भाषा परिणामकारक व प्रभावी होण्यासाठी तसेच आकर्षक वाटण्यासाठी आपण अलंकारिक शब्द वापरतो. ज्या शब्दांमुळे भाषेला सौंदर्य प्राप्त होते भाषा प्रभावी होते त्या गुणधर्मयुक्त शब्दांना भाषेचे अलंकार असे म्हणतात.
भाषेच्या अलंकाराचे दोन प्रकार आहेत.
१. शब्द अलंकार
२. अर्थ अलंकार.
शब्द अलंकार
शब्दाच्या माध्यमातून साम्य किंवा विरोध दाखवून तर कधी नाद निर्माण करून जे शब्द भाषेत सौंदर्य निर्माण करतात त्यास शब्द अलंकार असे म्हणतात.
शब्द अलंकाराचे तीन प्रकार आहेत.
१. अनुप्रास अलंकार.
२. यमक अलंकार.
३. श्लेष अलंकार.
१.अनुप्रास अलंकार.
एखाद्या वाक्यात किंवा कवितेच्या चरणात एकाच अक्षराची पुनरावृत्ती होऊन त्यातील नादामुळे जेव्हा त्याला सौंदर्य प्राप्त होते त्यास अनुप्रास अलंकार असे म्हणतात.
उदा. रजतनील, ताम्रनील
स्थिर पल जल, पल सलील
हिरव्या तटि नावांचा कृष्णमेघ खेळे.
स्थिर पल जल, पल सलील
हिरव्या तटि नावांचा कृष्णमेघ खेळे.
वरील उदाहरणात ल अक्षराची पुनरावृत्ती होऊन नाद निर्माण झाला आहे.
२. गडद निळे गडद निळे जलद भरुनी आले
शितलतनु चपलचरण अनिलगण निघाले.
शितलतनु चपलचरण अनिलगण निघाले.
३. बालिश बहु बायकात बडबडला.
२. यमक अलंकार
कवितेच्या चरणाच्या शेवटी, मध्ये, किंवा ठराविक ठिकाणी एक किंवा अनेक अक्षरे वेगळ्या अर्थाने आल्यास तेथे यमक अलंकार होतो.
उदा. सुसंगती सदा घडो,
सुजन वाक्य कानी पडो |
कलंक मतिचा झडो,
विषय सर्वथा नावडो|
सुजन वाक्य कानी पडो |
कलंक मतिचा झडो,
विषय सर्वथा नावडो|
वरील उदाहरणात डो अक्षराची पुनरावृत्ती झालेली आहे.
२. कडीस जोडोनी दुज्या कडीला
मनुष्य बनवीतसे साखळीला.
मनुष्य बनवीतसे साखळीला.
३. नाचे दरी डोंगरात झिम्मा खेळतो नदीशी
रिमझिम पहाळीचं गाणं बोलतो झाडांशी.
रिमझिम पहाळीचं गाणं बोलतो झाडांशी.
३.श्लेष अलंकार
एकच शब्द वाक्यात दोनदा दोन वेगळ्या अर्थाने वापरल्यामुळे जी शब्द चमत्कृती साधली जाते त्या श्लेष अलंकार असे म्हणतात.
उदा.१. अमर्याद मित्रा तुझी थोरवी.
वरील वाक्यात मित्र म्हणजे सखा किंवा जिवलग दोस्त. तसेच मित्र हे सूर्याचही एक नाव आहे.
२. श्रीकृष्ण नवरा मी नवरी
शिशुपाल नवरा मी न वरी.
शिशुपाल नवरा मी न वरी.
वरील उदाहरण हे श्लेष अलंकाराचे असून यामध्ये रुक्मिणी म्हणते की जर श्रीकृष्ण माझे पती होणार असतील तर मी त्यांना वरमाला घालेन परंतु जर शिशुपालांच्या हाती वरमाला असेल तर मी त्यांना कधीही वरणार नाही.
अर्थ अलंकार.
जेव्हा शब्दाच्या वेगवेगळ्या अर्थांमुळे भाषेचे सौंदर्य अधिक खुलून दिसते त्याला अर्थ अलंकार म्हणतात.
अर्थ अलंकाराचे खालील प्रकार आहेत.
१. उपमा अलंकार.
