# कादंबरी – मानसी # भाग ९

this part is about still job role is pending in old office

                                                                 # कादंबरी – मानसी # भाग ९

                                                                 भाग ९ पिक्चर अभी  बाकी है

मानसी च्या अंगात जणू  वीज संचारली होती . मानसी वाऱ्याच्या वेगाने ऑफिस च्या दिशेने निघाली. थँक उ गणपती बाप्पा ! असे मनोमन देवाला धन्यवाद देत होती तिला  त्याच कंपनीत  काम करण्याची  अजून एकदा संधी दिल्याबद्दल ती मनोमन देवाचे आभार मानत होती . कस असतं ना स्वत हुन जर जॉब सोडला असता तर इतका आनंद नसता झाला . कित्येक जण एक ऑफिस सोडून जातात .दुसरीकडे जॉब करतात मग पुन्हा त्याच कंपनीत परत येतात हि काही अशी जगावेगळी गोष्ट नव्हती पण मानसी च्या बाबतीत जरा वेगळेच घडले  होते . तिथला जॉब तिने मनापासून सोडला नव्हता .तिला तो सोडायला भाग पडला होतां आणि आता अशी एक संधी तिला मिळाली होती कि तीच तिथलं स्थान ती परत मिळवू शकणार होती आणि हि नामी संधी ती सोडणार नव्हती   .

अशा विचारात एका वेगळ्याच ऍटिट्यूड मध्ये मानसी  ऑफिस च्या गेट वर आली .

गेट पास घेऊन मानसी वरती गेली . आणि व्हिसीटींग कोच वर बसली आणि मग तिथून रामदास सरांना कळवलं कि मी बाहेर आलेय तिला सध्या रामदास सरं  व्यतिरिक्त कोणालाच भेटायचं  नव्हतं . सरांनि त्यांच्या केबिन मध्ये बोलावलं .ती डायरेक्ट तिकडेच गेली .

“हॅलो सर “

यस मानसी मॅडम " कशी आहे ?''

“हा सर ठीक आहे “

" ओके मानसी , तर या डिपार्टमेंट ची माहिती सांगतो,  कंपनीचे  जुने कस्टमर आपल्या हेड अंडर येतात . नवीन कस्टमर ला एक वर्ष झालं कि तो जुना कस्टमर बनतो मग त्याची देखरेख आपल्या डिपार्टमेंट कडे  येते . म्हणजे सेल्स टीम नवीन कस्टमर बनवायला मोकळे होतात . असं बोलता बोलता रामदास सरांनी एक पेपर मानसी च्या हातात दिला . त्या लिस्ट मध्ये अल्मोस्ट  ५० कंपनीची नावे होती . काही काही नावं तिला ऐकून माहित होती . काही काही नवीन होती .

तर तुमचा जॉब रोल या सर्व कस्टमर चा डेटा बेस  सांभाळणे . रेकॉर्डस् मेंटेन  करणे,त्यांचे वार्षिक, मंथली, आणि विकली रिपोर्ट्स त्यांना  व  मला पाठवणे . त्यांना जर काही सर्विस लागत असेल तर ती को ऑर्डिनेट करणे. शिवाय मी महिन्यातले २०दिवस बाहेर असतो . कस्टमर व्हिसिट ला जातो .मला वेळो वेळी वेग वेगळ्या क्लायंट चे वेग वेग वेगळे रिपोर्ट्स जेव्हा  लागतील तेव्हा तातडीने द्यायचे . शिवाय आपली वीकली , मंथली मीटिंग असते त्या मिटींग्स अटेंड करणे .".. असे रामदास सर  एक एक काम सांगत होते . मानसी मान हलवून तिला समजतंय असे दर्शवत होती.

मानसीला हे सगळं काम खूप ऐकूनच आवडत होत. आणि कधी एकदा तो कॉम्पुटर मिळतोय आणि मी कामाला लागतेय असे झाले होते

दोन दिवस हॉटेल मध्ये जेवलेल्या व्यक्तीला जर घरचा वरण भात दिला तर तो कसा पटापटा खाईल तसंच मानसी ला लगेच आता च्या आत्ता काम करावंसं वाटतं होत . ऑफिस च्या कामाची आतुरता तिच्या डोळ्यात दिसत होती .

तेवढ्यात मानसीला  फोन वाजला बाबांचा कॉल आला होता

" हॅलो , मानसी कुठे आहेस ?" आई ने मला सांगितले कि तुला ऑफिस मध्ये बोलावलंय " काय झालं ?

बाबांच्या प्रश्नामध्ये काळजी दिसत होती. मानसीच्या लक्षात आले कि ह्या गडबडीत आपण बाबांना फोन केलाच नाही . खरतरं तिला फोन करायला वेळच मिळला नाही कारण १२ वाजता पोचायचं होतं ऑफिस मध्ये . बरं झालं आई ने नेहमी प्रमाणे लगेच बाबांना सांगून टाकले.

मानसी " हो बाबा मी ऑफिस मध्ये पोहचले . सॉरी हा तुम्हाला कॉल करायलाच वेळ नाही मिळाला . "

इकडे दुसऱ्या डिपार्टमेंट मध्ये पण ह्याच ऑफिस मध्ये एक पोस्ट आहे त्या  संदर्भात आले आहे . अजून काही पूर्ण कळालेलं नाही . मग सांगते ."

बाबा " मानसी घाई करू नकोस . सर्व डिसिजन एका तासात नसतात घ्यायचे "

" हो बाबा "

बाबा " सर्व ऐकून घे आणि त्यांना सांग मी उद्या कळवते "

मानसीला बाबा कधी फोन ठेवतात असे झाले होते . समोर रामदास सर बसलेत , कॉल कधी संपतोय ते म्हणून तिला ऑकवर्ड वाटत होते . एकतर फोन बाबांचा असल्याने कट नाही केला .

