Dec 06, 2021
कथामालिका

मनशांती.....( भाग १)

Read Later
मनशांती.....( भाग १)

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..

लग्न होऊन दोन वर्षे झाली......... तरी शिखा ला मुलं होत नव्हतं.दोन वर्षात चार वेळा गर्भ पडला होता. हसरी खेळकर शिखा...... सतत च्या गर्भ पडण्याने बुजून गेली होती. सासरची मंडळी जास्त शिकलेली नसली तरी समंजस होती.मुलासाठी शिखाच्या पाठी कधी तगादा नाही लावला त्यांनी आणि सुयश पण.......( शिखा चा नवरा) तोही खूप समजुतीने घ्यायचा.दोन वर्षे प्रयत्न करूनही बाळ होत नाही, म्हणून दोघांनी ट्रीटमेंट चालू केली.त्यात शिखा ची गर्भपिशवी तपासून बघितली पण काहीच प्रॉब्लेम नव्हता.म्हणून मग डॉक्टरांनी सुयश ला त्याची तपासणी करायला सांगितली.त्याने सुद्धा त्याचा पुरुषार्थ मध्ये न आणता टेस्ट करून घेतली पण त्याच्यातही काही प्रॉब्लेम नव्हता.तरी गर्भ राहत नव्हता म्हणून मग डॉक्टरांनी काही औषध लिहून दिली  दोघांसाठी, त्यांच्या वेळाही ठरलेल्या असायच्या म्हणजे
...... जर औषधं रात्री दहा ला घेतली तर शेवटपर्यंत ती त्याच वेळेत घ्यायची.दोघेही वेळेवर त्यांची औषधं घेत होती.पुढच्या वेळी शिखा ची पाळी थोडी लांबली म्हणून तिला वाटल ती प्रेग्नंट आहे.ती टेस्ट किट आणायला खाली जात होती पण त्याआधी तिला लगवीला झाली म्हणून ती आधी टॉयलेट मध्ये गेली पण काय...........तिला लगवी सारख वाटत होतं पण खरं तर तिला पाळी आली होती.पंधरा दिवस न चुकता औषध घेऊनही परत तेच झालं म्हणून तिची चिडचिड होत होती.ती टॉयलेट मधून बाहेर आली आणि मग बाथरूम मध्ये पॅड घेऊन गेली.गीजर चालू करून गरम पाण्याची आंघोळ केली...... केसं धुतली आणि शिखा बाहेर आली.

 

अहाहा........... सकाळी सकाळी असा तुझा चेहरा बघितला ना की माझा दिवस भारी जातो........आणि त्यात हे ओले......मानेवर रुळणारे केसं आणि त्यातून तुझ्या अंगावर गळणार पाणी.............ये जरा अशी मिठीत........आज रविवार आहे आणि आज नाही म्हणायला चान्स पण नाही..........सुयश शिखाचा एक हात घट्ट आपल्या हातात पकडून प्रेमाने तो हात मुरगळत असतो.पण शिखा त्याच्यावर चिडते.

 

काय रे..........सकाळी सकाळी तुला मस्ती सुचते.रविवार असला तरी मला काम असतात.सुट्टी तुला असते मला नाही....... उलट रविवारी तर रोज पेक्षा जास्तीचं काम असत.......तुला काय  कळणार म्हणा त्यातलं??.........तू कधी मदत करतोस का?? शिखा चिडून बोलते आणि रूम बाहेर निघून जाते. सुयश ला शिखाचं वागणं पटत नाही पण सकाळी सकाळी वाद नको म्हणून तो उठून बाथरूम मध्ये जातो.कोलगेट संपल्यामुळे सुयश शिखाला आवाज देतो.

 

शिखा..........अगं कोलगेट संपला आहे....... प्लिज नवीन देतेस का????"सुयश"
शिखा तणतणतचं येते आणि कोलगेट अक्षरशः सुयशच्या हातावर आपटून जाते.

