मनीषा - लढा अस्तित्वाचा.भाग.२४

मयंकला, मनीषा बद्दल इतकी उत्सुकता का असेल? आनंद आणि आत्त्याबायंच्या येण्याने अंजू आणि सुबोध सगळ व्यवस्थित हाताळू शकतील की नाही? मनीषा या सगळ्या गोष्टी सांभाळून स्वतःला त्रास होवू देणार नाही ना? पाहूया पुढील भागात.
सुबोध आणि मयंक पुन्हा आत येतात. त्या दोघांना पाहून विवेक ही त्यांच्या जवळ येत बोलतो. "अरे भाई' तुम दोनो इधर हो. और मैं' पुरे घर में तुम दोनो को धुंडता फिर रहा हुं."

"का रे काय झाले?"
"अरे मयंक भाई!"
"हायला हा मराठी विसरला की काय रे सुब्या? आज हे ध्यान' मला चक्क चक्क, मयंक भाई बोलतय. काय झाले आहे याला?"

"ये बाबा' तुम्ही दोघे बसा एकमेकांना विचारत. मी ही तयार होवून येतो पटकन. नाहीतर, अंजू जाम चिडेल माझ्यावर." म्हणत, सुबोध तिथून पळतो.

"अरे सुब्या थांब. अरे ऐक तर.
ओह शिट यार! हा पुन्हा सटकला. मला त्या ऍटीट्यूडवाल्या पोरीची माहिती ही नाही सांगितली याने."

"ओय होय. काय रे तुला कश्याला हवी आहे तिची माहिती? बोल बोल?"
"ये विक्या तुला काही माहीत नसल्यासारखे करू नकोस."
"हो का? अरे साल्या ती सुब्याची बहिण आहे."

" हो का? जे मला ही माहीत आहे त्या पेक्षा वेगळे काही तरी सांग विक्या. ती सुब्या ची बहिण आहे म्हणे. अरे ती अचानक कुठून आली? काय करते? कुठे राहते? असे बरेच प्रश्न असतात. त्याची उत्तरे आहेत का तुझ्याकडे?"

"अरे पणं का? नाही म्हणजे, तुला तिच्या बद्दल एवढी माहिती कश्याला हवी आहे."

"ये बाबा. तुला नसेल माहीत तर, जाऊ दे. चल आपण पणं आवरून घेवू. परत पाहुण्यांच्या गोतावळ्यात आपल आवरणे राहून जाईल. चल पटकन." म्हणत, मयंक' विवेकला ओढत सुबोधच्या बेडरूमकडे नेतो.

बेडरूमच्या समोरच, मनीषा' पुन्हा त्याच्या समोर येते. तिला' विवेक माहीत असतो. कारण, एक दोनदा ती सुबोधच्या घरातच, त्याला भेटलेली असते. पणं, मयंक' तिच्यासाठी अगदीच नवीन व्यक्ती असतो. ती' विवेककडे पाहून बोलते.
"विवेक दादा' तुम्हाला आणि मयंक कोण आहेत त्यांना' सुबोध दादा बोलवत आहेत."
"अग मनू' हाच मयंक आहे. एक मिनिट, मी तुमची ओळख करून देतो." म्हणत, दारात उभा असलेला सुबोध पुढे येतो.

"मैं भी अभी बताने ही वाला था!" विवेक मध्येच बोलतो.
सुबोध' त्याच्याकडे पाहून हसतो. आणि मनीषा जवळ येत बोलतो.
"मयंक ही मनू. म्हणजे मनीषा. माझी मानलेली पणं, सख्ख्या बहिणीपेक्षा खूप जवळची अशी लाडकी बहीण."
आणि मनू' हा मयंक' माझा खास मित्र. विवेक' मी आणि मयंक एकत्रच कॉलेजला होतो. माझे अगदी जवळचे खास म्हणजे जिवलग म्हटलीस तरी चालेल. असे मित्र आहेत हे."
"हा मनू, औंर एक बात. ये मयंक है ना बहोत शरारती लडका है."

"ये गप रे. मनू मॅम. तुम्हाला भेटून आनंद झाला."
मयंक' विवेकचे बोलणे तोडून, आपला हात पुढे करत बोलतो.
मनीषा' त्याच्या हाताकडे दुर्लक्ष करत, आणि त्याच्या डोळ्यात बघत, हात जोडून बोलते.
"नमस्कार. मयंकजी.
आणि सॉरी ही. मघाशी मी तुमच्याशी खूप रागात बोलले त्या बद्दल."
"अरे सॉरी काय त्यात? होत अस चुकून. जाऊद्या ते."

