मरण यातना भाग 2

Maran


भाग 2...?


रमा आता कोणाशी ही लग्न करायला तयार करत होती मनाला ,आणि जे होईल जसे होईल ,जे नशिबात लिहिले असेल तसे जगू, फार झाले तर त्रास सहन करून जगू पण आईला दुखावले तर तिला शांती नाही लाभणार...मी लढणार..काही चांगले दिवस ही असतील माझ्या नशिबी त्याची वाट ही मी बघणार...पण मला ह्या घराच्या आश्रयातून बाहेर पडायचे आहे... जीव गुदमरतो इथे....आता हा त्रास नाही सहन होत..

रमा, "काकू मला तुम्ही आणला ते स्थळ मंजूर असेल "

काकू.."बाई ग तुला तुझी पसंती कोणी विचारली का ,मग तू येऊन सांगण्याची हिम्मत कशी करतेस ,चल हो चालती.. आली मोठी "

रमा रडत बाहेर पडली...

तिकडून कोणी तरी एक घरंदाज बाई रमला आडवी गेली ,गाडीतून आली आणि रडणाऱ्या रमाला बघून नीट आत घुसली...

आहे का कोणी घरात...अग शांती कुठे आहेस ग तू....आलेली बाई

शांती काकू हात पुसत बाहेर आली ,आणि आलेल्या बाईच्या तोंडाकडे बघत राहिली, कळेना कोण ही..ओळख नसलेली ही कोण म्हणावे

शांती... कोण हो तुम्ही बाई

अग ओळखलं नाहीस का तू मला... बाई

शांती... ओळखले नाही म्हणून विचारते ना मग ओळख सांगा जरा

बाई... मी तुझ्या बहिणीची चुलत नणंद हाय ना..

शांती... अगो बाई ,विमला का तू ,म्हणजे तुम्ही..

बाई... आहे म्हणजे ओळख म्हणायची आमची

शांती... मग मग, कशी विसरू बरं तुम्हाला मी..बरं कसं काय येणं केलं तुम्ही बाई

बाई....माझं जरा काम होत ग तुझ्याकडे शांती ,तुला तर माहीत आहेच ,नसेल तर सांगते तुला ,माझा मुलगा ,त्याच लग्न व्हायचं आहे...मुलगी पाहिजे ...कोणी असेल तर सांग मला

शांती... हम्मम्म ताकाला आलात आणि भांड लपवताय काय तुम्ही बाई...माहीत आहे तुम्हाला चांगलंच की मुलगी आहे आमच्या कडे..हम्मम्म

बाई जरा ,बसत , सोफ्यावरची धूळ झटकत ,मूळ मुद्यावर येते ,आता आवाज खाली असतो..थोडं खकरून ,हळूच विषय काढत..

बाई...आहे माहीत ग, म्हणूनच तर आले ह्या तुझ्या घरी ,पाय घासत..

शांती.... तरीच कधी न वळलेले लोक कसे आले गरीबा घरी

बाई... नाही ग असे नाही ,वेळ आली की जिथे जाणे लिहिले आहे तिथे जावे लागते ,आपण ठरवून ही कुठे जाणे होत नाही ,पण आता नाते जोडायचे आहे म्हणून यावे लागते ना...तू ही कधी आली नाहीस माझ्या घरी..पण असो मला माझ्या मुलासाठी तुझी पुतणी हवी आहे..

काकू जरा भाव खात होती ,घरी आलेली तिच्या नात्यातली कधी काळी श्रीमंत बाई होती ,नवऱ्याने टाकून दिले होते आणि त्याने दुसऱ्या बाई सोबत लग्न केले होते... आणि हिला वाड्यातून बाहेर काढले होते, ते ही अपंग मुलगा झाला म्हणून...तेव्हा ती श्रीमंत असल्याचा तिला खूप गर्व होता, आणि बऱ्याचदा ती गरीब असलेल्या कोण्या ही नातेवाईकांसोबत बोलत नसत...आणि आज ती श्रीमंती गेली ,मुलगा ही अपंग...आणि त्याच्या काळजीत ती इथे रमाचा हात मागायला म्हणून आली होती...म्हणजे रमाला आई वडील नाही ,तिचे मागे पुढे बघणारे कोणी नाही...त्यात काकुला लालूच दाखवली की ती रमाचा हात आपल्या अपंग मुलाच्या हातात देईल...फक्त काही पैसे दिले की पोरगी आपली..

काकू..... फुकट नाही देणार मी ही पोरगी तुला

बाई...मागशील ते देईल त्या बदल्यात

काकू....2 लाख द्यावे लागतील...

बाई....दिलेच समज मग, पण परत काही मिळणार नाही..

काकू.... मग नाते पक्के समज...

