Jan 23, 2022
वैचारिक

पुरुष आणि शरीर सुख भाग 3

Read Later
पुरुष आणि शरीर सुख भाग 3

Comments चा आधार घेऊन थोड स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न....

     सागरला सोनल मधे intrest होता म्हणून त्यांचं नात पुढे गेलं अस नाही त्यांचं प्रेम होत तितकं त्याला पुरेस नव्हतं... सोनल मधे सगळ काही होत... पण सागरला फक्त शरीर सुख हवं होत....? म्हणून त्याने माधुरी सोबत संबंध ठेवले तो पुरुष म्हणून ठीक असता तर तो त्याच्या बायको सोबत म्हणजेच सोनल सोबत तितका विश्वासू वृत्तीने वागला असता...... त्याला नात्यासी घेणं देणं असत तर इतक्या कठीण परिस्थिती मधे त्याने सोनल ला साथ दिली असती....? माधुरी कडे कोणी नाही म्हणून बायकोला अश्या अवस्थे मधे सोडून तो गेला नसता.... म्हणूनच शीर्षक अस दिल की पुरुष आणि शरीर सुख कारण. त्याला फक्त शरीर सुख हवं होत त्यासाठी त्याने जन्माला घातलेलं बाळ पहायचं सुद्धा त्याला इच्छा झाली नाही......

त्याला मिळालेल्या संधीचा फायदा घ्यायचा होता... सोनलच्या त्या अवस्थे पेक्षा त्याला त्याच सुख महत्वाचं होत.. त्याच माधुरी सोबत संबंध ठेवण म्हणजे फक्त शरीर सुखाची भूक भागवणयासाठी च होत...... आणि माधुरीचे तो एक सागर हाच नाही तर अनेक असे पुरुष जे तिला आर्थिक सुख देतील ती त्या प्रत्येका साठी तयार असायची तिचे असे अनेक पुरुषाशी संबंध होते.....ती चांगल्या ठिकाणी राहत होती तिचे वडील एका प्रतिष्ठित कॉलेज वर शिपाई आहेत.... तरीही तिला हे का करावं असं वाटतं आहे सोनल सारख्या अनेक मुली माधुरी सारख्या मुली मुले घरात नरक यातना भोगत आहेत...... अशा माधुरी सारख्या मुली  आणि सागर सारखे पुरुष या समाजाला कीड आहे..... अशा खूप स्त्रिया आहे ज्यांचे पती extra marital affairs  करत आहेत त्यांना सत्य कळायला पाहिजे म्हणून हा अनुभव लिहायचा प्रयत्न केला कथा कथित नाही खरी आहे मांडण्यात चूक झाली असेल ते माफ करा पण शब्द आणि शब्द खरा आहे......

वयाने लहान आहे तुमचे अनुभव खूप गरजेचे आहे सकारात्मक comments लिहायला अजून प्रोत्साहन देतील आणि नकारात्मक अजून जास्त आणि चांगल लिहायला मदत करतील..... नक्की सांगा तुम्हाला काहीही चुकीचं वाटलं तरीही 


ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Darshana Sushir

student

Satisfied innocent and very clear about my career I tried best to write