मॅनेजरशीप भाग 6

कंपनी वाचवण्यासाठी एक मॅनेजर किती कष्ट घेतो आणि राजकारणावर काशी मात करतो यांची कथा

भाग 5 वरुन पुढे वाचा ........

त्याच संध्याकाळी विक्रमसिंग, चक्रवर्ती आणि बर्डे सुशील बाबूंच्या बंगल्यावर.

सुशील बाबू बऱ्याच उशिरा घरी आलेत. फाटका पाशी या लोकांना बघून म्हणाले

आता काय नवीन लचांड उभ केलं तुम्ही लोकांनी ?

बाबू, लचांड नाही पण एक महत्वाची गोष्ट सांगायची आहे म्हणून हा विकी आलेला आहे. त्याला एकट्याला यायची भीती वाटत होती म्हणून आम्ही पण आलो.

हं काय रे विकी काय बातमी घेऊन आला आहेस ? चांगली की वाईट ?

ते माहीत नाही पण आज सकाळ पासून मधुकर साहेब,सातपुते साहेब, फिरके साहेब आणि स्वामिनाथन साहेब मीटिंग करत होते. मी अंदाज घेण्याचा प्रयत्न केला पण जमलं नाही. मी दारा पाशी गेल्यावर मला लोकांनी हटकलं आणि दम भरला. आजकाल साहेब आमच कोणी ऐकत नाही.

अरे हा स्वामी काय करत होता तिथे ? त्याचं काय काम ?

नाही माहीत साहेब, पण सकाळची मीटिंग झाल्यावर फिरके साहेब आणि सातपुते साहेब दिवसभर काहीतरी काम करत होते. मग पुन्हा संध्याकाळी मीटिंग झाली. माझी वेळ झाली म्हणून मला निघाव लागलं पण मी बाहेरच उभा होतो. रात्री आठ वाजे पर्यन्त मीटिंग चालली साहेब.

ठीक आहे. बघतो मी. हा नवीन मॅनेजर आल्या पासून सगळं काम बिघडायला लागलं आहे. तुम्ही जरा नजर ठेवा  आणि मला सांगत चला.  या तुम्ही.

सुशील बबूंचा चेहरा चिंताक्रांत होता. एकही काम त्यांच्या मनाप्रमाणे होत नव्हतं. धवन ला फोन करून उपयोग नव्हता. सगळे फायद्याचे साथीदार. कठीण समय

येत कोण कामास येतो अशी अवस्था झाली होती. आता उशीर झाला होता त्यामुळे सकाळी पहिलं काम म्हणजे वकील ला फोन करायचं अस ठरवून त्यांनी बेड रूम चा रास्ता पकडला.

दुसऱ्या दिवशी त्यांनी वकिल् ला फोन लावला.

हॅलो, वकील साहेब, सुशील बोलतोय.

बोला साहेब.

मी तुम्हाला एक काम दिलं होतं. माधुकरची दिनचर्या शोधून काढण्याचं. त्याचं काय झालं. मला कुठलाच फीड बॅक मिळाला नाहीये.

काय देणार साहेब, फीडबॅक ? साधा सरळ माणूस आहे. सकाळी आठ साडे आठ वाजता फॅक्टरीत जातो. रात्री आठच्या सुमारास वापस येतो. दारापाशी डबा ठेवलेला असतो. तो खातो आणि झोपी जातो. गुरवारची सुटी पण हा माणूस घेत नाही. सिनेमा नाही, संध्याकाळच फिरणं नाही. घर ते फॅक्टरी आणि फॅक्टरी ते घर. या पलीकडे काही नाही. नॉनवेज खात नाही. हॉटेल मधून काही बोलावत नाही. सकाळी दूध आणि संध्याकाळचा डबा एवढीच माणसं येतात. बस्स. 

ठीक आहे. बघतो काय करता येतं ते.

सुशील बाबुना काय करांव ते सुचत नव्हत. त्यांचं डोकच चालत नव्हत. अशातच धवन चा फोन आला.

अरे सुशील कहाँ हैं तू ? मेरे फैक्ट्री मे आ सकता हैं क्या अभी ?

मैं तो घर मे हूँ, आ सकता हूँ पर हुआ क्या ? बहुत डिस्टर्ब्ड लग रहे हो.

बात ही ऐसी हैं, तू जलदीसे आ जा, आने के बाद सब पता चल जाएगा.

