Dec 01, 2021
Kathamalika

मनशांती....(भाग ३)

Read Later
मनशांती....(भाग ३)

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..

भाग १
https://m.facebook.com/story.php?story_fbid=1068366586981193&id=581606972323826

भाग २
https://www.facebook.com/581606972323826/posts/1069047553579763/

शिखा घरी पोचते.जाता जाता जरते काकू आणि शिखा भाजी वैगरे घेऊनच जातात म्हणजे परत त्यासाठी बाहेर नको पडायला.घरी जाऊन शिखा डॉक्टरांचं आणि तीच बोलणं माईंना सांगते.

बघा बाई..... तुम्हीच काय ते.....आमच्या वेळी अस काही नव्हतं हो.......आताच काय ते विज्ञान का काय......ते काहीही करू शकतं...... तुमचा निर्णय तुम्ही घ्या.....आम्ही आहोत हो तुमच्यासोबत......"माई"

माईंचं तिरसट बोलणं शिखाला आवडलं नाही... पण तरी ती काही बोलली नाही....... तिने तीच सांगण्याचं काम केलं.

बाकी संध्याकाळी सुयश आल्यावर शिखा ने सगळं त्याला व्यवस्थित समजावलं.

अरे वाह.......मग तर मजा आहे माझी...... चला म्हणजे डॉक्टरांना तरी माझ्या मूड बद्दल समजलं."सुयश"

शी......बाई...... किती चावट आहेस रे तू......मी काय सांगते आणि तुझं काय चाललंय......"शिखा"

अगं...... तू ओरल बद्दल सांगतेस पण मी प्रॅक्टिकल कशी द्यायची याचा विचार करतोय....."सुयश"( विचार करायच नाटक करत म्हणाला.)

सुयश.........."शिखा" (शिखा त्याला उशीने मारते. लगेच दुसरी उशी घेऊन सुयश तिचा ढालीप्रमाणे वापर करतो.बराच वेळ मस्ती करून दोघेही थकतात.)

बस.....एवढ्यातच थकलीस......एवढं बोलून सुयश शिखाला त्याच्या जवळ खेचतो........आणि हळुवार पणे त्याचा गाल तिच्या गालावरून फिरवतो.........तिचा हात स्वतःच्या हातात घट्ट पकडून तिच्या बोटात बोटं गुंफतो......ती पण तिची बोटं त्याच्या बोटात घट्ट पकडते.....हळूहळू ती पकड इतकी घट्ट होते की.........दोघांचे श्वास पण वरच्या परिसीमा गाठतात......मानेवरून फिरणारा गाल........ हळूच तिच्या कवेत शिरून ओठांची देवाणघेवाण करतात.......आणि अखेर दोघेही मखमलीच्या चादरीत एकरूप होतात..........
 

सकाळी सुयशला....... शिखाला सोडवत नसतं पण निमेशची ऑफिस ला जायची वेळ लवकर असल्याने तिला सकाळी पाचला उठणं भाग असतं......शिखा कसबस स्वतःला सुयश च्या घट्ट मिठीतुन सोडवून घेते आणि बाहेर येते.बाहेर येऊन तोंडावर पाणी मारते.मोकळा असलेला केशसंभार कल्चर मध्ये अडकवते आणि पोळी भाजी करायला घेते.

नेहमी सारखी काम आटपून शिखा बसलेली असते. तिच्याच विचारात.तेवढ्यात सुयश चा फोन येतो.

हॅलो.......काय मग मॅडम...... काय चाललंय......."सुयश"

काही नाही...... नेहमीचचं आपलं........"शिखा"

बरं..... मग काय??आज पण माझा हिस्सा मला भेटणार ना...."सुयश"

नाही......"शिखा"

अरे पण का????"सुयश"

आता डायरेक्ट सातव्या, आठव्या आणि नवव्या दिवशी......"शिखा"
 

ओके......."सुयश" (थोडा नाराजीतच म्हणतो.)

चल काम कर......नको तो विचार करू नये कामाच्या वेळी......समजलं......बाय...."शिखा"

बरं..... मॅडम......बाय....."सुयश"

डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पुढचे तीन दिवस सतत दोघे संबंध ठेवत होते. दहाव्या दिवशी दोघेही सोनोग्राफी साठी गेले.चेकअप केल्यावर समजलं शुक्राणू तर गेला आहे पण तो खूप विक आहे त्यामुळे गर्भधारणा होईल की नाही यात  शंका होती.तरी डॉक्टरांनी तिला एक इंजेक्शन आणि काही गोळ्या दिल्या.आता डॉक्टरांनी पुढील महिन्याची पाळी चुके पर्यंत संबंध ठेवायचा नाही असं सांगितलं आणि फार दगदग करू नये असा सल्ला दिला.

पुढचे वीस दिवस चांगले गेले आणि शेवटी पुन्हा तिला पाळी आली..शिखा आणि सुयश डॉक्टरांकडे गेले. डॉक्टरांनी सोनोग्राफी ची चिठ्ठी लिहून दिली.....

