आपल्या देशाचे महान शास्त्रज्ञ सी. व्ही. रामन यांच्या महान शोधाच्या स्मरणार्थ २८ फेब्रुवारी हा दिवस 'राष्ट्रीय विज्ञान दिवस' म्हणून साजरा केला जातो . तेव्हा सर्वप्रथम
राष्ट्रीय विज्ञान दिवसाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा.
विज्ञान म्हणजे विशेष असे ज्ञान. स्वयंपाक घर म्हणजे छोटीशी विज्ञान प्रयोगशाळाचं. दुधाला विरजण लावल्यानंतर त्याचे दही होणे. कडधान्यांना मोड आणणे. पीठ आंबवणे. पाणी उकळून त्याची वाफ होणे व त्याच पाण्याचा फ्रीजमध्ये बर्फ होणे. पालेभाजी शिजली की ती आकुंचन पावते. आणि डाळ, दाणे भिजवले की फुगतात म्हणजेच प्रसरण पावतात. या सर्व कृती विज्ञानाशी संबंधित आहेत. पुन्हा एकदा राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या खूप खूप शुभेच्छा.