प्रस्तुत कथा ही काल्पनिक असून त्यात नाव,गाव,
स्थळ,प्रसंग,जीवित अथवा मृत्यूशी संबंध आला तर तो योगायोग समजावा.
स्थळ,प्रसंग,जीवित अथवा मृत्यूशी संबंध आला तर तो योगायोग समजावा.
शीर्षक: मनोभूमीतले युद्ध भाग-७
सकाळी शुभाला अचानक एक फोन आला आणि त्यामुळे तिने उचलला आणि समोरच्या व्यक्तीशी तिने हसतच बोलायला सुरुवात केली होती.
आज ती घरीच थांबणार होती.कारण जास्त काही काम नव्हते आणि तिला आज सुट्टी घ्यावीशी वाटत होती.
विपुलनेही त्यासाठी काही हरकत घेतली नव्हती.
विपुलला ती आज सोबत नसल्यामुळे तिची आठवण झाल्यामुळे तो खूप वेळ तिला फोन लावत होता पण तिचा फोन दुसऱ्या कोणत्यातरी फोनवरती बोलत आहे असेच सारखे सांगत होते.
शुभाने विपुलचा येणारा कॉल बघून सुद्धा त्याच्याशी आरामात बोलू म्हणून तिने त्याच्या फोनकडे दुर्लक्ष केले.
क्षणाक्षणाला विपुलचा राग वाढत होता आणि तो तसाच आपल्या ऑफिसच्या बाहेर पडला.
क्षणाक्षणाला विपुलचा राग वाढत होता आणि तो तसाच आपल्या ऑफिसच्या बाहेर पडला.
अवघ्या वीस मिनिटांमध्ये तो घरी आला. धाडकन आपल्या खोलीचा दरवाजा उघडल्याचा आवाज आल्याने शुभा घाबरली आणि तिच्या हातातून फोन खाली पडला.
" कोणाशी बोलत होतीस तू ? तुला मी एवढा उशीर झाला फोन करतोय. माझा फोन का घेतला नाहीस तू?"
शुभाजवळ जाऊन विपुल जोरात ओरडून बोलायला लागला.
शुभाजवळ जाऊन विपुल जोरात ओरडून बोलायला लागला.
त्याचा राग आणि वाढलेला आवाज पाहून शुभाला धडकीच भरली. तिच्या तोंडातून काही शब्दच निघत नव्हते.
पुढे जाऊन विपुलने खाली पडलेला तिचा मोबाईल उचलला आणि त्याच्यावर कॉल हिस्टरीमध्ये सर्वात वरती तिच्या वडिलांचा नंबर होता. त्याने त्याकडे दुर्लक्ष केले आणि त्याच्याखाली थोड्या वेळापूर्वी म्हणजे जेव्हा तो फोन करत होता तेव्हा रितेश असे नाव वाचून रागाने त्याचे डोळे लाल झाले होते.
" म्हणजे यासाठीच तुला घरी थांबायचं होतं. मला वाटलं होतं तुला आराम करायचा असेल म्हणून मी तुला घरी थांबण्यासाठी सांगितलं. मी काळजीने सारखा तुला फोन करत असताना तू माझ्या फोनकडे दुर्लक्ष केलेस.
कधीपासून हे चालू आहे? एक मिनिट ... म्हणजे काही महिन्यांपूर्वी तो आपल्याला बागेत भेटलेला होता तेव्हा तो योगायोग नव्हता. कारण तुलाच भेटायला आला असणार. बरोबर ना ? " रागात आपण काय बोलतोय हे विपुलला समजतच नव्हते.
कधीपासून हे चालू आहे? एक मिनिट ... म्हणजे काही महिन्यांपूर्वी तो आपल्याला बागेत भेटलेला होता तेव्हा तो योगायोग नव्हता. कारण तुलाच भेटायला आला असणार. बरोबर ना ? " रागात आपण काय बोलतोय हे विपुलला समजतच नव्हते.
" तुम्ही काय बोलत आहात हे तुम्हाला तरी समजते का ? त्या दिवसानंतर मी आत्ताच त्याच्याशी बोलत आहे.आपले तर बागेत जायचे अचानक ठरले होते ना? " शुभाला आपल्या चारित्र्यावर संशय घेतलेला पटला नव्हता म्हणूनच ती बोलली.
" तू खोटं तर बोलत नव्हतीस ना आणि आज मी बोलल्यावरती बरा तुला राग आला. पहिली गोष्ट जर तुझी चुकी नव्हती तर तुला पटकन त्याचे नाव सांगायला काय झालं होतं? तू घाबरली का होतीस ? दुसरी गोष्ट अशी की तुझा नवीन मोबाईल नंबर त्याच्याकडे गेलाच कसा? तुझ्या नवऱ्यापेक्षा त्याचा फोन तुला जास्त महत्त्वाचा असूच कसा शकतो? याच्यावरूनच तू खोटे बोलत आहेस हे समजते." त्याला तिच्या बोलण्यावरती थोडासा सुद्धा विश्वास राहिलेला नव्हता असाच तो आरोप करत होता.
" तुम्हाला माझ्यावरती विश्वास नाही का?" तिने एकच प्रश्न केला.
"हो, नाहीये कारण शुभा, तू पटकन उत्तर दिले नाहीस. दुसरी गोष्ट अशी की मघाशी मी विचारल्यावर तू काहीतरी लपवत असल्यासारखे भाव तुझ्या चेहऱ्यावरती दिसत होते."
"काय माहिती तुझे आणि रितेशचे आधीपासूनच प्रेम संबंध होते पण आता इथे तुला सर्व गोष्टी मिळत आहेत म्हणून तुम्ही दोघांनीही मला अंधारात ठेवले." काळजावर वार करण्यासारखे तो बोलत होता.