डॉक्टरांनी सोनोग्राफी करून शिखा सुयश चं अभिनंदन केले.दोघेही आश्चर्यचकित झाले.

त्यांनी डॉक्टरांना थँक्स म्हंटल आणि रिपोर्ट घेऊन डॉक्टर सुर्वे यांना भेटायला गेले.

या......बसा......."डॉक्टर सुर्वे"

मॅडम हे सोनोग्राफी चे रिपोर्ट........ "शिखा"

डॉक्टर रिपोर्ट बघतात.

अरे वाह........मिसेस देशमुख.......कॉंग्रेच्युलेशन.......तुम्ही प्रेग्नंट आहात....."डॉक्टर सुर्वे"

थँक यू मॅडम......पण तुम्ही तर बोलला होतात...... गर्भधारणा होणार नाही......."शिखा"

अगं...... हे राहणं किंवा न राहणं आपल्या हातात नाही..... हा.......... पण प्रयत्न करणं नक्कीच आपल्या हातात आहे.पण हो......तुम्ही फार खुश होऊ नका......गर्भ खूप नाजूक आहे म्हणूनच तिला आता पिरियड सारखी ब्लडींग झाली त्यामुळे शिखाला बेडरेस्ट कम्पलसरी आहे.निदान पाच महिने तरी........जड वस्तू उचलणं,धावपळ,दगदग करून चालणार नाही आणि तिला दर आठवड्याला.......म्हणजे एक दिवस ठरवा आणि त्या दिवशी इकडे घेऊन या इंजेक्शन साठी....... ही इंजेक्शन पाच महिने घ्यावी लागतील. यावेळीच्या गोळ्या थोड्या स्ट्रॉंग देते. गर्भ पडू नये यासाठीची इंजेक्शन असतील ती......पहिले पाच महिने खूप महत्वाचे आहेत.खर तर पहिले तीन महिने महत्वाचे असतात पण आपल्याला शिखाला पाच महिने तरी जपावं लागेल आणि या वेळी नक्कीच हे बाळ जन्म घेईल."डॉक्टर सुर्वे"
 

हो डॉक्टर...... तुम्ही जे सांगाल आणि जस सांगाल तसचं सगळं फॉलो करू आम्ही........"सुयश"

ओके......हे घ्या प्रिस्क्रिप्शन..... आणि हो..... हे सांभाळून ठेवा,कारण या गोळ्या प्रिस्क्रिप्शन शिवाय भेटणार नाहीत."डॉक्टर सुर्वे"

हो डॉक्टर....... चला येतो......थँक यू......."सुयश"

डॉक्टर दोघांकडे बघून स्मितहास्य करतात..

दोघे घरी जाताना मिठाई घेऊन जातात.घरी गेल्यावर दोघेही हात पाय धुवून देवाच्या पाया पडून आशीर्वाद घेतात आणि सगळं नीट होण्यासाठी प्रार्थना करतात.सुयश घरात सगळ्यांना ही गोड बातमी देतो......शिवाय शिखा ला पूर्ण पणे बेडरेस्ट आहे असंही सांगतो.माईंची थोडी कुरबुर होते.........पण नातवंडासाठी त्या तयार होतात.
 

सगळे खूप काळजी घेत असतात शिखाची......दर आठवड्याला न चुकता इंजेक्शन घ्यायला शिखा सुयश सोबत जायची....काही दिवसांनी तिला उलटीचा त्रास सुरू झाला.....पाणी पियाली तरी उलटी यायची तिला, डाळीची फोडणी,शिजलेला भात याचा तर तिटकारा यायला लागला होता शिखाला.पोटात अन्न राहत नव्हतं त्यामुळे शिखा थोडी कमजोर झाली होती.....बघता बघता पाच महिने पूर्ण झाले...शेवटच इंजेक्शन घ्यायला दोघे हॉस्पिटलमध्ये गेले. डॉक्टरांशी बोलून दोघेही एका स्नॅक्स शॉप मध्ये गेले.तिथे शिखाने एक्स्ट्रा चीज सँडविच आणि कॉफी मागवली सुयश ने मात्र कुल्फी फालुदा मागवला.शिखा ने तिची प्लेट तर फस्त केलीच शिवाय सुयशच्या ग्लास मधला फालुदा पण खाल्ला.....पाच महिन्यांचा उपवास सुटला होता तिचा. एवढं सगळ खाऊन तिला खूप बरं वाटलं होतं पण हा आनंद क्षणिकच होता......कारण पुन्हा तिने उलटी केली होती......यावर सुयश ला हसू आले........त्याला हसताना बघून शिखा पण हसायला लागली.......