२. उत्प्रेक्षा अलंकार.
३. रूपक अलंकार.
४. व्यतिरेक अलंकार.
५. दृष्टांत अलंकार.
६. चेतनागुणोक्ती अलंकार
२. उत्प्रेक्षा अलंकार.
३. रूपक अलंकार.
४. व्यतिरेक अलंकार.
५. दृष्टांत अलंकार.
६. चेतनागुणोक्ती अलंकार
दोन सुंदर वस्तूंमधील साम्य दर्शवून पद्यामध्ये अर्थ चमक कृती आणली जाते तेथे अर्थालंकार होतो. बहुतेक अर्थालंकार अशा साम्यावर आधारित असतात. त्यात चार गोष्टी महत्त्वाच्या असतात.
उपमेय, उपमान, साम्यवाचक शब्द आणि समानधर्म.
उदा. हा आंबा साखरेसारखा गोड आहे.
उपमेय - आंबा
उपमान - साखर
साम्यवाचक शब्द - सारखा
समानधर्म - गोडी
उपमान - साखर
साम्यवाचक शब्द - सारखा
समानधर्म - गोडी
उपमेय म्हणजे ज्याची तुलना करायची आहे ते.
उपमान म्हणजे ज्याच्याशी तुलना करायची ते.
साम्यवाचक म्हणजे सारखेपणा दाखवणारा शब्द.
समानधर्म म्हणजे दोन वस्तूंमध्ये असलेला सारखेपणा, ज्या शब्दाने दाखवला जातो त्याला समान धर्म असे म्हणतात. उपमेय आणि उपमान यामधील साम्य दर्शवणाऱ्या गुणधर्माला समान धर्म असे म्हणतात.
उपमा अलंकार
उपमेय हे उपमानासारखेच आहे असे जिथे वर्णन असते तिथे उपमा अलंकार होतो.
उपमा अलंकारात सम, समान, सारखे, वाणी, जसे, तसे, प्रमाण, सदृश, परी, तुल्य यापैकी एखादा साधर्म्य सूचक शब्द असतो.
दोन वस्तूंमधील साधर्म दाखवल्याशिवाय उपमा अलंकार होत नाही.
उदा.
१.आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे.
१.आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे.
२. सावळाच रंग तुझा पावसाळि नभापरी!
३. असेल तिथे वाहत, सुंदर दुधासारखी नदी.
परी हा साम्यवाचक शब्द इथे आलेला आहे आणि पावसाळी नभ जे काळ्या रंगाचे असतात आणि सावळा रंग या दोघांचा सारखेपणा इथे सुंदररित्या वर्णन केलेला आहे.
उत्प्रेक्षा अलंकार
उत्प्रेक्षा म्हणजेच कल्पना. उपमेय हे जणू उपमानच आहे असे जेथे वर्णन असते तिथे उत्प्रेक्षा हा अलंकार होतो. उत्प्रेक्षा अलंकारात जणू, जणू काही, जणू काय, की, गमे, वाटे, भासे, म्हणजे यापैकी एखादा साधर्म्य सूचक शब्द असतो.
उदा.
१. त्याचे अक्षर जणू काय मोतीच!
१. त्याचे अक्षर जणू काय मोतीच!
२. ती गुलाबी उषा म्हणजे परमेश्वराचे प्रेम जणू.
३. किती माझा कोंबडा मजेदार |
मान त्याची किती बाकदार ||
शिरोभागी तांबडा तुरा हाले |
जणू जास्वंदी फुल उमललेले ||
अर्धपायी पांढरीशी विजार |
गमे विहंगातील बडा फौजदार ||
मान त्याची किती बाकदार ||
शिरोभागी तांबडा तुरा हाले |
जणू जास्वंदी फुल उमललेले ||
अर्धपायी पांढरीशी विजार |
गमे विहंगातील बडा फौजदार ||
रूपक अलंकार
जेव्हा वाक्यात उपमेय व उपमान यांच्यातील साम्यामुळे दोन्ही गोष्टी अभिन्न म्हणजेच एकरूप दर्शविल्या जातात तेव्हा रूपक अलंकार होतो. रूपक अलंकाराचे वैशिष्ट्य म्हणजे उपमेय हेच उपमान असते. उपमेय व उपमान एकरूप असते. या अलंकारात म्हणजे, केवळ, प्रत्यक्ष, साक्षात, मूर्तिमंत इत्यादी साधर्म्य दर्शक शब्दांचा वापर होतो.
