Feb 23, 2024
नारीवादी

मंजू

Read Later
मंजू


मंजू खूप समजदार बायको, गृहिणी, आई, सून आणि वहिणी होती .

मंजूला चांगले असण्यापेक्षा समजदार असने स्मार्ट असणे जास्त योग्य वाटत , ती नात्याला जास्त प्राधान्य देत, हो पण स्वतःच्या मताला ही प्राधान्य देत. ती समस्येला समस्या समजतच नसत, म्हणून की काय तिच्या कडे प्रत्येक समस्येचे solution असत, कोणाला काही अडचण असली की घरातले सगळे मंजू वहिनी कडे धाव घेत.

मंजू नेहमी सगळ्या नात्यांची जुळवाजुळव करतांना नेहमी एक पाऊल पुढेच असत, तिचा हा गुण नवऱ्याला ही खूप आवडतं, मग त्याची तिच्या ह्या एक पाऊल पुढे असण्याला
काही ही हरकत नसे,कारण त्यांच्यापेक्षा ती त्याचे नातेवाईक आणि त्याचे ही problems खूप चांगल्या प्रकारे ओळखत .कोणाला कसे वागवायचे ,कोणाला कसे आपलेसे करायचे, कोणाला सरळ करायचे, कोणाची कशी मनधरणी करायची हे त्याच्या पेक्षा तिलाच जास्त माहीत होते. त्याला जितके कोणाचे मन ओळखता येत नसत तितके तिला समोरच्याचे मन समजत ,मग ते नाते खुद त्याच्या नात्यातील का असेना, पण ती खूप चांगल्या प्रकारे  हाताळत असे हो.

मंजू आईच्या चांगल्या संस्कारात वाढलेली, मोठ्या कुटुंबातील असल्यामुळे हे सगळे तिला सहज जमत होते, आपले तेच पटवून देत सगळ्यांना पण त्यांचे मन राखून, आणि हीच तिची खासियत नवरोबाला तिच्या स्वभावाचा गुलाम करत असत.

जर तिला आपल्या आई वडिलांची काही करायचे असेल तेव्हा ती ,आधी सगळ्यात खास ,आणि बेहतरीन साडी, कपडे, किंवा देवदर्शन असो, कुठे फिरायला जाने असो, ती सासू सासऱ्यांसाठी तर करतच पण त्याच्या सोबत आई वडिलांची तिकीट करत, म्हणजे ती आपला ही हेतू साध्य करत.

एकदा सासूबाई आणि ती बोलत असतांना त्या तिला म्हणाल्या अग ,ऋषी माझे नाही ऐकणार, तो माझ्या तब्येतीच्या कारणांमुळे हेमा ताई कडे मला नाही जाऊ देणार, पण तू बोललीस तर तो ऐकेल, असे काही तरी जुगाड कर की तो हो म्हणेल, ताई खूप आजारी आहे, आणि मला ही जाने गरजेच आहे ग, मी सख्खी बहीण असून नाही गेले तर तिला तर वाईट वाटेलच ग ,पण मला ही खूप वाईट वाटेल.

मंजुने सासूबाईंच्या मनातले ओळखले, आणि त्यांना अस्वासन ही दिले, आई तुम्ही माझ्यावर सोपवले आहे ना मग तुम्ही काळजी करू नका, मी करते सगळी तयारी तुमची जाण्याची, आणि ह्यांच्या कडून परवानगी घेण्याची, पण तुम्हाला तुम्ही काळजी घ्यावी लागेल बर, आणि हो मावशीला ह्यावेळी त्याची आवडती सेमी पैठणी घेऊन जा ,त्यांना खूप बरं वाटेल, आणि हातात कई पैसे ही देऊ.?

मंजू नवऱ्याला आम्ही मावशीला भेटायला जाणार असे कळवते, आणि आईचे त्यांना भेटणे ही करून तिकडून मी माहेरी ही जाईल म्हणते, आई बाबांना भेटून येईल ,त्याला तिचा हेतू समजायला वेळ लागला नाही ,तरी तिच्या विनवणी खातर तो परवानगी देतो,पण माझ्या आईची काळजी तुलाच घ्यावी लागेल .सासूबाईंच्या ह्या इच्छे खातर ती ही मावशीच्या भेटीला निघाली होती .भेट तर घडवून द्यायचीच होती पण सासूबाईंची तब्येत ही खूप महत्त्वाची होती.

ती जेव्हा नवीन सून म्हणून आली होती तेव्हा तिला सांभाळून घेणारी सासूचा होती, चुकल्यावर इतर जण दोन शब्द ऐकवत, तेव्हा सासूबाई होत्या त्यांना ती कशी बरोबर हे सांगणाऱ्या, जेव्हा तिला आईची आणि सगळ्यांची आठवण येत तेव्हा नवऱ्याकडून परवानगी न घेता त्याच तिला माहेरी जाण्याची परवानगी द्यायच्या ,आणि मंजू माहेरी जातांना त्याच डोळ्यात पाणी आणायचा .मग आज त्यांना गरज आहे, त्यांनी तर लेकीपेक्षा ही छान समजुतीने मंजुला सावरले होते .

त्याच होत्या ज्या तिच्या आई वडिलांना दिवाळीला काही कपडे करून मंजू जवळ पाठवून द्यायच्या, त्याच होत्या ज्या कधी अडीअडचणीला मंजुच्या आई वडिलांना मदतीचा हात पुढे करायच्या, कारण हे सोपस्कार ऋषीला कधीच जमत नसे ,ना त्याला काही कळत असे. नवीन नवीन जितका नवरा मनापासून जवळ आला नव्हता तितक्या सासूबाई मंजुच्या जवळ आल्या होत्या, म्हणूनच मंजू सासूबाईंच्या मनात घर करून वसली होती, सासूबाईंच्या ह्या आगाध प्रेमामुळेच ती एक पाऊल पुढे होती नवऱ्या पेक्षा सगळे नाते जपताना.?

मंजुने सासूच्या सगळ्या अडचणी आता आपल्या मानल्या होत्या, मंजूने तर तिच्या नणंद सीमाचे ही मोडकळीस आलेल्या संसार पुन्हा जोडून दिला होता, तिनेच आपले दागिने मोडून तिला छोटेसे shop घेऊन दिले होते, तीच आता ह्या घरातील problem solver झाली होती.?

जे नवरा करू शकत नसे ते ती ,विचार न करता सहज करून सगळ्या अडचणीवर मात करत होती, तो फक्त मम करत ,कारण त्याला पूर्ण विश्वास होता ती जे करेल ती पूर्व दिशा असणार हे नक्की ?
अशी मंजू खरे तर प्रत्येक घरात असावी... म्हणजे नाते टिकून राहतील...

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

Anuradha Andhale Palve

Government Job

... I Search My Identity In Being A Writer Of My Soul

//