माणूस म्हणून जगताना

Humanity is a choice.

सुखाचाही हेवा वाटेल, भरल्या घराकडे पाहताना;

सुख दिल्यावरही सुख मिळेल, माणूस म्हणून जगताना.

चार पावलांचा प्रवास, चार भिंतीत राहताना,

कुंपणाबाहेरही परिवार मिळेल, माणूस म्हणून जगताना

जास्तीचे कष्ट करावे, आवडीनिवडी जपताना,

अनोळखी चेहऱ्यावर हास्य उमटेल, माणूस म्हणून जगताना.

धडपडीच्या आयुष्यात, आराम मिळेल जग फिरताना

दूर कुठेतरी आपल्यामुळे चुल पेटेल, माणूस म्हणून जगताना.

पिलांच्या हट्टाखातर, मजा येईल नगद घालवताना,

एका दप्तराने एका पिलाचं आयुष्य उजळू शकेल, माणूस म्हणून जगताना.

©श्वेता कुलकर्णी♥️