Login

मनशांती....(भाग २)

श्रावणी लोखंडे

सुयश हॉटेलवर पोचतो.दार नॉक करतो तशी शिखा दार खोलते.तिला बघून अस वाटत होतं तिला फार त्रास आहे.शिखा दार खोलून परत बेड वर जाऊन पालथी पडते.सुयश दार लावून आत येतो आणि हलकेच शिखाची कंबर चेपून देत असतो.तेवढ्यात पुन्हा दारावर बेल ऐकू येते.सुयश उठून दार खोलतो.वर येतायेता सुयशने खालीच रूमसर्वन्ट ला गाठून एक गरम पाण्याची पिशवी आणि काही आंबट,तिखट,गोड असे थोडे फार पदार्थ ऑर्डर केले होते.तीच ऑर्डर घेऊन वेटर आला होता.हातातला ट्रे टेबल वर ठेऊन वेटर गेला.सुयशने दार लावून घेतलं.तो पुन्हा शिखाच्या बाजूला जाऊन बसला.यावेळी तो गरम पाण्याची पिशवी घेऊन हळू हळू शिखाच्या कंबरेवर फिरवत होता.कंबरेला शेक भेटल्याने ती उपडी झाली आणि वर उठून बसली पाठीमागे दोन उश्या लावल्या आणि पुन्हा थोडी मागे कमरेला बेडचा झ । आधार दिला.सुयशने ती पिशवी शिखाला कंबरच्या मागे ठेवायला सांगितली.शिखा मात्र सुयशच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघून विचार करत होती.हा माझ्यासाठी एवढं करतोय आणि मी..........मी मात्र सकाळी उगाचंच चिडले याच्यावर.......शिखा विचारातचं असते की सुयश तिच्या समोर खायची भली मोठी प्लेट धरतो.त्यात सगळं तिच्या आवडीचं होतं.सुयशने सगळ्यात आधी तिची आवडती फिरणी तिला भरवली.एक घास खाताच तिच्या डोळ्यात टचकन पाणी आलं....





काय झालं??? आता का बरं रडतेस???" सुयश"





तू माझ्या साठी किती करतोस आणि मी तुला साधं बाप होण्याचा आनंद नाही देऊ शकत........."शिखा"(एवढं बोलून  शिखा रडू लागते.)





अगं......... डोळे पूस बघू आधी.....सुयश शिखाला कुशीत घेऊन तिचे डोळे पुसतो.मी तुझ्या साठी काही चं करत नाही..... जे करतोय ते स्वतःसाठी करतोय..तू खुश असलीस ना की मी पण खुश असतो आणि आता तूच दुःखी आहे म्हंटल्यावर मला कस करमेल......चल हे सगळं सोड आणि काही तरी खाऊन घे.....घरात कामाचा जास्त लोड नको म्हणून तुला मी इथे आराम करायला घेऊन आलोय....हे घे सॅनिटरी पॅड.....आई कडे जातोय म्हंटल्यावर तू घेतलं नसशील सोबत म्हणून घेऊन आलोय.आता......... परत तू, तुझं आभार प्रदर्शन सुरू नको करू समजलं.......चल जरा आराम कर आता........."सुयश"





हम्मम........"शिखा"

 शिखा बाथरुम मध्ये जाऊन चेंज करून येते आणि गरम पाण्याची पिशवी ओटी पोटाजवळ धरून पाय गुडघ्यात दुमडून दोन्ही हातानी पाय छातीजवळ घेऊन झोपते.काही वेळ तिची होणारी तगमग सुयश बघत असतो, पण दहा पंधरा मिनिटांनंतर शिखा शांत झोपी जाते.तिला शांत झोपलेलं बघून सुयश पण हळू आवाजात टीव्ही चालू करतो आणि मॅच बघत बसतो.मॅच बघता बघता त्याचा पण डोळा लागतो.जवळपास दोन अडीच तासांनी शिखाला जाग येते.बघते तर घड्याळात साडे तीन झालेले असतात.ती पटकन फ्रेश होते आणि जेवण ऑर्डर करते.





