भाग 4 वरुन पुढे वाचा .........
घरी जायला थोडा उशीरच झाला होता. दाराबाहेर जेवणाचा डबा येऊन पडला होता. वॉश घेऊन फ्रेश झाल्यावर त्यानी जेवण गरम करायला घेतलं, जेवण झाल्यावर गॅलरीत आरामात बसला होता पण सकाळपासूनचा घटनाक्रम डोळ्यांसामोरून हलायला तयार नव्हता. किरीट साहेबांना फोन करावा का ?त्यांना यांची माहिती द्यायला पाहिजे. आत्ता केला तर चालेल का? तो विचार करत होता. घड्याळात पाहिलं ,साडे नऊ वाजले होते रात्रीचे, तसा फार उशीर झाला नव्हता. त्यांनी फोन उचलला आणि किरीट साहेबांचा नंबर फिरवला.
***
हॅलो धवन, सुशील बोल रहा हूं. इथे मोठाच घोटाळा झाला आहे.
काय झालं. इतकं अप्सेट व्हायला काय झालं ?
सुशील बाबूंनी मग दिवसभरात काय काय घडलं त्याचा पाढा वाचला.
धवन विचारात पडला.
सुशील मुझे जरा सोचने दो. I will call you back.
जलदी सोचो भाई. लक्ष्मी मेटल बंद व्हायची वेळ आली आहे.
मी फोन करतो.
धवन विचारात पडला. स्क्रॅप मधून tungsten आणि molubdenum परत मिळवणं हे एक चांगलच फायदेशीर काम होतं. आणि windmill hub चे
dimensionally rejected ड्रम जर मिळाले नाहीत, तर प्रॉफिट मध्ये खूपच फरक पडला असता. सुशील च्या म्हणण्यानुसार मधुकर जी पावलं उचलतो आहे त्यामुळे रीजेक्शनस खूपच कमी होताहेत आणि जी होतील ती सुद्धा आपल्याला मिळणार नाहीत अशी व्यवस्था तो करेल म्हणजे आपल्या कंपनी ला फारसा फटका बसणार नाही पण सुशील चं मात्र चांगलच नुकसान होणार आहे. या मधुकरचा बंदोबस्त करायलाच पाहिजे. पण हा सुशील चा प्रश्न आहे. आपण या भानगडीत पडायचं नाही. इंडस्ट्री कम्यूनिटी मध्ये आपल्या कंपनी चं नाव खराब व्हायला नको. यातून आपण हात काढून घ्यावा हेच बरोबर.
तासांभाराने पुन्हा सुशील चा फोन आला.
काय विचार केला ? काही मार्ग सुचतो आहे का ?
सुशील मुझे ऐसा लगता ही की आपण आत्ता काहीच करू शकत नाही. शांत रहा आणि सिचुएशन कशी turn घेते, ते बघू आणि मगच ठरवू. सध्या wait and watch हीच पॉलिसी ठेवूया. तू चक्रवर्ती आणि बर्डे बद्दल जयंताशी बोलून बघ, कदाचित काही मार्ग निघेल. कमीतकमी आपल्याला हे तर कळेल की परिस्थिति बदलू शकते की नाही ते. मग line of action ठरवता येईल.
म्हणजे तू आत्ता काहीच करणार नाही तर.
नाही, आत्ता काही करण्यासारख आहे असं मला वाटत नाही. बाय.
सुशील बाबू भयंकर चिडले होते. पण ते धवनला काहीच म्हणू शकत नव्हते.
त्यांनी पुन्हा वकील साहेबांना फोन लावला. आणि त्यांना मधुकरची दिनचर्या काय आहे यांची इत्थंभूत माहिती काढायला सांगितली.
***
सर, मी मधुकर सरनाईक, जरा उशीरच झाला आहे पण थोडं बोलायचं होतं.
तुम्हाला वेळ असेल तर बोलू का ?
