Mar 04, 2024
गोष्ट छोटी डोंगराएवढी

मंजिरीचा संघर्ष

Read Later
मंजिरीचा संघर्ष

गोष्ट छोटी डोंगराएवढी


मंजिरीचा संघर्ष

एक मंजिरी सुकलेली होती .एका दिवशी जोराची हवा आली आणि तिला हवे बरोबर उडवत नेऊन जमीनीवर पाडल होत .

पावसाच्या पाण्याने पाण्याबरोबर पुन्हा तिला तिच्या जागेजवळ आणून सोडल .

पावसाच पाणी आल त्याबरोबर मंजुरी सोबत वरून पालापाचोळा आला होता .

मंजिरी : " किती कठीण हे आयुष्य "

बापरे !
पाऊस पाणी आणि वरून माझ्यावर हे पालापाचोळ्याच ओझ . मी पुर्णपणे दाबून गेली आहे .
आता माझ काय होणार !

आई ( मोठी तुळस ) : अग ,पाऊस आला . हे पाणी आपल्यासाठी अमृतासारख असत . या पालापाचोळ्यातून तुला नवीन जन्म मिळेल .

पावसाळा सुरु झाला होता .ऊन पावसाचा खेळ सुरु होता .

मंजिरीच्या बियांपासून छोटी छोटी रोप निघत होती .

आता सुरु झाला होता पावसाळ्यात जगण्याचा संघर्ष .

छोटी छोटी रोप निघाली होती .

कधी जोराचा वारा येई ,वारा त्या रोपांना हलवून निघून जाई . रोप पहिले घाबरून जात . नंतर त्याच जोराच्या वाऱ्याबरोबर खेळायला लागली .

सुंदर वाटणाऱ्या पावसाच्या सरी त्यांचही तसच वाऱ्यासारख . पहिले घाबरायच आणि नंतर त्यांच्यासोबत रोप खेळायला लागली होती .

छोट्या रोपांना आता छान हिरवी - हिरवी पान आली होती .रोप मोठी होत होती .

एका दिवशी बागेतला माळी गवत साफ करत होता . गवत साफ करता करता जास्त गर्दी असलेल्या ठिकाणची काही रोप काढून टाकत होता .
त्यादिवशी संध्याकाळ होत आल्याने अंधार पडायला आला होता .माळ्याने त्यादिवसाच काम संपवल .

रोप रडायला लागली होती . आई….

आई : " आपल्यातील सगळ्यांना मोठ होता येत नाही . सर्व जर राहिलो तर मोठ होण्यास जागा इतर गोष्टी मिळू शकत नाही . "
दुसऱ्या दिवशी माळी आला . तुळशीच्या रोपांमधली चांगली मोठ्या पानांची काही काही रोप ठेवली , बाकी गवत जास्तीची रोप काढून टाकली .

पहिले रोपांची गर्दी ,गवत होत म्हणून जोरात हवा ,पाऊस ,ऊन असलतरी एकमेकांची सोबत असल्याने त्यांचा जोर कमी जाणवत होता . आता थोडी रोप , बाकी मोकळ केल होत . त्यामुळे स्वतःच्या हिम्मतीने उभ राहून जगण्याचा संघर्ष सुरू झाला होता .

रोप आता छान मोठी झाली होती . रोपांना असलेल्या हिरव्या पानासोबत आई वाट पहात होती ती पुन्हा
" फुलण्याची , मंजिरीची ,फुलांची , पुर्णत्वाची "

एके दिवशी रोपावर चाहूल लागली " कळ्या येण्याची ...  "

( बदल हा कोणताही असो , लगेच स्वीकारला जात नाही ,येत नाही .)

रोप : " आता हे मला काय होत आहे ? हे नेहमी सारख पान तर येत नाही .
आता नवीन काय ?

आई : " आता तुला सुंदर कळ्या येणार ,कळ्यांमधून फुल , नंतर फळ . असा निसर्गाचा नियम . हा बदल असतो नवीन काही होण्यासाठी , तीथ थांबायच नसून तो स्वीकारून पुढे जाण्यासाठी ."

रोप आता आंनदी होत .
" मला आता छान कळ्या ,फुलं येणार ,मग फळ येणार . "

काही दिवसांनी तुळशीला मंजिऱ्या आल्या .

बागेत येणारे कधी कधी पान तोडत , कधी फुलं, मंजिऱ्या तोडत .

 ' अस कस हे आयुष्य कधीही कोणीही याव पान ,फुलं तोडून न्यावी . '

आई : " आपल आयुष्य हे असच असत , एकदा तोडल्यानंतर कुणी औषधासारख खात , तर कुणी देवाला वाहत ."
" आणि पुर्ण मोठ व्हायला मिळाल तर पुन्हा नवीन रोप येणार आपण लहानपणी होतो तशीच . "

तर असा हा जगण्याचा संघर्ष चालू रहात असतो .

" हे जीवन ….एक संघर्ष है ।"

Veena


******
संघर्ष विषयावर वेगळ लिहण्याचा प्रयत्न केला आहे . कसा वाटला कमेंट करून सांगा .


ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//