सुयश उठ..........वाजले बघ किती!!! मी जेवण ऑर्डर केलं आहे फ्रेश होऊन घे जेवण येईलच इतक्यात.........चल उठ पटकन."शिखा"



आराम केल्यामुळे शिखा जरा तरतरीत झाली होती.पाय तेवढे कमरेपासून दुखत होते पण बाकी तिला आता बर वाटत होतं.सुयश पण उठतो फ्रेश व्हायला जातो.तेवढ्यात जेवण येतं. शिखा जेवणाची दोन ताट भरते.एक मटण थाळी आणि एक व्हेज थाळी ऑर्डर केलेली असते.मटण थाळी बघून सुयश एकदम खुश होतो.





अरे वाह....... एक नंबर शिखा....... थँक यू सो मच.......मला आज मटणचं खायचं मन होत.....मी सकाळी तोच विचार केला होता पण तुझी तब्येत ठीक नसल्याने मी तो प्लॅन कॅन्सल करून हा ठरवला....... असो......आता तर मला भूक कंट्रोल होत नाही...."सुयश"



बोलता बोलता सुयश जेवायला सुरुवात सुद्धा करतो.पण शिखा मात्र विचार करत जेवत असते.त्यामुळे तीच जेवण थंड होतं. सुयशच्या लक्षात येत ते पण तो सध्या फक्त जेवणावर लक्ष केंद्रित करतो कारण, सुयश एक खवय्या होता.त्याला नवनवीन पदार्थ खायला आणि ते घरी बनवून बघायला फार आवडायचं.त्याच जेवून झालं आणि तो हात धुवायला उठला.तरी शिखाचं लक्ष नव्हतं त्याकडे.





शिखा......ये मी भरवतो तुला......"सुयश"





आ.........काय म्हणालास......तू भरवतोस.......हम्मम ...राहूदे.... जेवते मी......"शिखा" 





कधी???? जेवणाचा बर्फ झाल्यावर???आधीच ते थंड गार केलं आहेस?? दे ते ताट इकडे...... "सुयश"





अरे नको......खरचं राहूदे......खाते मी."सुयश"





दे बोललो ना मी.......चल उठ आणि हात धुवून घे जा...."सुयश"





त्याच्या गोड........रागवण्याने शिखा हात धुवून येते.रूम मध्ये छोटा मायक्रोवेव्ह असल्याने सुयश काही सेकंद साठी थाली त्यात ठेवून जेवण गरम करून घेतो.दोघेही गॅलरीत जाऊन बसतात.





हम्मम्म.......आ करा आता....."सुयश"



त्याच्या बोलण्यावर शिखा लगेच आ करते..



एक घास चिऊ चा......एक घास काऊ चा....."सुयश"



हे काय रे???? मी लहान बाळ आहे का?? चिऊ काऊ करून भरवतोयस ते???"शिखा" (शिखा जरा लटक्या रागातच बोलते आणि हकलेच त्याच्या खांद्यावर उजव्या हाताची मूठ बंद करून त्याला लाडात मारू लागते आणि रडवेल तोंड करते..)





अरे मी मस्करी करत होतो......तू मघापासून कुठल्याश्या विचारात जेवत होतीस म्हणून म्हंटल जरा तुला हसवाव.....आता बघ किती छान दिसतेस.....चल गरम गरम खाऊन घे पटकन....... बरं वाटेल मग तुला....."सुयश"





त्याच्या या बोलण्याने डोळ्यात आलेलं पाणी टिपतच शिखा आ करते..... तसा सुयश लगेच तिला घास भरवतो.

ती पुढे बोलणारच होती की सुयश तिला थांबवतो.





जे बोलायचं आहे ते नंतर बोलू आपण......प्लिज आधी जेवून घे....."सुयश"





हम्म....."शिखा"





जेवून झालं तशी शिखा आतमध्ये जाते सुयश पण ताट ठेऊन हात धुवून येतो.काही वेळातच रुमसर्वन्ट येऊन दोन्ही ताट घेऊन जातो.शिखा बेडला टेकून वर सिलिंक कडे बघत होती.सुयश मांडीवर हात ठेवताच तिचा बांध फुटतो.





