नणंद भावजय भाग१

नात्याची गोष्ट


नणंद भावजय

भाग १

गोखल्यांच्या घरात लग्नाची धावपळ चालू होती. गोखल्यांचे ज्येष्ठ सुपुत्र समीरचे लग्न दोन दिवसावर आले होते. समीर हा गोखले फूड आँफ कंपनीचा मालक होता. समीरचे शिक्षण पूर्ण झाल्यावर कंपनीची जबाबदारी वडिलांनी समीर वर सोपवली होती.
समीर हा मनमिळाऊ, शांत स्वभावाचा ,कुटुंबाची जबाबदारी पेलणारा, मोजके मित्र मैत्रीण असणारा, कामाच्या बाबतीत शिस्तप्रिय व कडक होता अशा या समीरच्या घरात आई-बाबा आजी आजोबा व छोटी बहीण माही होते.
माही हे घरात ली सगळ्यांची लाडकी ,समीरच्या जीव असणारी, खोडकर, सगळ्यांना एकत्र बांधून ठेवणारे, घरातली बडबडी होती .ती कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला होती. ही झाली बहिण भावांची ओळख पण लग्न घरात काय गोंधळ चाललाय तो बघूया
समीरची आई समीरला हळद लावण्यासाठी मागे लागली होती पण तो काही हळद लावून घेत नव्हता. तेवढ्यात माही आली त्याच्या मागे हळद घेऊन पळायला लागली .अख्ख्या घरभर ते पळत होते आणि त्यांची ही पळापळी बघून सगळे जोरात हसायला लागले. शेवटी माहीने समीरच्या अंगावर हळदीचे भांडे पालथे केले. मग काय समीर शांत होऊन हळद लावण्यासाठी पाटावर जाऊन बसला. मग घरातील सगळ्या बायकांनी त्याला हळद लावली.
आज समीर व श्रुतीचे लग्न होते. समीर व श्रुती यांचे लग्न हे मुलगी बघून पोह्याच्या कार्यक्रम होऊन ठरलेले. श्रुती ही लहान मुलांची डॉक्टर होती. ती लहान मुलांची डॉक्टर असल्यामुळे तिच्या अंगात खोडकरपणा होता. पण माही एवढ्या नाही बर का पण थोड्याफार प्रमाणात होताच .त्यामुळे जसं लग्न ठरलं तसं या दोघींचं खूप जमायचं. लग्नाची खरेदी पण दोघींनी मिळून मजा मस्तीने उत्साहाने केली .श्रुतीला बहीण नसल्याकारणाने माहीची खूप काळजी घ्याय ची.
समीर व श्रुतीच्या लग्नात माहीने खूप मस्ती गोंधळ घातला स्वतःही लग्न एन्जॉय केलेच आई-बाबांना व सगळ्यांना करायला लावले लग्नाचे सगळे विधी उरकून गोखले कुटुंब नववधूची वरात घेऊन निघाले माहीच्या भावा बहिणींनी वरातीत नाचून नाचून खूप गोंधळ घातला शेवटी सगळ्यांनी मिळून समीर व श्रुतीला हे आपल्यात नाचायला घेतले मग तर काय नुसता धिंगाणा. जवळजवळ तास दोन तास नाचून झाल्यावर आजी ओरडली .आजी ओरडल्यावर सगळ्यांनी पाणी ,चहा पिऊन गृहप्रवेशाची तयारी केली. आईने काकूंनी दोघांना ओवाळले नंतर घरात यायला सांगितले . तेवढ्यात माही जोरात ओरडली थांबा....

🎭 Series Post

View all