"बर, आता तुमची ओळख झाली आहे ना. चला मग पटकन आवरून घेवू या. मनू तू बाकीची तयारी बघ तो पर्यंत, आम्ही आलोच." म्हणत, सुबोध त्या दोघांना रूममध्ये ढकलतच नेतो.

"अरे, अरे थांब की सुब्या. एवढी कसली घाई आहे तुला?" दरवाजा लावणाऱ्या सुबोधला बघत मयंक रागात बोलतो.
"विसरलास का? थोड्या वेळात अंजूचा कार्यक्रम सुरू होईल. त्या आधी आपण तयार होवूया. चल आवर लवकर."

"यार सुब्या' तिथे बायकांच्या गराड्यात तसे ही, आमचे काही काम नसणार आहे. आम्हाला कुठे तरी कोपरा धरुनच थांबव लागणार. त्या पेक्षा आम्ही इथेच रूममध्ये थांबतो. तू जा. तुला वहिनी सोबत फोटो काढायचे असतील. पुन्हा ते बर्फी, लाडू निवडाव लागेल. मागच्या वेळेस तुझी हालत बघून जाम हसलो होतो आम्ही. काय रे विक्या? काय ते धनुष्यबाण हातात घेवून फोटो, चंद्र कोरिवर बसून फोटो." म्हणत, मयंक आणि विवेक मोठ्याने हसू लागतात.

"मया, मला काही ऑप्शन नाही. हे खर आहे. पणं ह्या वेळेस मी आधीच ठरवलं आहे. तुम्हा दोघांना पणं, मी माझ्या सोबतच ठेवणार आहे. फोटो काढताना ही तुम्ही आसपास नसला ना तर, गाठ माझ्याशी आहे लक्षात ठेवा." म्हणत, सुबोध आपले कपडे बदलतो .

"अरे तुझी ती लाडकी बहीण आहे की. तिला घे तुझ्यासोबत. आम्ही कश्याला तिथे..."
"ती अंजू सोबत असेलच. पणं, तुम्ही माझ्या सोबत मला हवे आहात."

" यार सुब्या' आज काय तुझे लग्न नाहीये. की, तुझी पाठराखण करायला आम्ही पाहिजे ते. मुकाट्याने जा आणि बस वहिनी शेजारी."

"अरे चूप रहो यार? क्या चल रहा है तुम दोनोका? चाहिए. नहीं चाहिए. अश्यात बाहेर कार्यक्रम संपून जाईल तरी, तुम्ही इथेच असाल. सुब्या' जा तू. आम्ही आलोच आवरून." म्हणत विवेक ही स्वतःचे आवरू लागतो. मयंक बेडवर पडून निवांत दोघांची तयारी पाहत बसतो.

बाहेरची सगळी तयारी झालेली असते. मनीषाने' अंजुला हॉलमध्ये आणून बसवलेलं असते. सगळ्या बायका मनीषा आणि अंजूकडे पाहत असतात. अंजू मात्र एवढ्या सगळ्या माणसात आपल्या माहेरचे कोणी दिसते का? ते पाहत असते. संदेश ही तिच्या जवळ येऊन बसतो.
अंजूच्या सासूबाई तिच्या जवळ येत, तिचे औक्षण करतात. मग, एक एक स्त्री उठून अंजूला हळदी कुंकू लावून, तिची ओटी भरू लागतात.
सुबोधही पटकन, अंजूच्या शेजारी येवून बसतो.
मयंक आणि विवेक त्याच्या पासून थोडे लांब उभे राहून कार्यक्रम पाहू लागतात.

"मनू' काकू कुठे आहेत? त्या अजुन कश्या आल्या नाहीत?"
"अग वहिनी, ती येईल थोड्यावेळात."
"अग पणं, मला ओवळणार नाहीत का त्या?"
"वहिनी' मला नाही वाटत ती ओवाळेल तुला."

"का ग मनू? काही प्रॉब्लेम आहे का?"
"नाही हो दादा. ते आई..
म्हणजे आईला हळदी कुंकू करायला नको वाटत आहे. तिचे म्हणणे, ती एक विधवा स्त्री आहे. तिने अश्या कार्यक्रमात येवून वाहिनीला...
"अरे त्यात काय एवढे? काकूंना तू सांगितले नाहीस का? आम्ही हे असले काही पाळत नाही ते."
"हो दादा मी सांगितले. पणं,
शेवटी आई जुन्या विचारांची आहे. तिला आपण जास्त नाही ना फोर्स करू शकत."

