मंतरलेले अंतर (भाग 10)

एक हलकी फुलकी प्रेम कथा
मंतरलेले अंतर

भाग 10 :

समीरच्या मोबाईल वरून कॉल आला , आणि मयुरीच्या हातून मोबाईल खाली पडला. मयुरीच्या ओरडण्याच्या आवाज आणि आई-बाबा धावत आले. मयुरीने आईला मिठी मारली आणि जोरजोरात रडू लागली.


समीरच्या कारचा दुबईत अपघात झाला होता. त्याला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले होते. गिरीशने समीरच्या मोबाईल वरून कॉल करून, ही माहिती सांगितले आणि तिने लवकरात लवकर दुबईला यावे असे सांगितले.

दुःखावेग कमी झाल्यानंतर मयुरीने तत्काळ दुबईला जाण्याचा निर्णय घेतला. आरव वर घराची, आई बाबा, रेवाची जबाबदारी सोपवून मयुरी दुबईला निघाली.

हॉस्पिटल वरील बेडवर समीरला पाहताच मयुरीचे आवसान गळून पडले. तोंडात नळी ,नाकावर ऑक्सिजन, हाताला मशीन, कपाळावर, डोक्यावर बांधलेल्या पट्ट्या , पाहताच मयुरीला तिच्या शरीरातून जीव निघून जात आहे असे वाटत होते.

कारला एका मालवाहतूक ट्रकने धडक दिल्यामुळे समीरचा अपघात झाला होता. त्यात समीरच्या मेंदूला जबर मार लागल्यामुळे त्याचे ऑपरेशन करावे लागले होते.

समीर अजूनही बेशुद्ध होता. येत्या 24 तासात त्याने शुद्धीवर यायला हवे म्हणजे त्याचे प्राण वाचणार होते.

मयुरी ने समीरचा मशीन असलेला हात हातात घेतला.

हळुवारपणे ती त्याला आवाज देत होती , " सॅम, बघ रे मी आले आहे. तुला भेटण्यासाठी. डोळे उघड. माझ्याशी बोल रे. "

मयुरी समीर ला एकदा डोळे उघडून बघ म्हणून विनवत होती. तिच्या डोळ्यातून ओघळणाऱ्या अश्रू चा एक थेंब समिरच्या हातावर पडला आणि समीर चा हात थरथरला.


मयुरीच्या स्पर्शाने, तिच्या आवाजाने समीर शुद्धीवर येण्याचा प्रयत्न करत होता .

त्याने डोळे उघडले. किलकिल्या डोळ्यांनी त्याने सभोवताली पहिले. अती रक्तस्त्रावमुळे त्याला अशक्तपणा आला होता. मोठ्या मुश्किलीने त्याने आवाज देण्यासाठी तोंड उघडले.

" म..... म..... म.. यु.... " असे म्हणताच त्याची शुद्ध हरपली.


घाबरून मयुरीने डॉक्टरांना बोलावले. त्यांनी तपासून सांगितले कि, समीर कोमात गेला आहे. तो कदाचित बरा होईल, किंवा नाही. यासाठी बराच काळ लागेल.


मयुरी साठी हा खूप मोठा धक्का होता. दिवाळीसाठी भारतात येणाऱ्या समीरला या क्षणी असे कोमात पाहून मयुरी सुन्न झाली. पण ती रडली नाही. तिच्या डोळ्यातून अश्रू आले नाहीत.


परिस्थिती माणसाला कणखर बनवते. तीही कणखर झाली. सावित्री बनण्यासाठी. समीरला या मृत्यू पाशातून सोडविण्यासाठी. त्याच्यात आणि जगात निर्माण होऊ पाहणारे हे अंतर दूर करण्यासाठी...


डॉक्टरांचे उपचार, मयुरीचे प्रेम, तिचा दुर्दम्य आशावाद, आई, बाबा, मुले आणि अनाथालयातील चिमुकल्यांची आर्त प्रार्थना समीरला मृत्यू पाशातून सोडवत होती.