बाई....मुलगी कुठे ती....मला बघायची आहे

काकू.... तुला ती काळी की गोरी बघायची आहे ...की धडधाकट मुलगी हवी तुझ्या अपंग पोराला सांभाळणारी पाहिजे ते ठरवा..

बाई....धडधाकट, जी त्याचा कसला ही राग सहन करेल...जिला मारले तरी लागणार नाही अशी..

काकू....तुम्ही तर कसाईच आहेत म्हणजे ,मी तिला कधीच असा त्रास नाही बाई दिला बरं, आणि तू ही नाही दिला तर बरं होईल...शेवटी भोग भोगत आहेस तुझ्या कर्माचे...अजून भोग मागे लावून घेऊ नकोस...ती आधीच पोरकी आहे ,आणि तुला जर नकोच तर माझी पुतणी मला जड नाही...समजलं का..लग्न म्हणजेच सगळं काही नाही...तुला तर समजलेच असेल ..


बाई....शांती जास्त बोलू नकोस बरं...

काकू.... मला जरा ही खबर मिळाली की मी तिला घरी घेऊन येईल ,त्यापेक्षा जास्तच झालं तर पोलिसांना ही सांगायला कमी करणार नाही..

इकडे शांती नकळत तिच्या वागण्यावर संशय घेत असतांना रेकॉर्ड करत होती तिचे सगळे बोलणे.. म्हणजे तिला कधी ब्लॅक मेल करता येईल आणि पैसे मागता येतील..

बाई....बरं बाई नाही त्रास देणार तुझ्या पुतणीला, तसे ही मला माहित आहे तू किती काळजीची आहेस ते...तू फुलात ठेवतेस जणू तिला..

शांतीकाकू....मला वाटत तुझ्या मुलाला मुलगी नकोय, जर असे असेल तर जा माघारी...मी नाही देत पोरगी

बाई लगेच दोन लाख रुपये काढून शांती समोर ठेवते आणि लग्नाची तारीख काढायला सांगते..

बाई....किंमत दिली तुला हवी ती ,परत काही ऐकून घेणार नाही

काकू.... ही किंमत माझ्या पुतनीच्या जीवाची नाही...आणि सौदा करायला तिच्यात काही कमी नाही ,तुझ्या मुलामध्ये कमी आहे त्याची ही किंमत देतेस तू...म्हणून तिला काही होता कामा नये हे लक्षात ठेव..

बाई....तारीख ठरवतेस ना

काकू पैसे घेते , पण त्या पैस्याचे ती रमाला दागिने करते...आणि तिला लग्न लावून तिच्या घरी रवाना करायचे ठरवते..

रमाला आलेल्या स्थळाबद्दल कळते, तरी ती काकूंकडे त्या बद्दल काही विचारणा करत नाही..

काकू ला आता रमा घर सोडून जाणार ,आता ती एकटी राहणार ,त्यात काका ही आजारी असतो, त्याचे इलाज कसे होणार ह्याची काळजी सतावत असते... रमा होती तर काही वाही हातभार लागत.. काकुचा काही कारणामुळे,दुखामुळे ती तिचा राग वैताग सहाजिक रमा वर काढत..आणि मग तिचे मनावरचे ओझे हलके करत... आज कोण जाणे ,रमा बद्दल माया दाटून आली होती..रडू येत होते...

रमा आता जाणार ह्या विचाराने गलबलून येत होते... एकच पुतणी ,मुल ही नाही नशिबात तरी तिला सांभाळू शकले नाही...सतत राग राग... भांडण...तिला कधी बरे नाही बघितले आपण.... मग कोणत्या तोंडाने तिच्या तोंडावरून हात फिरवू...असे काकुला वाटू लागले..आता काकूने ठरवले होते तिला दिलेल्या पापाचे प्रायश्चित करायचे...तिला कधी माझी गरज लागली तर कधी ही तिच्या सोबत उभे राहायचे... तिच्यासाठी जीव द्यावा लागला तरी मागे हटायचे नाही...ह्या भोगातून सुटका हवी असेल तर मी हे ही करेन...

काकू,रमाकडे गेली, आणि तिला स्थळाबद्दल सांगितले ,तिच्या डोक्यावरून हात फिरवायची हिम्मत होत नव्हती तरी हिम्मत करून तिच्या डोक्यावरून मायेने हात फिरवला आणि तिला जवळ न घेता हळूनच डोळे पुसत निघत होती, तितक्यात रमाने काकुचा हात पकडून थांबून घेतले आणि तिच्या कुशीत जाऊन खूप रडली..आणि न रहाता आपसूक तिच्या तोंडातून शब्द फुटला ," आई "

पुढे काय होईल रमाच्या आयुष्यात पाहू...लग्नाला होकार देते की ,काकू खुद ह्या स्थळाला नकार देईल..


क्रमशः....?


🎭 Series Post

View all