वाद द्या मनापासून.

१०) देवघरातील देव्हाऱ्यात नंदादीप सुख समाधानाचा....
------रावांचे नाव घेऊन राखते मान तुमचा.

            
"सत्यनारायण पूजेला"

१) सत्यनारायणाच्या पूजेला प्रसाद शिऱ्याचा...
--------रावांचे नाव घेऊन राखते मान तुमचा.

   "गृहप्रवेश करताना"

१) डोक्यावर तुळस घेऊन...
--------रावांसोबत गृहप्रवेश केला...
वास्तू देवतेला नमस्कार करून....
सुखाचे दान मागितले त्याला.

     " मित्रमंडळींसमोर"

आम्रमंजिरी दरवळली सुटला सुंदर सुवास...
--------रावांचे नाव घेते मित्रमंडळींसमोर खास.

सौ. रेखा देशमुख