मनातलं गुपित पत्र

मृत्यू पच्छात पत्नीने पतीला लिहिलेलं पत्र

माननीय अहो,
सा. नमस्कार
असच म्हणायचे ना मी तुला. "अहो, तुम्ही" असा मान तुला देणे गरजेचे होते. नवरा होतास ना तू माझा. समजापुढे पत्नी म्हणून ती मर्यादा मी नेहमी पाळली होती.
एक पत्नी म्हणून जी कर्तव्य होती माझी ती सर्व पार पाडली मी.


तू असतांना सांगायचं राहून गेलं म्हणून आता सांगतेय, तू जिथे कुठे असशील तिथून ऐक मी काय सांगतेय ते. तुझ्याशिवाय जगणं सहज नसलं तरी अशक्य मात्र नक्कीच नाही.
तू असतानाही माझ्या अस्तित्वाला नाकारलंच होत ना सर्वांनी. आणि आता तर काही विचारायलाच नको,
कारण आता तर तू नाहीसच. लोकांच्या टोमण्यांना चांगल उत्तर देते मी, आता कुणालाच घाबरत नाही.
बरेच वर्ष तुला घाबरून घाबरून मन मारत जगले पण आता मात्र नाही.
तू असतांना तूझ्या कामात व्यस्त असायचास आणि मी मात्र वेड्यासारखी तूझी वाट बघायचे.
मला नेहमी गृहीतच धरलंस तू आणि मी तूझ्या हो ला हो म्हणतं राहिले.
सर्वांसाठी सगळं केलंस तू मात्र माझ्या वाट्याला कधी आलाच नाही.
आणि तो प्रश्नच आता उद्भवतच नाही.. कारण तू कायमचा निघून गेलास.
हे विशेष पत्र तुला यासाठी लिहिलय कारण आता माझ्या मनावर कसलंच ओझं नाही. मी माझ्या मनाने वागायला मोकळी झाले आता.
तू गेलास आणि पिजऱ्याची दारे उघडी झालीत बघ.
तू जिथे असशील तिथून माझ्या जागी राहून विचार कर, आणि बघ किती त्रास होतो तुझ्यासारख्या पुरुषाच्या वागण्याचा एका पत्नीला.
देवा याला पुढच्या जन्मात स्त्री म्हणून जन्मास घाल आणि शोषिक पत्नी म्हणून जीवन कंठीत करू दे ही विनंती देवा.
                   पतीच्या त्रासातून मुक्त झालेली
                               पत्नी
सदरचे पत्र काल्पनिक आहे. त्यामुळे कुणीही मनाला लावून घेऊ नये. आवडल्यास like कमेंट करा. न आवडल्यास इग्नोर करा. शेअर करायचे असेल तर ते नावासहितच करा ??धन्यवाद ?? ©जयश्री कन्हेरे -सातपुते