उपमेय म्हणजे ज्याला उपमा देतात.
उपमान म्हणजे ज्याची उपमा देतात.
उदा.१. उठ पुरुषोत्तमा | वाट पाहे रमा ||
दावि मुखचंद्रमा | सकळिकांसी ||
दावि मुखचंद्रमा | सकळिकांसी ||
२. नयनकमल हे उघडीत हलके जागी हो जानकी |
३. कुठे बुडाला पलीकडे, तो सोन्याचा गोळा.
४. सारे जग हे एक रंगभूमी आहे.
व्यतिरेक अलंकार
व्यतिरेक म्हणजे अधिक्य किंवा श्रेष्ठत्व.
उपमेय हे एखाद्या गुणाच्या बाबतीत उपमानापेक्षाही श्रेष्ठ असल्याचे वर्णन जीथे असते तीथे व्यतिरेक अलंकार होतो.
व्यतिरेक अलंकारात उपमानाला पंचमी विभक्तीचा उन, हून प्रत्यय लागलेला असतो.
उदा.
१. कृष्ण कुणी काजळाच्या शिखराहुनी
नील कुणी इंद्र मण्याच्या कांतिहुनि
नील कुणी इंद्र मण्याच्या कांतिहुनि
२. सांज खुले सोन्याहूनी
पिवळे हे पडले ऊन
पिवळे हे पडले ऊन
दृष्टांत अलंकार
एखादे तत्व किंवा एखादी कल्पना किंवा एखाद्या विषयाचे वर्णन करून झाल्यावर ती गोष्ट पटवून देण्याकरिता त्याच अर्थाचा एखादा दाखला किंवा उदाहरण दिले जाते तेव्हा दृष्टांत अलंकार होतो.
या अलंकाराची वैशिष्ट्ये म्हणजे एखादी गोष्ट पटवून देणे आणि ती पटवून देण्यासाठी समर्पक उदाहरणाचा वापर करणे.
उदा.
१. लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा ऐरावत रत्न थोर त्यासी अंकुशाचा मार.
२. न कळता पद अग्नीवर पडे |
न करिता दाह असे न कधी घडे ||
अजित नाम वदो भलत्या मिसे |
सकल पातक भस्म करीतसे ||
न करिता दाह असे न कधी घडे ||
अजित नाम वदो भलत्या मिसे |
सकल पातक भस्म करीतसे ||
चेतनागुणोक्ती अलंकार
निसर्गातील निर्जीव वस्तू सजीव आहेत अशी कल्पना करून त्या मनुष्याप्रमाणे वागतात किंवा कृती करतात असे जिथे वर्णन असते तिथे चेतनागुणोक्ती अलंकार होतो.
या अलंकाराची वैशिष्ट्य म्हणजे अचेतन वस्तूंना सचेतन बनवले जाते आणि त्या वस्तू सजीव प्राण्यांप्रमाणे किंवा माणसांप्रमाणे वागतात.
उदा.
१. मंगल मंगल गीत म्हणे,
अस्फुट रजनी मूकपणे.
१. मंगल मंगल गीत म्हणे,
अस्फुट रजनी मूकपणे.
२. "नित्याचेच दुःख होते उशागती बसलेले
……..तोच अवचित आले
सुख ठोठावित दार.
……..तोच अवचित आले
सुख ठोठावित दार.
३. कुटुंब वत्सल इथे फणस हा | कटी खांद्यावर घेऊन बाळे.
४. ती पहा सर्वात मागे आपली मान उंचावून पाहणारी टेकडी, तिच्या पाया जवळून उड्या मारीत व गात जाणारा तो झरा, त्याच्या दोन्ही हाताला पसरलेली हसणारी व वाऱ्याने डुलणारी शेते, सायंकाळच्या अशा प्रशांत वातावरणात तिथे ध्यानस्थ बसलेली एकच एक झोपडी व तिच्यावर आपल्या मायेचे छत्र धरून उभा असलेला वृक्ष.
©® राखी भावसार भांडेकर नागपूर