ठीक हैं.  अभी तुरंत निकलता हूँ आधे घंटे मे पहुंचता हूँ.

सुशील बाबू अर्ध्या तासात धवन कडे पोचले. समोरच त्यांना सचिन दिसला. त्यांना कळेना की सचिन इथे काय करतो आहे ते. असं आजवर कधीच झालं नव्हतं. सचिनला धवन कडे फक्त पार्टीला मटेरियल पाठवायच्या वेळेसच जायची जरूर असते आणि आज तर काहीच माल पाठवायचा नाहीये तेंव्हा हा इथे काय करतोय ?

काय रे सचिन तू इथे काय करतो आहेस ?

साहेब, सर्व फिनिश झालेलं मटेरियल फॅक्टरीत न्यायचं आहे.

का ?

मधुकर साहेबांनी सांगितलं की याच्या पुढे सर्व माल फॅक्टरीतूनच जाईल म्हणून.

का ? काय कारण आहे ?

मला कस माहीत असणार साहेब ? मधुकर साहेबांनाच विचारा.

ठीक आहे मी बोलतो त्यांच्याशी. तू तो पर्यन्त थांब.

ठीक आहे साहेब.

सुशील बाबू आत धवन च्या केबिन मध्ये गेले.

अरे धवन हा काय प्रकार आहे ? मटेरियल वापस चाललंय ?

म्हणून तर तुला अर्जंटली बोलावलं. तूच पहा आता.

तू  असं कर मधुकरला फोन लाव आणि त्याला सांग की तुझं सुशील शी बोलणं झालं आहे आणि त्यांनी सांगितलं आहे की प्रोसीजर मध्ये बदल करण्याची आवश्यकता नाहीये म्हणून. हा मधुकर स्वत:ला मालक समजतो का काय ?

धवनने फोन लावला थोडा वेळ बोलणं झालं मग त्यांनी फोन ठेवला.

काय झालं, प्रॉब्लेम सुटला ना ?

माहीत नाही. तो म्हणतो की डायरेक्टर साहेब असं जर म्हणत असतील तर काहीच हरकत नाहीये. फक्त सुशील बाबूंनी माझा निर्णय फिरवला आहे असं पत्र द्या. म्हणजे माझ्या वर ठपका येणार नाही.

मग काय अडचण आहे ? देऊन टाक तसं पत्र. मी आहेच इथे सपोर्ट करायला.

तू समज़ नहीं रहा हैं सुशील. मुझे नहीं लगता की ये सब मधुकरने अपने दम पर किया होगा. ये लेटर मधुकर तुरंत किरीट के पास लेके जाएगा, किरीट को ये इन्सल्टिंग लग सकता हैं, ये संभावना नकार नहीं सकते. और फिर उसके बाद सब कुछ चौपट हो जाएगा, जरा सोच. थोडा समय ले. वांधा नही.

थोड़ा वेळ  तसाच गेला. प्रकरण किरीट पर्यंत पोचतेय म्हंटल्यावर सुशील बाबू विचारात पडले. त्यांना किरीट शी पंगा घेण्याची इच्छा नव्हती. शेवटी म्हणाले की

मग काय करायचं आता ? मेरे तो धवन कुछ समजमे नहीं आ रहा हैं, अब तुझे जो ठीक लगता हैं वो कर. मधुकरने लिखितमे मटीरीअल की डिमांड की हैं क्या ?

धवननी सचिनला आणि आपल्या माणसाला बोलावलं आणि सांगितलं की यांचं सार मटेरियल वापस करून टाक.  

सचिन नी हुशारी करून फिनिश्ड आणि अनफिनिश्ड असं सर्वच मटेरियल चार ट्रक मध्ये लोड करून घेऊन गेला.

फॅक्टरीत मटेरियल पोचल्यावर पुन्हा एकदा चेकिंग करून व्यवस्थित लाऊन ठेवलं. सगळेच आता थोडे रीलॅक्स झाले होते. पण आता मालाला फिनिश करण्याची जबाबदारी अंगावर येऊन पडली होती. पण मधुकर शांत होता. त्याचं या बाबतीतलं प्लॅनिंग तयार होतं.