समीर ला कोमामध्ये जाऊन विस दिवस झाले होते. दरम्यान फक्त त्याच्या दाढीचे वाढणारे केस हेच त्याच्या जिवंतपणाचे लक्षण होते. पण मयुरीने हार मानली नाही. रात्रंदिवस ती समीर च्या उशाशी बसून होती. त्यांनी सोबत घालविलेल्या क्षणा बद्दल बोलत होती. तिचे प्रेम व्यक्त करत होती. पण समीर मात्र कोणताही प्रतिसाद देत नव्हता.

आज 25 व दिवस होता. तो कोमातून बाहेर येण्याची काहीच चिन्हे दिसत नव्हती. डॉक्टरांनी शेवटी त्याचे व्हेंटिलेटर काढण्याचा निर्णय घ्यावा लागेल असे सांगितले.


मयुरी सुन्न झाली. निर्वीचार झाली. त्याच आवेगात तिने बेडवर असलेल्या समिरला कवटाळले. त्याला जिवाच्या आकांताने आवाज दिला....


" समीर........ उठ रे आता तरी...... एकदा बघ माझ्याकडे डोळे उघडून.... मी नाही जगू शकत तुझ्याशिवाय..... आरव, रेवासाठी तरी ऊठ. सगळे तुझी वाट बघत आहेत. ऊठ... समीर... ऊठ ना...... "

मयुरीची ही वेदना समिरच्या हृदयापर्यंत पोहोचली . समीर ने डोळे उघडले. डॉक्टरांनी लगबगिने समीर ला तपासले. तो शुद्धीवर येत होता.

प्रेमाच्या ताकदीने त्याला शुद्धीवर येण्यास भाग पाडले होते.


आत्यान्तिक वेदनेने समीरने मयुरीला आवाज दिला. आणि सर्वांच्या जीवात जीव आला. समीरचा धोका टळाला होता. समीर कोमातून बाहेर आला होता. तो सर्वांना ओळखत होता. परंतु त्याचा एक पाय हालत नव्हता.

समिरच्या पायाचे ऑपरेशन करण्यात आले. पंधरा दिवसात समीर व्हिल चेअर वर बसून फिरू लागला. स्वतः च्या हाताने खाऊ लागला. आता दोन चार दिवसात त्याला डिस्चार्ज मिळणार होता.


फिजिओथेरपी नंतर आज समीरने संपूर्ण ताकदीने मयुरीच्या खांद्यावर हात ठेऊन उभे राहण्याचा प्रयत्न केला. आणि समीर स्वतः च्या पायावर उभा राहिला.

आधुनिक सावित्रीने अर्ध्यापेक्षा अधिक लढाई जिंकली होती. आणखी फक्त काही दिवसांचा अवकाश आणि समीर चालू शकणार होता.


समिरच्या तब्येतीत झालेली सुधारणा पाहून डॉक्टरांनी त्याला डिस्चार्ज दिला. फिजिओथेरपी, आणि मयुरीने रोज केलेल्या मसाज मुळे समीर हातात काठी घेऊन चालू, फिरू लागला.


दिवाळी चार दिवसांवार येऊन ठेपली होती. यावर्षी समीरला सर्वांसोबत दिवाळी साजरी करायची होती. उद्याच समीर आणि मयुरी भारतात जाणार होते.


समीरने मयुरीला मिठीत घेतले. मयुरी त्याच्या मिठीत विरघळून गेली. शब्दावाचून चाललेल्या या संवादात दोघेही हरवली होती.


बाजूला म्युसिक सिस्टिम वर....



" तुम अगर साथ देने
वादा करो

मैं यूही मस्त नगमे

लुटता रहू..........

......

हे गीत ऐकू येत होते.


समाप्त.


गीतांजली सचिन

🎭 Series Post

View all