अगं....... अशी काय ही??? झालं तरी काय हिला??? सुयश स्वतःशीच बोलतो आणि खांदे उडवून बॉक्स मधून कोलगेट काढतो.ब्रश करून आंघोळ आटपून सुयश बाहेर निघतच असतो की त्याच लक्ष कोलगेटच्या बॉक्स वर जाते म्हणून तो पुन्हा आतमध्ये येऊन स्वतःशीच पुटपुटत असतो..........कोलगेटचा बॉक्स डस्टबिन मध्ये टाकावा नाही तर तापलेला तवा अंगावर उलटायचा......... अस म्हणून तो स्वतःशीच हसतो.बॉक्स हातात घेऊन तो कचऱ्याच्या डब्ब्यात टाकतो आणि तेवढ्यात त्याच लक्ष डब्ब्यात असलेल्या सॅनिटरी पॅड च्या रिकाम्या पॅकेट कडे जात. आणि मग शिखाच्या चिडण्या मागचं खरं कारण त्याला समजत.सुयश त्याच सगळं आवरून घेतो आणि सोबतच त्यांची रूम पण आवरतो म्हणजे शिखाची थोडी चिडचिड कमी होईल.सगळं आवरून तो किचन मध्ये जातो बघतो तर शिखा नाश्त्यासाठी कणिक भिजवत असते.खाली बसलेली शिखा दोन्ही पायांच्या अंगठ्यात परात पकडून उजव्या हातानी पिठ मळत होती आणि डावा हात कमरेवर मागे घेऊन हळुवार दाबत होती.हे सगळं सुयश दुरून बघत होता.एक नजर माई (शिखा ची सासू) कुठे आहे ते बघतो. माई हॉल मध्ये मेथीची जुडी साफ करत होती.माई ला कामात बिजी बघून सुयश शिखाच्या पाठी जाऊन बसतो आणि तिचा हात बाजूला करून तो हलकेच तिची कंबर चेपून देतो.एवढा वेळ दाबून ठेवलेला हुंदका सुयश च्या स्पर्शाने वाहू लागतो. शिखाच्या रडण्याच्या आवाजाने माई पण काय झालं म्हणून बघायला येते.


काय रे.........काय झालं??? आणि शिखा......अगं..... तू का रडतेस??? काय झालं??  "माई"


अगं...... माई....काही नाही.....तिला रात्रीपासूनच घरची आठवण येत होती म्हणून मी जरा मस्करी म्हणून नाही म्हणालो......म्हणून रडते आहे ती."सूयश"


काय रे तू रडवतोस तिला......बरं चल....... तोंडावर पाणी घे, पटकन ते कणिक भिजवून घे आणि दोघे जाऊन या तुझ्या माहेरी माई शिखाकडे बघत बोलतात......नाश्त्याच मी बघते.शिखा तिची काम आवरते कणिक मळून चपात्या करून घेते. लग्न झाल्यापासून सगळ्यांना शिखाच्या हातच्या मऊ लुसलुशीत चपत्यांची सवय झाली होती...... अगदी माईला सुद्धा म्हणून ती चपाती करून निघते.

 

दोघेही घराबाहेर निघतात....... तोच खाली त्यांना आप्पा आणि निमेश भेटतात.(शिखाचे सासरे आणि दीर) दोघेही आज सोबतच येतात.आप्पा सकाळी मित्रांसोबत वॉकला जातात आणि निमेश जिम ला.आज रविवार असल्याने निमेश जरा उशिराच जिमला जातो.

 

काय मग दोघे फिरायला वाटते.........निमेश शिखाची मस्करी करत बोलतो.......

हो जरा सासुरवाडीच्या माणसांना भेटून येतो.बरं आप्पा तुमची बँकेची सगळी काम मी ऑनलाईन करून ठेवली आहेत बाकी क्रेडिट कार्ड तुम्हाला स्वतः जाऊन घ्यावं लागेल.....चार दिवसांनी जावा........"सुयश"

 

तू येणार नाही का आज??....."आप्पा"


येणार आहे......पण मी विसरायला नको म्हणून कानावर घालून ठेवलं........हम्मम......चला मग येतो आम्ही संध्याकाळ पर्यंत....."सुयश"


बरं... सांभाळून जावा रे......"आप्पा"


हो आप्पा....."सुयश"

सुयश आणि शिखा सोसायटीच्या बाहेर येतात.सुयश टॅक्सी थांबवतो. दोघेही टॅक्सीत बसतात.टॅक्सी एका मोठ्या हॉटेलबाहेर थांबते.शिखा सुयश च्या खांद्यावर डोकं ठेऊन डोळे बंद करून पडलेली असते त्यामुळे टॅक्सी नक्की कुठे जातेय हे तिला माहीत नसतं.