*********

मधुकरने  किरीट साहेबांना फोन करून प्रत्यक्ष भेटण्याची विनंती केली. किरीट साहेब म्हणाले की मॅटर इतकं अर्जंट असेल तर ताबडतोब या. मधुकर जेंव्हा त्यांच्या दुसऱ्या ऑफिस मध्ये पोचला तेंव्हा संध्याकाळचे पांच वाजले होते. जयंत साहेबांना पण किरीट ने बोलावून घेतलं होतं.

साहेब, माधुकरने बोलायला सुरवात केली. आपल्या कंपनीची गेली तीन चार वर्षापासून  जी प्रगती खुंटली आहे आणि नुकसानच सहन करावं लागतय त्याचं कारण आज समजलय. आणि मी त्यावर corrective action घ्यायला सुरवात पण केली आहे.

मधुकर साहेब, जरा डीटेल मध्ये सांगाल का ?

हो साहेब, सांगतो. सविस्तर सांगतो.

चक्रवर्ती, तुम्हाला माहितीच आहे की हा माणूस सर्वच डिपार्टमेंट मध्ये लुडबूड करतो. तसंच तो स्टोअर मध्ये सुद्धा करायचा. Tungsten steel सारखी स्पेशल स्टील च्या हिट्स असायच्या त्या वेळेला हा माणूस स्टोअर च्या काट्या  मध्ये गडबड करायचा त्या मुळे कागदो पत्री जरी ठीक असल्या तरी अॅक्चुअल मध्ये बऱ्याच जास्त प्रमाणात अॅडिशन व्हायचे. आणि परिणाम हीट ऑफ जायची. अश्या सगळ्या हीट आपण रिसायक्लिंग न करता स्क्रॅप च्या भावात विकायचो. स्क्रॅप डीलर आणि लक्ष्मी मेटलच  कनेक्शन आहे. तो सगळा  माल जसा च्या तसा लक्ष्मी मेटल मध्ये जातो. लक्ष्मी मेटल कडे आपण माल जॉबवर्क साठी  पाठवतो आणि तेथूनच पार्टी कडे रवाना करतो. या प्रोसेस मध्ये लक्ष्मी मेटल मध्ये स्क्रॅप चा माल चांगल्या मालात मिसळून पार्टी ला जातो, आणि रीजेक्ट होऊन वापस येतो. तो माल पुन्हा आपण स्क्रॅप म्हणून काढून टाकतो. हे सायकल ऑटोमॅटिक सतत चालू आहे. यात चक्रवर्ती बरोबरच विक्रमसिंग आणि बर्डे पण सामील आहेत.

मधुकर साहेब, हे जे काही तुम्ही सांगता आहात,ते फार भयंकरच आहे. पण हा सगळा अंदाज आहे की काही प्रूफस पण गोळा  केले आहेत. ? कारण त्याशिवाय आपल्याला काहीच अॅक्शन घेता येणार नाही.

आम्ही जे मटेरियल स्क्रॅप केलं त्याचं आणि वापस आलेल्या मालाचं chemical composition चेक केलं आणि ते तंतोतंत जुळलं आहे. आधी संशय होता पण आता तो पक्का झालाय. दुसरं स्टोअर चा कर्मचारी, भानाजी, याने कबुली दिली आहे की चक्रवर्ती नेहमीच स्पेशल स्टील च्या वेळेस काट्या मध्ये गडबड करायचा आणि नंतर पूर्ववत करून ठेवायचा. काटा हा उघडता येत नाही. कायद्याने तो गुन्हा आहे. उघडलाच  तर तो पुन्हा प्रमाणित करून घ्यावा  लागतो.

मधुकर साहेब, ही सगळी छोटी माणसे आहेत. बोलविता धनी कोणी वेगळाच असला पाहिजे. ते कळलं का ?

साहेब, ही सगळी सुशील बाबूंची माणसे आहेत.

मग मधुकरनी त्यांना मशीन च्या दुरुस्तीच्या वेळेचा प्रसंग सांगितला, स्क्रॅप

च्या ट्रक लोडिंग  च्या वेळी काय झालं ते सांगितलं. मग म्हणाला की आज मी लक्ष्मी मेटल मधून सर्व माल वापस बोलावला. त्या वेळी लक्ष्मी मेटल चे धवन म्हणाले की सुशील बाबूंशी बोलणं झालं आहे आणि त्यांनी माल पाठवण्याची गरज नाही असं सांगितलं आहे. त्या वेळी सुशील बाबू तिथे हजर होते. सचिन चा त्या प्रमाणे फोन आला तेंव्हा मी त्याला सांगितलं की जे काही म्हणण असेल ते लिखित मध्ये घेऊन ये.