माझ्याचं बाबतीत अस का होतं?? दोन वर्षात चार वेळा मिसकॅरेज झालं?? ट्रीटमेंट चालु केली तरी पाळी काही चुकत नाही??? घुसमट होते रे माझी......"शिखा"





अगं.....तू असं वागून कसं बरं चालेल.......आपण करतोय ना ट्रीटमेंट आणि तुला हवं तसं सगळं लगेच कसं भेटेल.... वाट तर बघावीच लागणार ना!! आणि डॉक्टर म्हणाले आहेत ना.....तीन महिन्यात काही नाही झालं तर ट्रीटमेंट चेंज करू आणि तरी काही नाही झालं तर आपण आय.व्ही.एफ करू........मग तर झालं....."सुयश"





आणि समज आय.व्ही.एफ ने सुदधा काही नाही झालं तर....."शिखा"





तर.......आपण एक मुलगी दत्तक घेऊ......हा आता ते आपलं रक्त नसेल पण आपल्याला आई बाबा होण्याचं सुख भेटेल आणि तिला आई बाबा भेटतील.....पण तू एवढं नेगिटिव्ह विचार करूच नको ना!! जे होईल चांगलं होईल........एवढाच विचार कर आणि आपण अजून काही म्हातारे नाही झालोत ओके......."सुयश"





शिखा त्याच्या कुशीत शिरून खूप रडते.सुयश पण तिच्या डोक्यावरून हात फिरवत असतो.दोघेही एकमेकांच्या बोटात बोट गुंफून बसलेले असतात....सुयश टीव्ही चालू करून मुव्ही लावतो. नेमका इमरान हाश्मी चा मर्डर लागलेला असतो....सुयश चा रोख शिखाला समजतो तशी शिखा लाजून त्याच्या कुशीत शिरते.





अगं...... एवढी पण लाजू नको नाही तर माझा मूड होईल आणि आता मूड झाला तरी काही फायदा नाही त्याचा....."सुयश" (नाराजीच्या स्वरात बोलतो.) 

त्याच्या या वाक्यावर मात्र शिखाला हसू आवरत नाही.

शिखा कार्टूननेटवर्क लावून टॉम अँड जेरी बघत असते आणि हलकेच सुयश ला खांद्याने धक्का देऊन बोलते.



हे बघू आपण.....म्हणजे मनोरंजन पण होईल आणि तुझा मूड पण नाही होणार......चालेल ना!!"शिखा"



तसा सुयश तिला आणखीन जवळ घेऊन घट्ट मिठी मारतो.....मूडचं काय गं.......तू फक्त जास्त विचार करू नको बस.....सगळं ठीक होईल......एवढं बोलून सुयश शिखाच्या कपाळावर आपले ओठ टेकवतो. सुयश च्या त्या आशवस्थ आणि उबदार मिठीत तिला खूप बरं वाटतं.





दोघेही संध्याकाळी घरी जातात.जाताना सगळ्यांच्या आवडीची मटका कुल्फी घेऊन जातात.शिखाला थोडा कमरेचा त्रास होतच असतो, पण दिवसभराच्या सुयश च्या मिठीने तिला दहा हत्तींच बळ दिल होतं.शिखा फ्रेश होऊन पटकन किचन मध्ये जेवणाची तयारी करायला घेते.घरी येता येता दोघे मासळी बाजारात जाऊन बांगडे आणि पापलेट घेतात. घरी येऊन शिखा सुक्या मिरच्या आणि अख्खे धने भिजत घालते.दुसरी कडे भाताची कुकर लावते आणि मग मच्छी साफ करून त्याला कोकम आणि मीठ चोळून ठेवते.तोवर ती सुयश कडून नारळ फोडून घेते.विळी वर खोबर किसून सुकी मिरची,अख्खे धने,लसूण,ओल खोबर याच वाटणं काढते.त्या वाटणाचा सुगधं अगदी घरभर पसरला होता.इतक्यात शेजारच्या जरते काकू येतात....



