मानवत हत्याकांड (दत्ता जोशी) भाग तिसरा

एकेकाळी सगळ्या महाराष्ट्राची झोप उडवणाऱ्या हत्याकांडाची थरारक कहाणी


मानवत हत्याकांड (भाग तिसरा )

मुंबई सीआयडी च्या हाती हे प्रकरण दिल्यानंतर सगळ काही थांबेल असं सगळ्यांना वाटतं होतं. पणं तसं झालं नाही. कुलकर्णी तपास करत असताना देखील एका मुलाचा खून करण्यात आला.

गावातले लोक ईतके घाबरलेले होते की त्या बाबतीत कोणी तोंड उघडायलाही तयार नसे. त्यामुळे चौकशीला दिशाच मिळतं नव्हती. पण या मुलाची हत्या झाली आणि कुलकर्णीच्या हाती एक धागा मिळाला. जिथं हत्या केली गेली होती तिथं समिंद्री नावाच्या पारधी स्त्रीच शस्त्र सापडलं आणि या प्रकरणाचे एक एक धागे दोरे कुलकर्णींना सापडत गेले.

या चौकशीची दिशाच या गोष्टी मुळे बदलून गेली. जेंव्हा सत्य बाहेर आलं त्या वेळी सगळेच हादरून गेले. या प्रकरणात गावातलाच प्रतिष्ठित माणूस गुंतलेला असेल असं त्यांना अजीबात कल्पना नव्हती.

सत्य हे कल्पिता पेक्षा कितीतरी भयंकर होतं. आता हे प्रकरण नेमकं काय होतं ते मुळापासून बघू या.
*****

पाथरी गावाच्या बाहेर पारध्यांची वस्ती होती. हे लोकं नेहमी चोऱ्यामाऱ्या , हातभट्टीची दारू बनवणे वगैरे अनैतिक कामं करायचे. या दारू साठी गावातले लोकं देखील वस्तीवर येतं. या लोकांमधे एक मातब्बर आसामी होती उत्तमराव. हा उत्तमराव अतिशय रंगीला माणूस होता. त्याला बाई बाटली पासून अनेक षोक होते. तो या वस्तीवर दारु पिण्यासाठी येतं असे.

त्याच्या येण्याला अजून एक कारण होते ते म्हणजे रूक्मिणी. ती अतिशय सुंदर, रेखीव आणि कमनीय बांध्याची होती. तिला नवऱ्याने टाकलेले होते. त्या मुळे ती वस्तीवर दारु विकण्याचे काम करत असे. उत्तमरावाची तिच्यावर नजर पडली आणि दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले. ते प्रेम ईतके पूढे गेले की उत्तमरावाला तिला सोडून एक क्षणभरही करमेना. म्हणून एक दिवस त्याने तिला पारधी वस्तीतून गावात पळवून आणले. तिच्यासाठी त्याने गावातल्या मारवाड्याचा वाडा विकत घेतला. त्यात रुक्मिणी राहायला लागली.

पारध्यांच्या वस्तीवर रुक्मिणी नाहीशी झाल्याने बराच गोंधळ उडाला होता. पण उत्तमराव मोठा असामी असल्याने त्यांचे त्याच्या पूढे काहीचं चालले नाही.

उत्तमराव आणि रुक्मिणी आनंदात रहात होते. असा बराच काळ लोटला. रुक्मिणीची गुन्हेगारी वृत्ती तिला गप्प बसू देत नव्हती. म्हणून तिने उत्तमरावला विचारून गावातच दारूचा धंदा सुरू केला. तो धंदा ईतक्या तेजीत चालायला लागला की रुक्मिणीला प्रचंड पैसा मिळायला लागला.

पण तरीही ती सुखी नव्हती. कारण....

( लेखक : दत्ता जोशी)

🎭 Series Post

View all