मरण यातना भाग 1

Maran


मरण यातना...

ऋचा आणि आई बाजरातून घरी परतत होत्या...दोघी आपल्या विचारत होत्या ,आणि मध्ये घराजवळ आल्यावर ,आवाज कसला येत आहे हे जाणून घेण्यासाठी दोघी पुढे गेलेल्या पुन्हा माघारी आल्या...दोघींना ही हा प्रकार जरा नेहमीपेक्षा काही भीतीदायक वाटला... शेजारी असलेल्या त्या घरातील चौकटीतून काही किंचाळण्याचे आवाज येताच त्यात होत्या तिथेच उभ्या राहिल्या...ह्या खालच्या आळीत जास्त रहदारी नसत, इन मीन दोन तीन घरे होती ,त्यात ऋचाचे घर अगदी ह्या घरच्या बाजूला होते, त्यात दगडी जुन्या भिंती आणि मोठं मोठ्या सागाच्या चौकटी असल्याने कधी तरीच ह्या घरातील वाद ,विवाद, भांडणाचे आवाज येत, सगळे मोठ्या वाड्यात रहात असलेले शिक्षित खानदानी लोक होते. पण काळ बदलला तसे जुने लोक गेले आणि इथे नवीन शेजारी रहायला आले होते, जरा पडका झाला होता हा वाडा ,त्याच्या चौकटी कधी ही निखळतील अश्या अवस्थेत होत्या, त्याला जरा जरा चिरा पडल्या असल्याने ,आधीचे मालक यांनी हा वाडा विकण्याचे ठरवले आणि येईल त्या किमतीत दुसरी कडे घर घेऊन तो इथून निघून गेला आणि जातांना हे घर नात्यातल्या बहिणीला देऊन गेला...बहिणीला ही गरज होती..कारण ती आणि तिचा अपंग मुलगा , तर कधी तरी बाहेर गावावरून येणारा नवरा , आणि जावई आणि लेक...हे कधी कधी रहायला येत..मग बऱ्याचदा तर दोघे माय लेकच असत...दोघे ही विक्षिप्त वाटत...आले तसे बाहेर येत नसत की कोणासोबत कधी बोलणे होत नसत...कोणी बोलले तरी तिरसट बोलून मोकळे होत.. त्यांची सून बाहेर आली की त्याने तिला शिवी गाळ करून , तिच्या बाहेर येण्यावर संशय घेऊन ,तिला आत पाठवायचे...शिक्षत असून ही मोठा पदर घ्यायला भाग पडायचे... रोज तिला कश्या न कश्यावरून बोलून रडायला लावत तो अपंग नवरा आणि त्यात सासूची भर पडली की तिला तो मारत असे... तिला माहेर तर माहीतच नसे...आज ही ती आज ही अपमान सहन करत होती..

शेजारच्या घरी खूप जोरजोरात भांडणाचा आवाज आला

त्या घरात हे रोजचे झाले होते

कोणी ही भाग घेत नसत ,आणि मग ती सून रोजच सासू कडून मार खात

सून जिला अनाथ म्हणून अपंग लेकसाठी आणली होती ,तिच्या वागण्यावर तो अपंग नवरा आणि सासू संशय घेत होते..

आज तीने ती आई होणार ही बातमी सांगितली आणि मग तिचा त्रास कमी होईल मुल आल्यावर जे वाटले त्या त्रासात आज जास्तच भर पडली..


सुनेच्या वागण्यावर असलेल्या संसयामुळे सासूला आणि नवऱ्याला खात्री पटत नव्हती की हे मुल आपलेच आहे कश्यावरून..

त्यामुळे आज तर दोघांनी मिळून त्या सुनेला फ़ैलावर च घेतले...तिला केस धरून फरफटत बाहेर आणले... तिला सासूने चटके दिले..


त्यांच्या ह्या भांडणाचा आवाज आज बाहेरपर्यंत जात होता , लोकांना कळावे की ही बाई बाहेर काय गुण उधळते आणि त्याचे पाप माझ्या मुलाच्या माथी मारते..

ऋचा हे ऐकत होती तिला तर त्या मुलीचा स्वभाव माहीत होता..कोणाच्या कधी अध्यात मध्यात ही येत नसत..मग असे का

आईला आपली लेक डोळ्यासमोर उभी राहिली..

लगेच म्हणाली ,"चल इथून नको ,मला हे तिचे हाल नाही फावत... तिच्या डोक्यातून रक्त येत आहे ,आणि तीला इतके घाव केले की तिला काही सुदरत नाही..आपण फक्त बघू शकतो पण काही करू शकत नाही ऋचा बाई "

ऋचाला खूप राग आला


काही करू शकत नाही ,असे कसे काही करू शकत नाही ..बघ्याची भूमिका घेणे मला पटत नाही

आई,"चल बाई ,चल "

खूप दिवस उलटले ह्या घटनेला, पण ते दृश्य डोळ्यासमोरून जाता जात नव्हते...आणि मग ऋचा डचकून उठत...


