# कादंबरी – मानसी #भाग १

This is first part of Kadambari . it is the first day of job of Mansi after 2 days of sick leaves

                                                                 # कादंबरी – मानसी  #भाग १

                                                                रजेंनंतरचा पहिला दिवस

 दोन दिवसांच्या सुट्टी नंतर मानसी आज ऑफिस ला जाणार होती . तिची तब्बेत अजूनही काही ठीक नव्हती . सर्दी आणि खोकला होता थोडा पण ताप मात्र गेला होता . तिची आई तिला सांगत होती  अग  अजून एकदा दिवस आराम कर नाहीतर ताप उलट फिरतो . पण आपल्या कामावर तीच  खूप प्रेम होतं .ताप गेल्यावर तिला घरी बसवेना . "अग आई आता बरी आहे मी . आणि वाटलंच जास्त त्रास होतोय तर मी दुपारी रिक्षा करून घरी येईन "

मुलीच्या हट्टापुढे आईच काही चालत का?

डबा ,गरम पाणी ,दुपारच्या गोळ्यांचा डोस ,घेऊन मानसी  निघाली . ऑफिसला जाता जाता  तिच्या डोक्यात आज काय करायचं याचा आराखडा सुरु होता . हेड ऑफिस ला मेल पाठवायचाय .मि राकेश कडून रिपोर्ट मागवायचाय . पाहिलं काम कोणतं करायचं दुसरं काम कोणतं करायचं असे ती मनातल्या मनात ठरवत होती . शिवाय तिची मैत्रीण  सोनाली चा आज सेंड ऑफ करायचा होता . ती एकदा सोडून गेली कि तिची पुन्हा भेट होणार नाही म्हणून तिची भेट घेणे जरुरी होते.

असा विचार करत  ती ऑफिस मध्ये पोहचली. खालीच सेंकुरीटी गेट वर एंट्री करताना बोलला

"गुड मॉर्निंग "

"मॅडम दोन दिवस नव्हता का?

" हो माझी तब्बेत बरी नाहीये  “

आत मध्ये आल्यावर स्वतः च्या जागेवर कुणीतरी बसलेले दिसले . ती थोडा वेळ बाजूला'बसली . कधी कधी कॉम्पुटर शेअर  करत असत . त्यामुळे  हे काही नवीन नव्हते आणि ती दोन दिवसांनी आज ऑफीस ला आली होती .त्यामुळे तिचा कॉम्पुटर वर  तिची कलीग बसली असेल असा विचार करून ती तिचे सामान तिच्या डेस्क वर ठेवू लागली . तिच्याही कोणी मनमोकळ बोलत नाहीये असं एक क्षण तिला वाटलं .पण तरीही तिने त्याकडे दुर्लक्ष केलं . सर्व  जण कामात असतील . ती इकडे तिकडे जाऊन आली .तरीही कलीग तिच्या डेस्क वरून उठेना . शेवटी तिने तिला विचारले?

"किती वेळ लागेल ग तुला ?"

मलाही माझं काम आहे ग. त्यात माझी दोन दिवसाची सुट्टी झालीय "

ती म्हणाली "मॅडम मला हा कॉम्पुटर कालच allot झालाय . तेव्हा तुम्ही प्लीज आपल्या टीम लिडर शी बोलून घ्या "

मानसी ला काही कळेनाच काय चाललंय आता  हे काय नवीन. एक क्षणभर इतका राग आला होता तिला .हे काय हि काय पद्धत आहे का?काही मेल नाही ,इन्टिमेशन नाही आणि अचानक माझा डेस्क कसा काय देऊ शकतात ? तिने स्वतःला समजावलं डोक्यात राग घालून काही होणार नाही शांत पणे टीम लीडर लाच जाऊन विचारू .

टीम लीडर तिची तशी मैत्रीण च होती . मैत्री पेक्षा कलीगच होती .कधी मनात आलं तर छान बोलायची नाहीतर तिच्यासारखी तिरसट बाई कोणी नसेल. काम असल कि गोड  बोलायची आणो काम झालं कि तू कोण मी कोण . मानसिनला आत्ता तिच्याशी बोलणं भागच होत .

मानसी पटापट तिच्या केबिन मध्ये गेली तर ती फोन वर बिझी होती .मानसी कॅबिन च्या बाहेर येउन बाहेर च्या चेअर वर बसली आणि वाट पाहू लागली कि टीम लीडर  चा  कॉल कधी संपेल याची

१० मिं. नंतर पुन्हा आत डोकावून पाहिलं . तरी कॉल चालूच होता .आ ता आपण काहीतरी प्रॉब्लम मध्ये आहोत हे तिला कळून चुकलं होत .

फायनली टीम लीडर ने आत बोलावले . बसायला सांगितले आणि फॉर्मल चौकशी करायला लागली

" कशी आहे आता तब्बेत ?अचानक काय झालं?"

 मानसीने पण फार काही नाही  बोलता डायरेक्ट विषयाला हाथ घातला .

राखी मला म्हणाली कि माझा डेस्क तिला allot झालाय सो विचारायला आले . माझा डेस्क कुठं आहे . मी सिक leave वर असताना असा अचानक बदल कसा काय केला :

टीम लीडर तिच्या कडे बघत पण नव्हती .कारण तिला हि माहित होत जे काही चाललंय ते काही चांगले नाहीये . उगाचच मेल चेक करत असल्याचा भाव आणत  हे तिला जाणवत होते.

मिस  मानसी  देअर इज वन गुड न्यूज फॉर यू . तुमची बदली आपण बॅक ऑफिस ला केलीय .तुम्हाला तर माहितेय कि सोनिया चा आज शेवटचा दिवस आहे तर तिच्या जागी आज पासून तुम्ही काम करायचं आहे . तेव्हा तुम्ही आत्ता तिच्या इथे जा ती तिचा हांडोव्हर तुम्हाला देईल.

"पण का?

मी त्या डिपार्टमेंट ला का शिफ्ट व्हायचं ?माझं इथलं काम मी चोख  पार  पाडतेय . मला त्या डिपार्टमेंटला काम करायला comfortable नाही होणार . इनफॅक्ट लास्ट मंथ मीटिंग मध्ये मला अँप्रिसिएशन पण मिळाले होते . माझ्या कामावर बॉस खुश होते .मग अचानक माझी पोझिशन का बदलली जातेय

मिस सोनिया ची जागी मी नाही काम करू शकणार .

मिस मानसी हा माझा नहि बॉस चा decision आहे .तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही त्यांना भेटा . सॉरी मी जरा घाईत आहे मला डायरेक्टर सरांनी केबिन मध्ये बोलावले आहे . आणि चक्क टीम लीडर तिच्या आधी केबिन च्या बाहेर गेली .

मानसी ला काय बोलावं ? कोणाशी बोलावं? काहीच कळत नव्हतं . डोळ्यात आपोआप पाणी येऊ लागले होते.

🎭 Series Post

View all