Feb 06, 2023
Readers choice

चॅम्पियन ट्रॉफी मनोगत

Read Later
चॅम्पियन ट्रॉफी मनोगत


ईरा चॅम्पियनशिप ट्रॉफी स्पर्धेची घोषणा झाली . मला उत्सुकता लागली .हे सर्व माझ्यासाठी नवीनच होते..

आमची दहा जणींची टीम तयार झाली. आणि" शब्दबंध" नाव सुचवले .अगदी नावातच आहे "बंध" तसे आमच्या टीममध्ये अगदी आनंदाने आणि उत्साहाने आमचे "बंध" जुळत होते .तसेच भरभरून कौतुक देखील झाले .आनंद गगनात मावत नव्हता .खूप काही शिकायला मिळाले. आमची कॅप्टन सारिका ताईने तर सर्वांना खूप समजून घेतले .ना भांडण ,ना तंटा, रुसवा-फुगवा काहीही नाही. वेळोवेळी आम्हाला सर्वकाही आठवण करून देत होती. ती थोडी टेन्शन घेत होती . पण, सर्वकाही योग्य पद्धतीने सांभाळले .सतत सर्वांना प्रोत्साहन देत होती .

माझा पहिलाच प्रयत्न .पण ,आमच्या टीमने अगदी समजुतदारपणाने सांभाळून घेतले .मी मुलाखत घेतल्यानंतर तर मला माझ्या टीमने केलेल्या कौतुकाने आनंदाने ऊर भरून आला खूप छान वाटलं .

संजना मॅडम, निशा मॅडम, योगिता मॅडम, आणि पूर्ण ईरा टीम यांचे मी आभार मानते .आणि स्पर्धा आयोजित केल्याबद्दल धन्यवाद करते .आमच्या टीमला नेहमी प्रोत्साहन देणारी समजून घेणारी सर्वोत्कृष्ट लेखिका कॅप्टन सारिका ताई नेहमी प्रोत्साहन देणाऱ्या सपोर्ट करणाऱ्या शितल मॅडम ,डॉ किमया मॅडम, अश्विनी मॅडम, शगुफ्ता मॅडम ,पार्वती मॅडम ,कल्याणी मॅडम ,स्वप्ना मॅडम स्नेहल मॅडम यांचे मी मी खूप खूप कौतुक करते. वेळोवेळी आपली कामगिरी योग्य पद्धतीने पार पाडली, म्हणून धन्यवाद आणि आभार मानते.

पूजा चौगुले.
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Pooja