मग ?

मग काही नाही. तासाभरात चारी गाड्या लोड झाल्या आणि आपल्या फॅक्टरीत पोचल्या. क्रॉस चेक करून आम्ही खात्री पण करून घेतली आहे.

ते सर्व ठीकच आहे पण स्क्रॅप लक्ष्मी मेटल मध्ये पोचतं आणि तेच पार्टीला पाठवल्या जातं याचं काय प्रूफ आहे ?

ते पण प्रूफ मिळेल, तशी व्यवस्था मी केलीय पण त्या साठी थोड थांबाव लागेल.

म्हणजे नेमक काय केलं आहे तुम्ही ?

स्क्रॅप डीलर कडून लक्ष्मी मेटल ला जे स्क्रॅप पाठवल्या गेलं त्यांचे कच्चे, पक्के जसे असतील तसे challan च्या कॉपी मागवल्या आहेत. त्या साठी मी एका प्रायवेट डिटेकटीव एजन्सी ची मदत घेतली आहे. हे साहित्य मिळालं की मग आपल्याला अॅक्शन घेता येईल.

आणखी एक गोष्ट. आपल्याकडे ब्रेक ड्रम ची ऑर्डर आहे आणि त्याचं अत्यंत कमी किमतीत रेट फिक्स झाला आहे आणि हे सर्व सुशील बाबूंनी केलं आहे. अॅक्चुअली  हे ड्रम नाहीत तर windmill चे हब आहेत आणि ते एक्सपोर्ट होतात ही बाबूंच्या भाच्याची कंपनी आहे. याच्या साठी स्पेशल कास्टिंगस लागतात. आपल्याला साफ गंडवलं आहे त्यांनी.

बापरे. किरीटसाहेब आता चिडले होते. जयंता हे पैसे सुशील बाबूंकडून वसूल करायलाच पाहिजेत. पण मधुकर साहेब, एक गोष्ट लक्षात ये नाही की आपलं

खराब मटेरियल ते पार्टीला पाठवत होते तर चांगल्या  मालाच काय करत होते ?

ते बहुधा दुसऱ्या पार्टीला विकत असावेत. या बद्दल सुद्धा मी एजन्सी ला पत्ता आणि प्रूफ काढायला सांगितलं आहे.

अजून काही आहे ?

आहे ना साहेब, आमच्या म्हणजे मी,सातपुते, फिरके आणि स्वामी यांच्या ज्या मिटिंग्स करत होतो त्यांचे सर्व डिटेल्स देण्या बद्दल सुशील बाबूंनी या चौघांना धमकावलं होतं. अर्थात कोणी त्यांना काहीच सांगितलं नाही हे वेगळं सांगायला नकोच.

म्हणजे या एजन्सी कडून पुरावे येई पर्यन्त  आपल्याला गप्प बसायचं आहे. पुरावे हातात आल्यावर मग यांना मी सोडणार नाही. किरीट साहेब खूपच संतापले होते.

माझा असा अंदाज आहे की आपल्या कंपनी ची आर्थिक स्थिति खूपच खालावली  की कंपनी ताब्यात घ्यायचा त्यांचा प्लान असावा.

जयंत आणि किरीट दोघांचेही चेहरे गंभीर झाले होते.

साहेब, एक विनंती आहे.

काय ?

आज सगळं मटेरियल वापस बोलावलं आहे. पण आपल्याकडे फिनिशिंग ची व्यवस्था नाहीये. मला अस वाटत की दुसरीकडे देण्या पेक्षा आपणच फिनिशिंग डिपार्टमेंट सुरू करावं म्हणजे कसलाच गोंधळ होणार नाही.

तुम्ही म्हणता ते बरोबर आहे पण इतक्या लवकर ते कार्यान्वित होईल का ? आणि किती खर्च येईल ?

कार्यान्वित करण्याची जबाबदारी माझी. फक्त खर्चाच तेवढ तुम्हालाच बघाव लागेल.

मधुकर साहेब, तुम्ही कामाला लागा, पैशांची कमी तुम्हाला पडणार नाही यांची मी हमी देतो. जयंत साहेब बोलले.

क्रमश:............

दिलीप भिडे पुणे

मो :9284623729

dilipbhide@yahoo.com                             

🎭 Series Post

View all