मनस्वी - भाग 2

Manasvi

मनस्वी ला आता काय करू असं झालं होत, ज्या राजेश बरोबर सुखी संसार करण्यासाठी ती गेले 2 महिने स्वप्न रंगवत होती तो तिला असा वेश्या व्यवसायात ढकलून निघून गेला होता, 2 क्षण तिने विचार केला आणि ती रस्त्याच्या दिशेने पळत सुटली.

पण थोड्याच वेळात अमोल ने तिला पकडले आणि एक कानाखाली वाजवली आणि बोलला सरळ मुकाट्याने चल माझ्याबरोबर आणि त्याने लगेच एक रिक्षा थांबवून जबरदस्तीने रिक्षात मनस्वी ला ढकलले.

मनस्वी रिक्षात पण खूप ओरडत होती मला सोडा असं पण अमोल ने तिच्या हाताला घट्ट पकडून ठेवलं होत, त्यामुळे तिला निसटता येईना, रिक्षा वाला पण सारखा मागे वळून बघत होता, एकदा तो बोलला सुद्धा कि का ओरडत आहेत ह्या बाई, त्यावर अमोल बोलला तू सरळ रिक्षा मी सांगतोय तिथे घे जास्त प्रश्न विचारू नकोस, तरीपण त्या माणसाला संशय आला होता. त्याने पुन्हा विचारल्यावर अमोल ओरडला ये सरळ ने रिक्षा... मग तो रिक्षावाला ही गप्प बसला. अमोल नुसता सारखा ये मनस्वी ओरडू नकोस असच बोलत होता.

थोड्या वेळाने रिक्षा कुंटनखाण्यात पोचली, मनस्वी ला त्या तिथे उभ्या असलेल्या बायकांना बघून च कसतरी झालं, अमोल तिला ओढत आत घेऊन गेला, आणि तिथली 1 बाई बाहेर आली अमोल ला काहीतरी पैसे दिले आणि मनस्वी ला  एका रूम मध्ये नेवून टाकलं तिने.

मनस्वी खूप रडत होती पण कोणीच तिच्याकडे लक्ष देत नव्हत. मनस्वी ने 2 दिवस पूर्ण रडून च घालवले, ती बाई  सारखी मधून मधून येऊन मनस्वी ला ओरडत असे कि ये नाटकी बंद  कर तुझी, पण मनस्वी 2 दिवस जेवली ही नाही, आणि त्यामुळे तिला चक्कर आली, तेव्हा त्या बाई  ने 1 डॉक्टर आणला आणि त्याने तिला काही गोळया, औषधं दिली त्यामुळे मनस्वी ला तिसऱ्या दिवशी औषधं घेण्यासाठी जेवावेच लागले, आणि मग तिथे असणाऱ्या मुली तिला समजावू लागल्या कि रडून इथे काही होत नाही कोणीच आपलं ऐकत नाही,  मग मनू ने हार मानली आणि थोडंसं जेवली, डॉक्टर त्या बाईला सांगून गेले हिला 4 दिवस आराम करू द्या, त्यामुळे ते ऐकून मनस्वी ला मनातून जरा बर वाटल कि चला अजून 4 दिवस तरी शांतता आहे.

असेच सहा दिवस निघून गेले आणि सातव्या दिवशी सकाळ सकाळ मनस्वी ला तिथे जोराजोरात कसला तरी आवाज आला आणि सगळीकडे पळापळ दिसून आली मनस्वी ला समजेच नाही काय चालू आहे, तेवढ्यात तिला पोलीस दिसलें आणि तिला आशेचा किरण दिसला तिने जोरजोरात ओरडायला सुरवात केली, मनस्वी कोण असं, असं पोलीस विचारू लागले तेव्हा मनस्वी ओरडली कि मीच, मला इथे जबरदस्ती ने ठेवलं आहे.

पोलिसांनी मनस्वी बरोबर अजून ही मुलींची तिथून सुटका केली, मनस्वी ला इथे अमोल बरोबर त्या दिवशी जो रिक्षा वाला आला होता त्याने धाडस करून पोलीस कंप्लेंट केली होती त्यामुळे आज मनस्वी आणि तिच्या सारख्या मुलींची तिथून सुटका झाली होती.

मनस्वी ने बाहेर पडल्यावर त्या रिक्षा वाल्याचे अक्षरशः पाय धरले  आणि म्हणाली दादा केवळ तुमच्यामुळे मी इथून सुटली. मनस्वी ला पोलिसांनी विचारले कि तुझ्या घरून फोन करून तुला नेण्यासाठी कोणाला बोलवायचं त्यावर ती सरळ म्हणाली सर मी अनाथ आहे.

त्यावर त्यातली एक लेडीज पोलीस म्हणाली कि मग कुठे जाणार आहेस आता त्यावर मनू गप्प च बसली, मग पोलीस च म्हणाले कि आम्ही सध्या तुझी सोय एका अनाथ आश्रमात करतो आहे. चालेल ना, त्यावर मनस्वी लगेच हो म्हणाली.

...........

पुढच्या भागात आपण बघणार आहोत कि मनस्वी कशी पुढे शिकते आणि आयुष्यात पुढे जाते...

नमस्कार.. सौ सोनल गुरुनाथ शिंदे.. ( देवरुख - रत्नागिरी )

🎭 Series Post

View all