काय मग??? आज सूनबाईंच्या हातची मासळी स्पेशल आहे वाटतं...."जरते काकू"





हो काकू......पण अजून तरी कच्च आहे हां सगळं......म्हणजे वहिनींनी फक्त मसाला वाटून घेतला आहे...... आणि तुम्हाला फोडणीच्या आधीच वास कसा गेला हो काकू.........."निमेश"(निमेश काकूंची चेष्टा करत बोलला.)





मी बाई असाच अंदाज लावला हो.....बरं चला येते हां...... शिखा.....अगं जरा........वाटीभर कालवण मला पण दे हो.....तेवढीच जरा चव येईल तोंडाला......."जरते काकू"





हो  काकू......नक्की देईन."शिखा"



काकू घरी जातात तसा नितेश म्हणतो.....वहिनी  जरा...... वाटीभर कालवण म्हणजे नक्की किती ओ??? त्याच्या या बोलण्यावर सगळे हसतात..





शिखाची किचन मध्ये गडबड चालू असते.बांगड्यांच्या डोक्याच कालवण,बांगडा फ्राय आणि भरलं पापलेट,सोबत नरम नरम अगदी आरपारचं पण दिसेल अशी  भाकरी...... त्यात जेवण पचायला म्हणून फोडणीची सोलकढी.......अस सगळं जेवण बनवून किचन आवरून शिखा तोंडावर पाणी मारायला रूम मध्ये येते.बराच वेळ किचन मध्ये उभी असल्याने आणि कामाची गडबड असल्याने तिच्या अंगावरून खूप गेलेलं असतं. पण कामात ती याकडे दुर्लक्ष करते. पण आता रूम मध्ये येऊन चेंज करून जरा बेड वर अंग टाकते.अर्ध्या तासाने माई जेवणाची ताट घ्यायला किचन मध्ये येतात.भांड्यांचा आवाजाने शिखा उठते आणि किचन मध्ये जाते.दोघी मिळून जेवणाची ताट घेतात.माई वाढायला घेतात. एक वाटी भरून निमेश ला जरते काकूंकडे देऊन यायला सांगतात.





निमेश दार ठोकतो ......



काय रे निमेश......"जरते काकू"





काही नाही काकू.......जरा.....वाटीभर कालवण घेऊन आलोय......."निमेश"



अय्या...... खरचं का??? मी तर मस्करी करत होते....शिखा पण ना!!! "जरते काकू"



बरं..... मग घेऊन जाऊ का???"निमेश"



अरे नको......आता आणलं आहेसच तर दे......परत घेऊन गेलास तर उगीच पोरं नाराज होईल......."जरते काकू"





निमेश हसत हसत वाटी देतो आणि घरी येतो.जरते काकूंची रूम समोरच असल्याने त्यांचं संभाषण हे चौघेही ऐकतात आणि हसत असतात.



वहिनी उगाच दिलंत त्यांना कालवण त्या तर म्हणत होत्या.....मी मस्करी करत होते."निमेश"



असुद्या ओ भाई........म्हातारं माणूस आहे....त्यात त्या एकट्याच राहतात.मुलगा बाहेरगावी राहतो.मागे म्हणत होत्या लग्न करून तिकडेच सेटल झालाय....महिन्याला पुरून उरतील एवढे पैसे पाठवतो......पण या वयात पैशांपेक्षा आधाराची जास्त गरज असते.शेजार चांगला असला की माणूस रमतो त्यात....."शिखा"



शिखाच्या बोलण्याला आप्पा पण दुजोरा देतात.चेष्टा मस्करी करत सगळे जण आपापलं ताट फस्त करून तृप्तीचा ढेकर देतात.जेवून झाल्यावर शिखा सगळं आवरून घेते तोवर माई सगळ्यांसाठी आईस्क्रीमच्या प्लेट भरतात.शिखा मात्र आईस्क्रीम न खाताच आंघोळीला जाते. माई आईस्क्रीमची भांडी हिसळून ठेवतात.शिखा पण आंघोळ करून टिफिन साठी कडधान्य भिजत घालायला येते तर माईंनी आधीच मूग आणि मटकी भिजत घातलेली असते.गॅसची बटणं चेक करून शिखा तिच्या खोलीत झोपायला जाते.दिवसभराचा आराम आणि संध्याकाळची गडबड यातच तिला पटकन झोप लागते.





