A PHP Error was encountered

Severity: Warning

Message: fopen(/home/irablogging/public_html/system/cache/irablog_session06087cdf902a9194bd3e100cbb34d8dfa57e0e26ca05c36b336321ff58801abc8817d1a8): failed to open stream: No space left on device

Filename: drivers/Session_files_driver.php

Line Number: 176

Backtrace:

File: /home/irablogging/public_html/application/controllers/Blog.php
Line: 7
Function: __construct

File: /home/irablogging/public_html/index.php
Line: 315
Function: require_once

A PHP Error was encountered

Severity: Warning

Message: session_start(): Failed to read session data: user (path: /home/irablogging/public_html/system/cache)

Filename: Session/Session.php

Line Number: 143

Backtrace:

File: /home/irablogging/public_html/application/controllers/Blog.php
Line: 7
Function: __construct

File: /home/irablogging/public_html/index.php
Line: 315
Function: require_once

mango ice cream
Oct 25, 2020
माहितीपूर्ण

मँगो आईसक्रीम

Read Later
मँगो आईसक्रीम

 

 

नमस्कार मित्र मैत्रिणींनो,

 रेसिपी ह्या प्रकारामध्ये खरंतर खूप कमी लेख येतात कारण आजकाल काय सगळ्याच रेसिपी youtube किंवा इतर ठिकाणी विडिओ स्वरूपात लगेच मिळतात पण त्यातल्या काही रेसिपी बऱ्याच वेळा बिघडल्याचेही समजते. मीही youtube बघून बऱ्याच रेसिपी बनवते पण कधीकधी काहीतरी नवीन स्वतः बनवलं आणि ते छानही झालं की आनंदही होतो.अशाच माझ्या काही खास थोड्या वेगळ्या कधी न ऐकलेल्या रेसिपी मी शेयर करतेय बघा आवडल्या तर नक्की बनवून बघा आणि मला प्रतिक्रिया कळवा.

ह्या कोरोना काळात खरंतर आपण सगळ्यांनीच खासकरून मुलांनी आईस्क्रीमला खूप मिस केलं असेल तर आज मी जी रेसिपी दिली आहे ती खूपच सोपी, झटपट होणारी पण अगदी बाजारातून आणलेल्या आईसक्रीम इतकीच चविष्ट आणि सगळ्यात महत्वाचे घरी बनवली असल्यामुळे सुरक्षितही असेल. (मी आंब्याची आईसक्रीम बनवली आहे पण तुम्ही त्याऐवजी कुठलंही फळ वापरून ही रेसिपी बनवू शकता)


पदार्थाचे नाव - मँगो आईसक्रीम


साहित्य - १ कप आंब्याचा गर( हापूस किंवा केसर) , १ कप मिल्क पावडर, १ कप मलई(दुधाची साय), १ कप दूध( तापवून थंड केलेलं), ३/४ कप साखर(आंब्याच्या गोडीवर अवलंबून किंवा चवीनुसार), खायचा पिवळा रंग(ऑप्शनल)

कृती -
१.प्रथम मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये एक वाटी कापलेल्या आंब्याच्या फोडी घालून त्याची  त्याची स्मूथ पेस्ट करून घ्या.

२.आता तयार आंब्याच्या पेस्टमधे मिल्क पावडर, मलई, दूध आणि साखर वर दिलेल्या प्रमाणात घालून पुन्हा ते मिश्रण मिक्सरला फिरवून घ्या.

३.साखर पूर्णपणे विरघळली आणि आंब्याचा गर एकसंध मिश्रणामधे मिसळला पाहिजे याची खात्री करून त्यात गरज असेल तर थोडा खायचा पिवळा रंग टाकून पुन्हा एकदा हे मिश्रण मिक्सरला फिरवून घ्या.

४.साखर तुम्ही चवीनुसार किंवा आंब्याच्या गोडीप्रमाणे कमीजास्त करू शकता. केसर किंवा हापूस आंबा वापरला असेल तर रंगाची गरज लागणार नाही.

५.हे मिश्रण आता एका हवाबंद डब्यात काढून डीप फ्रीजरला आठ ते नऊ तास सेट व्हायला ठेवून द्या. थंडगार आईसक्रीम तयार.

६.आंब्याच्या फोडी घालून सर्व्ह करा.

टीप-
१.आंबा कुठलाही वापरला तरी चालेल पण हापूस आंब्याची चव छान लागते.

२.दूध तापवून थंड केलेलेच घ्यावे आणि शक्यतो फुल्लक्रीम दूध घ्यावे.

३.मलई ऐवजी बाजारातील रेडिमेड फ्रेशक्रीम वापरली तरी चालेल.

४.हीच रेसिपी कुठल्याही दुसऱ्या फळाचा गर उदाहरणार्थ चिकू, सीताफळ, शहाळ्याची मलई टाकून तुम्ही वेगवेगळ्या फ्लेवरची आईसक्रीम याच पद्धतीने बनवू शकता.

ही झटपट आईसक्रीम नक्की करून बघा आणि छान होणारच याची हमी मी घेते. पण मला प्रतिक्रिया द्यायला विसरू नका.

रेसिपी आवडल्यास लाईक आणि कमेंट करून जरूर कळवा. शेयर करायलाही विसरू नका.

माझे इतर लेख वाचण्यासाठी मला नक्की फोलो करा.

©®सुवर्णा राहुल बागुल