एक दोन मिनिटांचा कॉल पण किती महत्वाचा होता तो कॉल ते आत्ता मानसीला  कळणार नाही , आत्ता त्रासदायक वाटतोय पण आयुष्यात काही क्षण असतात कधी कधी फसवे असू शकतात . आपल्या साध्या  डोळ्यांना दिसत नाहीत ते . अर्थात इथे काही तसं नव्हते . तरी पण बाबांचं काम बाबा चोख पार  पाडत होते . एका मुलीच्या बाबांना एवढं अलर्ट असावच लागतं . शेवटी आपल्या मुलांचं भलं व्हावं हेच त्यांचं उद्दिष्ट असतं .

मानसीने " हो बाबा , होय.... असे बोलून फोन कट केला . पण एका  क्षणात तीच  चित्त थाऱ्यावर आलं

या मध्ये काय लूपहोल्स आहेत हे अजून कळलेच नव्हते .

रामदास सर  “ आपण तुझी recruitment न्यू दाखवणार आहोत. तुला न्यू  एम्प्लॉयी ID नंबर मिळेल . तर आत्ता अजून तुझी फायनल settlement झालेली नाही तर जोपर्यंत ते सर्व क्लिअर होत नाही तोपर्यंत तुझी recruitment आपण करू शकत नाही . “

मानसी म्हणाली " सर मला एक प्रश्न आहे मी विचारू का ? मला  अपॉइंटमेंट चे डिटेल्स द्या .

जस कि माझं रिपोर्टींग कोणाला असेल , माझं सॅलरी package  काय असेल .आधी आपण या गोष्टी मला सांगितलंत तर बरं होईल. मला पण माझा डिसिजन घ्यायला बरं पडेल.

रामदास सर " ओके , तुझं रिपोर्टींग माझ्या अंडर असेल . Leaves approval पण माझ्या अंडर असेल आणि assistant मॅनेजर च्या स्लॅब चे जे काय आपलं पॅकेज असेल ते मिळेल . शनिवारी हाल्फ डे बाकी जे काही असेल ते तुझ्या ऑफर लेटर मध्ये येईल कारण ते HR dept  चे काम आहे .

मानसी " सर मला जर ऑफर लेटर मिळाले तर , त्यात माझ्या recruitment चे डिटेल्स सर्व असू देत , मी सगळं वाचून लगेच कळवीन किंवा ऑफर accepted ची कॉपी देईन .

रामदास सर " ग्रेट "

रामदास सर " ओके  मग मी HR Dept  शी बोलून घेतो तू पण बोलून घे तुला तर सर्वच ओळखीचे आहेत "

मानसी " ओके ... ठीक आहे मग आता मी जाते .

रामदास सर " तुमच्या बरोबर जे घडले ते काही छान नाही घडले . मी बॉस ला पण बोललो .

मानसी  गप्पच होती.

रामदास सर " आत्ता इथे काही तसा  प्रॉब्लेम येणार नाही. आपण दोघे टीम बनून काम करू . तुम्हाला फुल्ल ऑथॉरिटी . कारण सध्या आपण दोघेच असणार आहे टीम मध्ये . मला ते रिपोर्ट्स वगैरे काढता येत नाहीत तुम्हाला सर्व फॉरमॅट सेट करून बनवयाचे आहेत . काम खूप आहे लागलच तर थोड्या दिवसांनी तुमच्या अंडर एक स्टाफ घेऊ .

मानसी सगळं ऐकून घेत होती .

" ठीक आहे सर ते ऑफर लेटर च बघा . मला घरी पण बाबांना दाखवायला लागेल "

"यस उद्याच तुमच्या पर्सनल  मेल वर पाठवतो "

मानसीला सर्व काम कळले होते आणि मान्यं पण होते . आता एप्रिल पासून तिचा जॉब अल्मोस्ट लागल्या सारखाच  होता.

रामदास सरांशी बोलून मानसी घरी निघाली .

तेवढ्यात तिला बॉस समोरून येताना दिसले . काय करावं कळेच ना . मागे हि जात येत नव्हते कारण त्यांनी पहिले होते तिला .

" क्या मानसी ? कैसी हो ?  रामदास को मिली  क्या ? शायद उसके डिपार्टमेंट में पोस्ट खाली है । उसने हि तेरा नाम लिया ।

हा सर " देखते है | अभि जॉब रोल एक्सप्लेन किया उन्होने ।कल तक ऑफर लेटर देंगे बोल रहे हैं ।

मानसी " सर लगता है मेरा चाप्टर अभि बाकी  है कंपनी में, खतम  नहीं हुआ |

बॉस जरा आज  रिलॅक्स  मूड मध्ये असावा बहुतेक .त्यांना असं causally  गप्पा मारायला आवडतात . आणि त्यांना सुद्धा कुठे ना कुठे तरी मानसी ना retain करायचे होते . आणि म्हणूनच रामदास सरांना त्यांनी

ह्या गोष्टी ला फुल्ल सपोर्ट केला होता .

जाता  जाता  बॉस बोलले " चॅप्टर नहीं रे मानसी पिच्चर " वो शाहरुख खान का डायलॉग है ना वैसे बोल " पिच्चर अभि बाकी है सर "

आणि जोर जोरात स्वतः च हसायला लागले . मानसी  पण  स्मितहास्य देऊ लागली .

🎭 Series Post

View all