"हो मनू' तू बोलतेय ते बरोबर आहे. पणं, तरी मला वाटतं होत की, त्यांनी ही इथे यावे. आणि मला हळदी कुंकू तरी लावावे. शेवटी त्यांचे ही आशीर्वाद तितकेच महत्वाचे आहेत ग."
"ते तर,असेही कायम असणार ग वहिनी."
"हम्म"

"अंजू तू जास्त विचार नको करू. मी बघतो त्या कश्या येत नाहीत ते!
विवेक जरा इकडे ये."
"हा भाई बोल."
"अरे खालच्या मजल्यावर जाऊन, मनीषाच्या' आईंना तेव्हढे बोलावून आण. त्यांना सांग. अंजू वाट पाहत बसली आहे. त्या शिवाय कार्यक्रम करणार नाही म्हणतेय. म्हणजे, त्या लगेच येतील." ओके भाई. मी त्यांना हा असा जाऊन, घेवून आलोच बघ." म्हणत, विवेक आणि मयंक दोघेही खाली जातात.


"अरे देवा. मनू अग, तू तरी समजवायच आईला! तुला माहित आहे ना, आपण असले काही मानत नाही ते." सुबोधची आई मनीषाचे बोलणे ऐकून बोलते.

"हो आई' पणं, आई ने ते मानायला हवं ना.. बर ते जाऊ द्या. आता, विवेक दादा गेलेत ना, तिला बोलवायला. बघू आली तर चांगलेच आहे."
म्हणत, मनीषा टेबलावर मांडलेल्या विवध मिठाईचा, हळूच आस्वाद घेणाऱ्या, संदेशला पाठीमागून पकडते. आणि प्रेमाने दटावून, सुबोध जवळ बसवते.

"यार विक्या.
हे मनू नावाचं पात्र खूप उत्सुकता वाढवत आहे माझी. आता तिची आई इथेच खाली राहते. म्हणजे ही इथेच राहते हे कन्फर्म झाले. पणं, ही मुलगी आहे कोण? हीचे आणि सुबोधचे अचानक कसे काय नाते उदयाला आले? असे बरेच प्रश्न मला सतावत आहेत यार."

" हम्म
ती वहिनींची' कोण तरी नातलग होती. एवढच मला माहित आहे."
मग, ती सुब्याची बहिण कशी काय झाली? म्हणजे वहिनीची नातलग आहे तर."
"मया' तुला का तिच्याबद्दल एवढी माहिती हवी आहे? तुझा विचार काय आहे नक्की?
नाही म्हणजे, टाईमपास म्हणून तिच्याकडे पाहत असशील तर, आत्ताच तो विचार सोडून दे. मनू एक चांगली मुलगी आहे. आपले काम, आपले कुटुंब, या व्यतिरिक्त ती कश्यात ही नसते. निर्गवी आणि एकदम सिधी साधी है वो.."
"हम्म यार विक्या, मी काय फ्लर्ट करणारा वाटलो का तुला?
मी जस्ट असच विचारतोय यार. कारण, या आधी आपण किती वेळा तरी, सुबोधच्या घरी आलो. पणं, ही मनीषा मात्र कधीच दिसली नव्हती मला."

"ती नव्हतीच इथे तर कशी दिसेल तुला?"
"अरे हो पणं, तू का इतका चिडत आहेस?"
दोघेही बोलत, मनीषाच्या फ्लॅट समोर येतात.
विवेक त्याला बोटाने "शांत रहा " बोलत, बेल वाजवतो.

इकडे, कार्यक्रमाचा एक एक टप्पा पार पडत होता. अंजूचे डोळे मात्र, अजुन ही दाराकडे वेध घेत होते.
तिची ती अवस्था पाहून, सुबोधही थोडा अस्वस्थ होत होता. तो काहीही कारण काढून अंजूचे ध्यान दाराकडून हटवत होता.
शेवटी, आता या वेळी पेढा की बर्फी येणार? हे पाहण्याची वेळ आली. सगळे उत्साहाने, अंजू आणि सुबोध शेजारी येवून थांबले. इतक्यात, अंजूने पुन्हा एकदा दाराकडे पाहिले. आणि त्याच वेळी आनंद आणि आत्त्याबाय दारातून आत आले.

क्रमशः
©️®️ प्रिया देशपांडे.

🎭 Series Post

View all