ऋचा चे लग्न झाले आणि सासरी गेली...तरी कधी कधी आईला विचारत.."आई काय झाले असेल ग त्या वहिणींचे ? "

आई, "ऋचा अग तू नको काळजी करू ,तिला आता काही त्रास नाही दिसत ,मुळात त्यांच्या घरातून तिचा आवाजच येत नाही आता ,फक्त तिच्या सासूचा आणि नवऱ्याचा आवाज येतो "

ऋचा, "म्हणजे काय म्हणायचं आई तुला ,बरी आहे ना ती...त्यांच्या चौकटीत जरा येता जाता जाऊन बघ कधी हळूच..काही दिसतंय का बघ कधी "

आई, "अग आता त्यांच्या घरात त्या काकूंची मुलगी ,जावई, नवरा जो बाहेर होता तो रहायला आले आहेत, आता बहुतेक तिला काही सासुरवास नसावा हे असल्यामुळे, पण तरी मला काही तरी गडबड वाटते..तिला त्यांनी काही केले तर नसेल ना...ह्या मरण यातनेतून ,ह्या त्रासातून सुटका तरी व्हावी तिची.."

ती जीच्याबद्दल बोलत आहोत ती रमा, एक गरीबा घरची मुलगी ,शिकलेली होती पण काका काकू कडे रहात...आई नसल्याने तिला तिथे जणू सावत्रासारखी वागणूक मिळत होती...उगाच आमच्यावर ओझे झाली...खायला एक तोंड वाढले म्हणून कितीदा काकू तिला टोमणे देत..


मग काकू ने ठरवले या मुलीचे लग्न अश्या कोणाही गरजू मुलांसोबत करून देऊन आपण मात्र मोकळे होऊ. नको असलेली ही कटकट इतरांच्या घरी जाऊदे. बऱ्याच ठिकाणी मग विचारणा सुरू केली काकूने. खूप गरजवंत स्थळ पाहिली..पण जो कोणी येत तो हेच पहात की ,ह्या काकूंची गरज आपल्यापेक्षा जास्त मोठी आहे..आणि ह्याचा फायदा घेऊन बरेच येणारे त्यांना हुंडा मागत होते... मग काय काकूने स्थळ पहाणे सोडून दिले...आणि तिला कोणत्या तरी ओळखीच्या parlour मध्ये कामाला लावले.


तिच्या महिन्याच्या कामाचे पैसे काकू घेऊ लागली ,मग आता पैसे मिळत आहेत हे पाहून काकूंचे मन फिरले...आणि मुलगी पैसे कमावते हे पाहून तिला बरेच चांगले स्थळ विचारून येत होते. पण काकू त्यांना आता नकार देत होती. तिला आता आयते पैसे महिन्याला मिळत होते..घर चांगले चालत होते. घर चालत आहे मग हिला लग्न करून मी का दुसऱ्यांचे घर भरू..?

कोणी तरी मग सांगितले ,लग्न लावून दे, आणि वाटले तर हुंडा देण्याऐवजी तूच हुंडा माग ह्या कमावत्या मुलीच्या बदल्यात...आणि स्थळ साधे सरळ न बघता कोणी अपंग ,अधु असेल तर बघ. ज्याला हिची खूप गरज असेल .


काकुच्या मनात आता फक्त लग्न हेच ठरले होते ,लग्न तेही गरजू आणि त्यात अपंग असलेला कोणी तरी बघून देऊ आणि तिचे हात पिवळे करू...जाऊदे ही ब्याद...किती सांभाळा खायला ओझच ही...

रमा आयुष्याला कंटाळली होती...मरण जवळ करण्याचे विचार मनात येत होते..ह्या जिवंतपणी मरण यातना सहन होत नव्हत्या..


तरी जगणे भाग आहे म्हणून जगत होती ,वाटत होते आयुष्यात कोणाला तरी माझी आणि माझ्या प्रेमाची गरज असेलच ना ,कोणी तरी खरे प्रेम करणारा जीवन साथी मिळेलच ना...देवाला जर निशिबात तो लिहिला असेल तर नक्की मिळेल...तसे ही आई म्हणाली होती ,तुला आम्ही गेल्यानंतर ही जगायचे आहे ,कुठे ही डगमगून न जाता जगायचे आहे ,तू जर कधी खचलीस तर माझी आठवण कर, माझे शब्द आठव, आणि पुन्हा हिमतीने जग ग बाई माझे... नाहीतर माझ्या आत्म्याला शांती नाही लाभणार..

क्रमशः.....


🎭 Series Post

View all