हा पोटातचं राहून एवढी बदमाशी करतोय......मग बाहेर आल्यावर काय होणार??? "शिखा"

माझा अंश आहे म्हटल्यावर........ माझ्यासारखा बदमाशचं असणार ना!!"सुयश"

हो तर.......चला आता निघुया का??? "शिखा"

हो हो चल......तू थांब इथेच...... मी बिल पेड करून येतो."सुयश"

ओके......."शिखा"
 

दोघेही घरी जायला निघतात.म्हणता म्हणता.....शिखाला सातवा महिना लागतो.शिखा ओटी भरून माहेरी जाते....माहेरी पण तिचे सगळेजण हवे तसे लाड पुरवतात. सुयश पण रोज तिला भेटूनच घरी जात होता.नऊ महिने बारा दिवस झाले तरी शिखाला कळा येत नव्हत्या म्हणून मग तिला सुयश चेकअप साठी घेऊन जातो. चेक करून डॉक्टर शिखाला ऍडमिट करून घेतात.कळा येण्याचं इंजेक्शन देतात तस तिला तासाभरातच कळा चालू होतात.डॉक्टर हात फिरवून तिची पानमोकली फोडतात.शिखाच्या प्रत्येक एका आई गं......... वर सुयश च काळीज धडधडतं होतं.तिचा आकांत त्याला ऐकवत नव्हता.रडवेला चेहरा घेऊन तो ओटी च्या बाहेर बसला होता. शिखाचे आईबाबा त्याला धीर देत असतात.इतक्यातच माई,आप्पा आणि निमेश तिघे पण येतात.सुयश तर आप्पांच्या गळ्यात पडून रडू लागतो.माई त्याच्या पाठीवरून हात फिरवत म्हणतात..........

अरे....... घाबरू नको.......देवाने बाई ला एवढ मजबूत बनवलं आहे की एवढासा त्रास देखील तिला काही करू शकत नाही. तुम्ही पुरुष कितीही ताकतवार असलात तरी एका जीवाला जन्म देण्याची कुवत ही फक्त एका स्त्री मध्येच असते आणि ती स्त्री त्यावेळी एक आई असते......अरे म्हणूनच तर याला बाईचा दुसरा जन्म म्हंटल जात........नको काळजी करू......सगळं ठीक होईल कारण आता या क्षणी आतमध्ये तुझी बायको,माझी सून किंवा यांची मुलगी नाही.......... एक आई आहे......"माई"

सुयश माईच्या कुशीत जातो.......माई त्याच्या डोक्यावरून हात फिरवत असतात.......तोच बाळाच्या रडण्याचा आवाज येतो........सगळे खूप खुश होतात......

अभिनंदन तुम्हाला मुलगा झाला आहे......."नर्स"

डॉक्टर बाळाला बाहेर घेऊन येतात.आप्पा तर बाळाला बघून दोन हजाराची नोट काढून त्याच्यावरून ओवाळून हॉस्पिटलमधल्या मावशींच्या हातात देतात.शिखाचे बाबा पण दोन हजार रुपये काढून त्याच मावशींच्या हातात देतात.......मावशी पण वयस्कर असल्याने त्या पण खुश होऊन दोन्ही कुटुंबांना आणि नवीन बाळाला खूप आशीर्वाद देतात. सुयश तर शिखाला मिठीच मारतो......बाप होणं यापेक्षा मोठा आनंद नाही याची त्याला जाणीव होते.
 

बाळ अगदी गुटगुटीत असत.शिखाच्या घरी बाळाचं बारसं होतं. बाळाचं नाव संस्कार ठेवतात. आई कडे माहेरपण करून शिखा दोन महिन्यांनी तिच्या घरी येते.जरते काकूंना तर त्यांचा आधारच भेटला अस वाटू लागतं.शिखा पण आता पहिल्यासारखी सगळी काम करायला लागली असते, फक्त बाळाच्या रडण्याचा आवाज आला की हातातली काम तिला टाकावी लागत होती.

काही दिवसांनी शिखाला सुयश मध्ये होणार बदल प्रकर्षाने जाणवू लागतो.सुयश फार चांगला बोलत नव्हता शिखा सोबत.बराच वेळ तो फोन मध्ये गुंग असायचा.शिखाने काही विचारलं की तो चिडचिड करायचा.शिखाला कळतंच नव्हतं तीच कुठे चुकलं.पण संस्कारच सगळं करण्यात ती इतकी बिजी होती की या सगळ्याकडे तिला लक्ष द्यायला वेळच नव्हता.

एक दिवस सूयश आंघोळीला गेला असता....... त्याच्या फोन वर मॅसेज हायलाईट होतो.सहज म्हणून ति त्यावर नजर टाकते आणि ती जागीच स्तब्ध होते.तिचे हात पाय थरथरू लागतात,ती घामाघूम होते.

क्रमशः

कथेचे सगळे हक्क लेखिकेकडे राखीव आहेत तरी कथा पोस्ट करायची असल्यास ती लेखिकेच्या नावासाहित करावी.

धन्यवाद????????

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Shravani Lokhande

Housewife

I like reading