चला मॅडम....... आपलं तिकीट इथपर्यंतचं होतं."सुयश"


हा.......हो उतरते........शिखा तिच्याच विचारात गाडीतून उतरते. तरी तीच्या लक्षात नाही येत आपण कुठे आलोत.
गाडी निघून गेल्यावर शिखा चालायला पुढे होते तेंव्हा ती वर बघते.


सुयश.........आपण माझ्या घरी जाणार होतो ना?? म्हणजे घरी तू माईंना तेच सांगतील होतं ना??? मग आपण इथे का आलो?? "शिखा"


अगं हो.....किती प्रश्न करतेस!! आधी आत तर चल...."सुयश"


सुयश आणि शिखा आतमध्ये जातात.सुयश रिसेप्शन जवळ जाऊन चावी घेतो.दोघेही चौथ्या माळ्यावर जायला लिफ्ट कडे वळतात. चौथ्या माळ्यावर उतरून दोघेही त्यांच्या रूम कडे जातात.सुयश शिखाला खोलीचं दार उघडून देतो आणि तो पटकन खाली जाऊन येतो अस सांगून पुन्हा खाली येतो.
खाली येऊन तो आधी आप्पांना फोन करतो.


हॅलो........हा बोल बेटा....... पोचलात का रे घरी??? "आप्पा"


हॅलो आप्पा......अहो त्याचसाठी फोन केला आहे.....खरं तर मी शिखाला घेऊन तिच्या माहेरी नाही......हॉटेल वर आलोय.......माईला बोलू नका काही.......म्हणजे ते काय झालं.......डॉक्टरची औषध चालू असूनही शिखाला आज पाळी आली आणि म्हणून ती सकाळपासून चिडचिड करत होती म्हणून म्हंटल तिला थोडं शांत राहू देऊ.......म्हणून मी माईला खोटं बोललो सकाळी....."सुयश"

 

बरं......... काळजी घे...."आप्पा"


हो आप्पा.....पण प्लिज यातलं माईला काही सांगू नका.म्हणजे मी तिला हॉटेल वर आणलं आहे ते....."सुयश"

 

बरं...... चल ठेवतो मग......"आप्पा"


हो आप्पा......आणि........येऊ आम्ही संध्याकाळपर्यंत......ओके......चला.....बाय..."सुयश"
सुयश फोन ठेवतो आणि वर जायच्या आधी तो मेडिकल मधून सॅनिटरी पॅड घेऊन जातो.


काय मग......चिरंजीव पोचले का हॉटेल मध्ये......"माई"


अगं जाऊदे ना......"आप्पा"


हो मग....मी जाऊचं देते हो.......मी कुठे अडवलं आहे.....पण मग खोटं बोलून का जायचं??? जशी काय आम्हाला कधी पाळी आलीच नाही हो........आम्ही तर ढीगभर कपडे आणि हाराभर भांडी घासायचो.......आहे ना लक्षात???"माई"


अगं हो......माहीत आहे.....पण तेंव्हाची गोष्ट वेगळी होती आणि आत्ताची वेगळी आहेत..... आपण अल्लड होतो आणि आत्ताची पिढी खूप हुशार आहे."आप्पा"


हो केवढी हुशार ते बघितलं आता...... आणि ऐकलं सुदधा......कोलंबी साफ करत होतात म्हणून मी फोन उचलून स्पीकर वर ठेवला म्हणून कळलं तरी.....लेक खोटं बोलतोय ते.....आणि तुम्ही त्याची साथ देता."माई"


जाऊदे ना.......तू चल बघू.....कांदा चिरून दे मला बारीक आज मी स्वतः तुला आवडते तशी माझ्या हातची कोलंबी कांदा करून घालतो."आप्पा"


काही गरज नाही हो......मला मस्का मारण्याची......बनवेन मी."माई"

क्रमशः

कथेचे सगळे हक्क लेखिकेकडे राखीव आहेत तरी कथा पोस्ट करायची असल्यास ती लेखिकेच्या नावासाहित करावी.

धन्यवाद????????

 

 

 

 

 

 

 

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Shravani Lokhande

Housewife

I like reading