"अगं ..प्रिया उठ लवकर ऑफिसला जायला उशीर होतो ना "आई म्हणाली.
"आई पाच मिनिट थांब ना ग ऑफिस मध्ये बसून बसून कंटाळा येतो ग मार्च एंडिंग चा लोड पण आहे "प्रिया म्हणाली.
"उद्या लग्न झाल्यावर तुला एवढा वेळ झोपायला मिळणार नाहीये .तुझ्या सासूंनी अधिक सांगितले घर आणि नोकरी दोन्ही सांभाळायला पाहिजे" प्रियाची आई म्हणाली.
"काय ग आई तु पण ना".. प्रिया म्हणाली.
"अगं तुझे लग्न झाले की ,मार्च एडिंग वगैरे काही चालणार नाही बघ" आई म्हणाली.
नुकतेच प्रियाचे लग्न ठरले होते .सासरची माणसं तशी साध्या पद्धतीची होती . अगदी जुन्या वळणाची होती. सासू तशी प्रेमळ होती. पण त्यांचे वय झाल्यामुळे सासूला घरातील काम करणे जमत नव्हते. तिचे गुडघे देखील दुखत होते . प्रियाला जेव्हा लग्नासाठी पाहायला आले होते.तेव्हा सासूने सांगितले होते की ,तुला नोकरी करायचे असेल तर तुला एक चौकट सांभाळता आली पाहिजे. घर आणि नोकरी दोन्हीही सांभाळावे लागेल. माझे गुडघे खूप दुखतात. त्यामुळे मला काम करता येणार नाही .तू घरातील सर्व जबाबदारी पूर्ण करायला पाहिजे . प्रियाने होकार दिला होता कारण प्रियाला अभी खूप आवडला होता
अभि दिसायला देखणा होता. अगदी हिरो सारखा होता. म्हणून प्रियाने काहीही न बोलता सासुबाईं जे सांगतील ते मान्य करत होती. आणि मग प्रिया लग्नाला तयार होते. लग्न झाल्यानंतर थोड्याच दिवसात प्रिया घर आणि ऑफिस अगदी योग्य पद्धतीने सांभाळत होती. एखाद्या दिवशी जर ऑफिसचे काम लोड असेल तर मात्र यायला उशीर होत होता. त्यावेळी सासू फार चिडचिड करत होत्या. एकेएकदा प्रियाला खूप वैताग येत होता .कारण आँफिसमध्ये मिटींग असेल तर नेमके घरी पाहुणे येत होते.
प्रियाच्या सासूला अचानकच पॅलेसिसचा अटॅक आला. सासूला दवाखान्यात ऍडमिट करावे लागले होते. प्रिया रोज सकाळी लवकर उठून सासूला हॉस्पिटलमध्ये डबा करून देत होती. आणि अभिला देखील डबा बांधून देत होती. हळूहळू तिच्या कामाचा लोड वाढत होता.
अभिने प्रियाला सांगितले की ,तुला घर आणि ऑफिस सांभाळायचं होत नसेल तर तू तुझा जॉब बंद करून फक्त घर काम कर ?पण प्रिया तशी तयार झाली नाही.ती म्हणाली. मी ऑफिस ही सांभाळेन आणि घर अगदी व्यवस्थित सांभाळेल.
अलीकडे सासूबाईंचा त्रास खूप वाढला होता. सासूबाईंच्या जेवणापर्यंत प्रियाला ऑफिसमधून येणे जमत नव्हते. आँफिसचे काम खूप लोड होते .पण सासूबाई समजावून घेत नव्हत्या. ऑफिस आणि घर सांभाळळायचे म्हणजे प्रियाची खूप दगदग होऊ लागली. स्वतःकडे लक्ष देण्यासाठी सुध्दा वेळ नव्हता . सासूबाईंना काही खाण्यापिण्यात थोडे देखील पुढे मागे झाले तरी चालत नव्हते. त्या लगेच हवं नको ते काहीतरी बोलत होत्या ...ते ऐकून प्रियाला खूप रडू येत होते.
प्रियाच्या आयुष्यात एक प्रकारची चौकट निर्माण झाली होती. एके दिवशी माहेरी जाऊन आईला भेटावे म्हटले तरी तिला जमत नव्हते .कारण सासूबाई आजारी असल्यामुळे त्यांची सेवा करावी लागत होती. आणि इतर वेळी तर ऑफिसचे काम होते .घर ते ऑफिस ते घर नुसता चौकोनात अडकल्यासारखे झाले होते .पण प्रियाने पण आपल्याला कितीही त्रास होऊ दे. तीने आपली चौकट कधीही सोडली नाही. अगदी योग्य पद्धतीने घर आणि ऑफिस सांभाळून संसार केली.आणि आपला सासूबाईंचे मन जिंकली.