ज्या व्यक्तीशी आपण लग्न केलं ती चांगली व्यक्ती होती आणि आत्ता जो मला असे प्रश्न विचारतो तो कोणी वेगळाच व्यक्ती वाटत आहे, असे त्याच्या देहबोलीवरून आणि त्याच्या डोळ्यांतील तिच्याबद्दलचा अविश्वास बघून शुभाला वाटले.
" मला काही गैरसमज वगैरे झालेला नाहीये. माझ्या फोनकडे दुर्लक्ष करण्याचे तुझ्याकडे काहीच कारण नव्हते आणि मला वाटतं तुझ्या वडिलांना पण हे नातं पसंत नसणार आहे. म्हणूनच त्यांनी माझ्या गळ्यामध्ये तुला बांधले." त्याच्या प्रत्येक बोलण्यामधून गहिरे आणि विषारी विचार वाहत होते.
" तुम्ही काहीही बोलत आहात. रितेश फक्त माझा मित्र आहे. बाकी आमच्यामध्ये दुसरं काही नाहीये उलट त्याचं लग्न ठरलं आहे. म्हणूनच त्याने काल सोशल मीडिया अकाऊंटवर मेसेज करून माझा नंबर मागितला. तो चांगला मुलगा आहे म्हणून त्याला माझा नंबर दिला. फोन करून मला त्याच्या जोडीदाराबद्दल माहिती देत होता. खूप दिवसांनी बोलत असल्याने मी त्याच्याशी बोलत होते आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला फोन करणारच होते पण तेवढ्यात बाबांचा फोन आला होता." ती तिच्यापरीने त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न करत होती.
" वाह! म्हणजे तो आता दुसऱ्या मुलीला फसवत आहे आणि तू मला फसवत आहे. म्हणजे दोघांनी मिळून चांगली योजना बनवलेली आहे." विपुल जोरात टाळ्या वाजवत कुत्सितपणे हसत शुभाला म्हणाला.
" बस्स.. मी आता अजून काही ऐकून घेणार नाही खूप झाले." शुभाला आता पुढचे काहीच ऐकून घ्यायचे नव्हते.
" तुझ्याकडे काय पुरावा आहे की तुमच्या दोघांचे प्रेम संबंध नाहीयेत बोल?" विपुलने तिला प्रश्न केला.
" तुम्हाला जर माझ्यावरती विश्वासच नाहीये तर या नात्यात राहून काहीच फायदा नाही. मी अजूनही तुम्हाला सांगते की माझं त्याच्यावर प्रेम नाहीये त्याच्यावरती जर माझं प्रेम असेल तर मी तुमच्याशी लग्न का केलं असतं ? एवढीशी साधी गोष्ट तुम्हाला का समजत नाही?" तिने पुन्हा समजुतीच्या स्वरात त्याला सांगण्याचा प्रयत्न केला.
" सगळ्या स्त्रिया एकसारख्याच असतात दुसरा भेटला की पहिल्याला सोडतात." असे म्हणून डोक्याला धरून चक्कर येऊन विपुल खाली कोसळला.
त्याला काय झाले म्हणून तिला भीती वाटायला लागली आणि बाहेरच निखिल होता तर त्याला फोन करून तिने त्याला हॉस्पिटलमध्ये नेण्यासाठी मदतीसाठी बोलावले.
डोक्यावर जास्त ताण आल्याने तो बेशुद्ध झालेला होता आणि त्यासाठी त्याला थोडा वेळ लागणार होता. तीच वेळ साधून शुभाने निखिलला बोलावले.
" निखिल भाऊ, मला खरं काय ते सांगा. तुम्ही त्यांच्यासोबत सतत असता. त्यामुळे हे असे का वागत आहेत ते सांगा? मला काहीचं कळत नाही. माझ्या चारित्र्यावर त्यांनी बोट ठेवले आहे. तुम्हांला ही मी अशीच वाटते का?" तिच्या डोळ्यांतील पाणी दुःखाश्रू बनून गालांवर ओघळले होते आणि भावनिक होऊन तिने आपल्या नवऱ्याबद्दल विचारले.
" मॅम, तसे काही नाही सरांना गैरसमज झालेला आहे. ते थोडे रागात आहेत.त्यामुळे काहीही बोलत आहेत." निखिलने नजर चोरत सांगितले.
" जर माझ्या जागी तुमची बहीण असती तर तुम्ही हेच उत्तर दिले असते का? नक्कीच काहीतरी आहे. तुम्ही आत्ता पण मला डॉक्टरकडे जाऊन दिले नाही. त्यामुळे तुमच्यापुढे हात जोडते पण खरं काय ते मला कृपा करून सांगा." ती थोडी रागात आणि रडत म्हणाली.
आता समोर काही पर्याय नसल्याने निखिलने विपुलबद्दल सांगायला सुरुवात केली.
त्याने जे काही सांगितले ते ऐकून शुभाच्या पायाखालची जमीनच हादरली.
क्रमश:
निखिलने शुभाला काय सांगितले असेल ?
© विद्या कुंभार
कथेचा भाग कसा वाटला हे कमेंट करून सांगा.
सदर कथेचे हक्क हे लेखिकेकडे आहेत त्यामुळे कॉपी करून इतर ठिकाणी पोस्ट किंवा युटुबसाठी वापरू नये अन्यथा कायदेशीर कारवाही करण्यात येईल ह्याची नोंद घ्यावी.
अष्टपैलू लेखक स्पर्धा २०२५
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा