Feb 26, 2024
नारीवादी

मानपान

Read Later
मानपान
*मानपान *

स्वयंपाक घरातून सुरेखा बाईंची चाललेले भुणभुण रमेश रावांच्या कानांवर येत होती.
ते व मुलगी सोना दोघ हॉलमध्ये चहा पीत बसले होते. सोना च्या कानांमध्ये इयरफोन होते त्यामुळे तिला ऐकू येत नव्हते.

रमेश रावांनी आत येऊन सुरेखाबाई ना विचारलं" सून शिल्पा च्या आई च्या 61व्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला जाऊन आल्यापासून मी पाहतोय तुझं काहीतरी बिनसलंय …कोणी काही बोललं का तुला"??
\"मला कोणी का--ही बोललं नाही.\"

मी म्हणते कौतुक करावं, पsण त्याला काही मर्यादा??,\"
अगं त्यांच्याच कौतुक सोहळा होता ना मग प्रत्येक जण चांगलंच बोलणार.
तू पण तर 61वातीकरून ओवाळले, 61 रुपयाचा हार केला होता.
हो-- ते तेवढे पुरलं कां पण??
"म्हणजे"
अहो-- किती महागडी साडी घेतली शिल्पा ने त्यांच्यासाठी! आता या वयात कुठे घालून मिरवणार आहे त्या दहा हजाराची??

"अच्छा हे सलतंय मनात वाटतं?" रमेश रावांच्या लक्षात आले आता समजूत घालायला गेल म्हणजे आगीत तेल ओतण्याचे सारखे असं समजून ते बाहेर येऊन बसले.

सोनाला बिस्किट हवे होते म्हणून ती दारात उभी होती तिच्या कानावर सर्व गोष्टी पडल्या.
तिला आश्चर्य वाटले ,
"आई काय बोलते तू हे"??
अगं वहिनीच्या आईच आहेत त्या त्यांच्यासाठी वहिनीने घेतली साडी तर काय बिघडलं?? किती कठीण आयुष्य काढले आहे त्यांनी.
"आई , वहिनी सांगत होती ना --तिचे बाबा घरदार सोडून निघून गेले . सर्वांची जबाबदारी पार पाडत आईंनी वहिनीला व तिच्या भावाला लहानाचं मोठं केलं".
\"आता कुठे त्या निवांत झाल्या. काहीच हौस नाही झाली त्यांची. वाढदिवसाच्या निमित्त्याने त्यांच जरा कौतुक केल तर काय बिघडलं\"??

अगं" हो हो हो त्यांचं कौतुक मलाही आहे.
" लग्नात दिली होती कि भारी साडी आपण.\""
"हो एकच नां?? आणि ती पणतुझ्या बजेटमध्ये बसेल अशी"
अग मी पाहिलं तेव्हा,\" त्या मुलीच्या आई त्यांना 2 आणि तू मुलाची आई म्हणून तुला पाच साड्या\"?.
"अगं रीतच आहे तशी, सुरेखा ताई म्हणाल्या"
\"कोणी बनवल्या ह्या रीती\"?? किती कराव मुलाच्या आईचं कौतुक?
" मी बनवली का ही पद्धत"?? सुरेखा ताई चिडून म्हणाल्या.
ती पूर्वापार आहे.
हो पण आता थोडी बदलायला नको कां??
तूच म्हणतेस ना आई, आज-काल मुलाच्या आई-वडिलांना मुलाच्या लग्नाची जास्त काळजी मुली मिळतातच कुठे?
मग या न्यायाने तर ----
सुरेखा ताईंचे लक्ष आपल्या बोलण्याकडे नाही हे पाहून सोना उठून आपल्या खोलीत निघून गेली.
पण--तिच्या डोक्यात न तो विषय काही जात नव्हता.

सकाळी सकाळी समीरचा फोन--- कॉफी हाऊस मध्ये ये मी तुझी वाट पाहतो आहे.
सोना कॉफी हाऊस मध्ये समीरच्या समोर.
तिला आलेली पाहून त्याने कॉफी ऑर्डर केली .
"समीर मला आपल्या लग्न विषयी बोलायचंय.
"बापरे नाही म्हणायचं की काय"?
\"काहीतरी नको बोलू \"लटक्या रागाने सोना म्हणाली.मला लग्न साधेपणाने करावे असे वाटते.
\"अगदी माझ्या मनातलं बोलली. "अरे आमच्या घरी लग्नाच्या आहेराच्या याद्या तयार होत आहेत एकूण खर्च पाहून मला खूपच नर्व्हस वाटू लागले.

समीर तुमच्या घरी ही तयारी होत असेल?
\"हो --पण त्याच बाबतीत मला तुझ्याशी बोलायचे आहे\".

दोन वर्षांपूर्वी ताईचं लग्न झालं. वर पक्षाचे लोक बाहेर गावाहून येणार म्हणून स्वागताची छान तयारी आमच्या ऐपतीप्रमाणे, सर्व रितीप्रमाणे केल.
पण ---तरीही बऱ्याच कुरबुरी झाल्या, आहेरावरून ,स्वागता वरून, मानपान, अशा अनेक छोट्या गोष्टींवरून मोठे मोठे वाद झाले. वर पक्षाचा मान ठेवता ठेवता आम्हाला मान खाली घालावी लागली.
तेव्हाच ठरवले मी, माझ्या लग्नात या सर्व प्रथांना काट द्यायची .
आपलं एकच गावं आहे म्हणून कार्यालयाच्या भाड्या पासून सर्व खर्च फिफ्टी-फिफ्टी.

तुझं म्हणणं पटतंय पण, तुझ्या घरच्यांना चालेल का?
त्यांना ही मुलाच्या लग्नात हौस करायची असेल ना?
आईचंच म्हणणं आहे .तिला याबाबत बोलायच आहे तुझ्या आईबाबांशी.

सकाळी सोना उठली तेव्हा आई बाबा लग्नाच्या आहेरच्या याद्या करत होते.
"सोना तुझ्या सासूला पाच साड्या व आणि तोंड धुण्याच्या-\"--
आई ,बाबा--- आज समीर सकाळी भेटला होता, त्याला या सगळ्या विधी नकोय.
"म्हणजे काय ?अग पद्धत आहे!
, आई ,समीर च्या आईला तुझ्याशी बोलायचे आहे याबाबत . त्या येणार आहे.
"अगबाई अजुन काही मागण्या आहेत कि काय वरपक्षाच्या"?

संध्याकाळी समीरच्या आई आल्या , चहा पाणी झाल्यावर त्या म्हणाल्या "विहीण बाई पायघड्या, पायधुण, वरदक्षणा या अशा काही रीती आता बदलायला हव्यात,
अहो पण आलेले बाकी पाहुणे काय म्हणतील?
काय आहे न सुरेखा ताई आपल्या ला पटल तर इतरांना नक्की पटवून देऊ.
अहो मुलांच्या आईचा मान मोठा असे मानून वधूपक्षाने हात जोडत रहावं हे मला पटत नाही त्या पेक्षाआपण प्रेमाने गळाभेट द्यावी . मानपान करण्या ऐवजी मान सन्मान महत्वाचा.
दोन्ही पक्ष समसमान आहे.
समीर चे ही हेच मत आहे.

विहीण बाईं चे विचार ऐकून, "आपण व नव्या पिढीच्या मुलांनी पुढाकार घेतला तर नक्कीच हा सुखद बदल घडेल असा मला विश्वास आहे.
याद्यांची वही बंद करत रमेश राव हात जोडत म्हणाले. -
----------------------------------------
लेखन.सौ.प्रतिभा परांजपे








ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//