मनोज मुन्तशीर

' ओ देस मेरे ' सारखं देशभक्तीपर गीत आणि ' ओ हमसफर ओ हमनवा,' ' तेरी गलियां ' सारखी Love Songs ज्यांच्या लेखनातून साकारली, अशा Versitile गीतकार मनोज मुन्तशीर यांच्या बद्दल दोन शब्द.
      काही गीते आपल्याला नुसती आवडत नाहीत, तर मनापासून भावतात. अगदी काळजाला भिडतात. अशी भावना निर्माण होण्यात जसे आपल्या तरल, सुमधुर आवाजात ते गीत गाणाऱ्या गायक / गायिकेचे श्रेय असत त्याचप्रमाणे रसाळ, भाव पूर्ण शब्दांत अशा गीताची रचना करणाऱ्या गीतकाराचेही असते. असेच एक गीतकार म्हणजे - मनोज मुंतशीर सर.

     मनोज मुंतशीर यांनी ' तेरी मिट्टी,' ' ओ देस मेरे' ' कौन है वो,' ' तेरी गलियां,' ' तेरे संग यारा,' ' ओ हमसफर ओ हमनवा ' यांसारखी अत्यंत दर्जेदार, श्रवणीय गीते लिहिली. 
       अर्थपूर्ण, हृदयस्पर्शी शब्दरचना, आणि भाषेवरील प्रभुत्व ही त्यांच्या गीत लेखनाची विशेषता. तेरी मिट्टी या गीतात युध्दावर चाललेला सैनिक आपल्या दु:खी कष्टी झालेल्या आईची समजूत काढताना म्हणतो

" ओ माई मेरी, क्या फिक्र तुझे,
   क्यू आंख से दरिया बहता है ?

    तू कहती थी तेरा चांद हू मैं,
    और चांद हमेशा रहता है |"   

किती खोल अर्थ दडलेला आहे, या काव्यमय शब्दांत ! तो तेजस्वी चंद्रमा आपल्याला आकाशात नेहमीच दिसतो, मात्र तो इतका दूर आहे की आपण कधीच त्यांच्यापर्यंत पोहोचू शकत नाही. 
तसंच युद्धात जर मरण पत्करावं लागलं, शरीराने तुझ्याकडे परतून येता नाही आलं, तुझ्या जवळ कायम राहता‌ नाही आलं तरी ; ज्याप्रमाणे चंद्र आकाशात नेहमी असतो, तसाच मी इथून दूर त्या आकाशापारच्या‌ दुनियेत तेजस्वी ताऱ्याच्या रूपात तुला कायम दिसत राहील, असंच जणू त्या सैनिकाला सांगायचे असेल.

भारतीय आर्मीतील निधड्या छातीचा जवान भारतमातेला उद्देशून, आपलं प्रेम, श्रद्धा व्यक्त करीत म्हणतो 

      " जीने की इजाजत दे दे,
      या हुक्म ए शहादत दे दे
       मंजूर हमे, जो भी तू चुनें |

       रेशम का हो मधुशाला
       या कफन सिपाही वाला
      ओढेंगे हम जो भी तू बुने | "

" माझं हे सारं आयुष्य मी तुझ्या चरणी अर्पण केलं आहे. आता तुझ्यासाठी जगणं किंवा वेळ पडलीच तर तुझ्याचसाठी मृत्यूला सामोरे जाणं, जे काही तू निवडशील ते मी हसत हसत स्वीकारेल. तुझे प्रतिक असलेल्या प्राणप्रिय तिरंग्यात माझं शरीर लपेटून घेणं हे मी माझं थोर भाग्य समजेल." आर्मीतील सर्व शूरवीर जवानांचे मनोगतच मुन्तशीर सरांनी अगदी यथायोग्य शब्दांत, देशप्रेमाने ओतप्रोत भरलेल्या शब्दात मांडले आहे‌.
अशा रोमांचकारी, भेदक शब्दांत देशभक्तीपर गीते लिहीणारे मुन्तशीर सर भाव गीते ही तितक्याच ताकदीने रचतात. " तेरी गलियां,' ' तेरे संग यारा,' ' ओह हमसफर ओ हमनवा ' ही नितांत सुंदर, हळूवार भावगीते ही त्यांच्याच समर्थ लेखणीतून उतरलेली आहेत.

' ओ हमसफर, ओ हमनवा ' या गाण्यातील

" पास मै तुम्हे 
देख लूं करीब हे
ऑंखो को ये राहते
मिलती है नसीब से "

या ओळींत प्रेयसीची आतुरता, आणि आपल्या साथीदाराबद्दल च्या हळूवार प्रेम भावना जाणवतात. ज्यांच्या लेखनातून एकीकडे आर्मीतील जवानांचे शौर्य, मातृभूमी वरील प्रेम प्रकट होते, त्यांच्याच लेखनातून प्रेमीयुगुलांच्या कधी गोड, हळूवार तर कधी श्रोत्यालाही अलगदपणे भावविवश करून सोडणाऱ्या भावनाही उस्फुर्तपणे दिसून येतात. अशा या माता सरस्वतीचा वरदहस्त लाभलेल्या अत्यंत Versitile, Brilliant, आणि सिद्धहस्त लेखकाला वाढदिवसाच्या जरा उशीराने का होईना ; पण अगदी मन:पूर्वक शुभेच्छा.

Belated Happy Birthday, Manoj Muntashir Sir 
धन्यवाद 

https://prathamwebblogs.wordpress.com/2023/02/28/%e0%a4%ae%e0%a4%a8%e0%a5%8b%e0%a4%9c-%e0%a4%ae%e0%a5%81%e0%a4%a8%e0%a5%8d%e0%a4%a4%e0%a4%b6%e0%a5%80%e0%a4%b0

@प्रथमेश काटे