कालपेक्षा आज तिला थोडं बरं वाटत होतं. सकाळी उठून नेहमी सारखीच तिची धावपळ सुरू होती.सकाळची सगळी काम पटापट आवरून दुपारची जेवणाची तयारी कपडे भांडी ही नेहमीची काम करून दुपारी शिखा जरा पडली होती.तेवढ्यात तिच्या फोन ची बेल वाजते.



हॅलो........कोण??"शिखा"





मी डॉक्टर सुर्वे यांची असिस्टंट नीता बोलते......तुम्ही बाळासाठी ट्रीटमेंट घेताय ना......त्याची चौकशी करण्यासाठी कॉल केला होता...."नीता"





हो मॅडम बोला ना...."शिखा"



डॉक्टरांनी तुम्हाला फोन करून तुमची मासिक पाळी आली आहे की नाही ते विचारायला सांगितलं होतं."नीता"





हो......आली आहे......आज दुसरा दिवस आहे....."शिखा"





बरं.... मग तुम्ही चौथ्या दिवशी डॉक्टरांना भेटून जावा...."नीता"





ओके मॅडम.....थँक यू......"शिखा"





वेलकम मॅडम......"नीता"



संध्याकाळी सुयश घरी आल्यावर जेवण वैगरे आटपल्यावर शिखा डॉक्टरांच्या असिस्टंटच्या फोन बद्दल सांगते.आणि चौथ्या दिवशी बोलवलं आहे ते पण सांगते.सुयश शिखाला काही पैसे देऊन ठेवतो. चौथ्या दिवशी शिखा डॉक्टरांना भेटून येते.डॉक्टर त्या दोघांच्याही गोळ्या बदलून देतात. सोबतच सातव्या आठव्या आणि नवव्या दिवशी संबंध ठेवण्यास सांगतात.नवव्या दिवशी संबंध ठेवला की दहाव्या दिवशी सोनोग्राफी करून शुक्राणूंनी गर्भात प्रवेश केला की नाही ते बघणार असतात.





डॉक्टरांशी सगळं सविस्तर बोलून गोळ्या घेऊन शिखा घरी यायला निघते.वाटेत तिला जरते काकू भेटतात.

शिखाची आणि काकूंची ट्युनिंग छान असते.शिखा माईंपेक्षा काकूंकडे आपलं मन हलकं करायची.कारण किती चांगल्या असल्या तरी माईंचा जास्तीचा स्वभाव तिला पटायचा नाही कारण त्या घरात एक बाहेर एक आणि सुयश समोर एक अस वागायच्या पण सुयश सोबत असल्याने ती फार लक्ष नाही द्यायची.





दोघी एका गार्डन मध्ये बसतात.शिखा दोन भेळ घेते.आणि डॉक्टरांनी जे काही सांगितलं ते थोडक्यात काकूंना सांगते.





शिखा........एक काम कर.....आज तुला चौथा दिवस आहे ना......मग तुम्ही आजच संबंध ठेवा...ओल्यावर्ती संबंध ठेवल्याने लगेच गर्भधारणा होते......अस आमच्या वेळी म्हणायचे....... म्हणून तर वर्षातच दोनदा पाळणा हलायचा.बघ एकदा हे पण करून."जरते काकू"





शिखाला पण काकुंच म्हणणं पटतं. सगळं करून झालं आता हे पण एकदा करून बघू.....अस म्हणून इकडच्या तिकडच्या गप्पा मारून दोघी भेळ संपवतात आणि घरी पोचतात.



क्रमशः



कथेचे सगळे हक्क लेखिकेकडे राखीव आहेत तरी कथा पोस्ट करायची असल्यास ती लेखिकेच्या नावासाहित करावी.



धन्यवाद????????