मनी मल्हार

मनी मल्हार

मनी मल्हार(सुनीत काव्य रचना)


बघुनी नभीची चंद्रकोर ती
दोन जिवांचे जातक जुळले
भाग्यलेख प्रीतिने उजळले
सागर हृदयी उर्मी उठती

झालीय का दाटी मोठी
कौमूदीचा सडा मोहरला
विस्मृतिचा हा पेला
जाणुन लावियला ओठी

सप्तरंगि या सात सुरांची
स्वीकारा ही प्रियाराधना
पदयुगुलाच्या झंकाराची
चाहूल तुझी लागे साजना

सागरा मिळे अवनीसी क्षितिजावर
वाट पाहि सजनाची पैलतीरावर

✍️संध्या

🎭 Series Post

View all