अरे, मधुकर साहेब, I am always available for you. I know if it ia not that important, you will not disturb me. बोला काय वार्ता आहे. सकाळी जे काही झालं त्या बद्दलच आहे का ? जयंता पण इथेच आहे. मी स्पीकर वर टाकतो आहे.
मधुकरला जरा बरंच वाटलं, दोघांनाही कळेल की आज काय घडामोडी झाल्यात ते. मग त्यांनी दिवसभरात काय काय घडलं ते अगदी सविस्तर सांगितलं.
सगळं ऐकून घेतल्यावर किरीट साहेब म्हणाले की आता पुढची काय अॅक्शन घेणार आहात तुम्ही.
आधी या स्क्रॅप च्या प्रवासाचा end point शोधून काढणार मग ती लिंक कुठे जुळते ते बघणार म्हणजे या सगळ्यांच्या मागे कोण आहे आणि काय उद्देश आहे ते कळेल. त्या नंतर अॅक्शन घेणं सोपं होईल. In the meantime चक्रवर्ती आणि बरड्यांची चौकशी चालू करणार. त्यातूनही काही महत्वाची माहिती मिळू शकेल. अर्थात तुम्ही ओके केलत तरच मी समोर जाऊ शकेन.
दोन मिनिटं होल्ड करा. किरीट साहेब बोलले.
पांच मिनिटांनंतर फोन वर जयंत साहेबांचा आवाज आला.
मधुकर साहेब, तुमची line of action आम्हाला बरोबर वाटते आहे. आमच्या कडून ओके आहे. पण पुन्हा एकदा सांगतो की If required, you will have to justify your actions. Only thing is that, just ensure that whatever you do is in the interest of company.
होय साहेब.
दुसऱ्या दिवशी मधुकरने प्रोसेस कंट्रोल आपल्या अधिकारात घेतलं. सातपूत्यांना बरोबर घेऊन प्रत्येक प्रोसेस अत्यंत काळजी पूर्वक तपासायला घेतली. जिथे जिथे बदल आवश्यक होते ते करून final tables तयार केलेत. सर्व प्रॉडक्शन सुपरवायजर्स साठी सूचना लिहून दिल्या. आता रीजेक्शन nil असायला पाहिजे.
त्या दिवशी दुपारी त्यांनी त्यांच्या मित्राला फोन करून कोणी experienced metallurgical इंजीनियर आहे का ? असेल तर सांग आम्हाला हवा आहे असं सांगितलं.
मग फिरके साहेबांना फोन करून सांगितलं की गेल्या वर्षभरातले invoices घेऊन या. ते आल्यावर चेक केलेत. हाय स्पीड आणि स्पेशल स्टील चे चार क्लायन्ट होते आणि ब्रेक ड्रम चा एक.
फिरके साहेब, ज्या quantity मध्ये हे dispatches होताहेत, तेवढी फिनिश करण्याची आपली क्षमता नाहीये. मग हे कुठे बाहेर पाठवल्या जातात का ?
होय साहेब. लक्ष्मी मेटल मध्ये आपण जॉब वर्क करायला पाठवतो आणि मग तेथूनच पुढे फायनल dispatch होतं.
आता बर्डे नाहीयेत मग कोण बघणार आहे ?
बर्डे हे बघत नाहीत. सचिन बघतो.
सचिन म्हणजे अकाऊंटंट ?
होय साहेब.
मधुकरने फोन लावला. आणि सचिनला बोलावून घेतलं.
सचीन, आपण जॉबवर्क ला जे मटेरियल पाठवतो ते फक्त लक्ष्मी मेटल्स मध्येच
जातं का ? का अजून दुसरीकडे पण जातं ?
फक्त लक्ष्मी मेटल मध्येच साहेब.
ओके जा तू.
फिरके साहेब, एंड यूजर कडून आपल्याला काही rejections येतात का ?
येतात साहेब नेहमीच येतात.
आणि ते आपण स्क्रॅप डीलर कडे पाठवतो ?
होय साहेब.
फिरके साहेब आता एक काम करा, गेल्या वर्षभरातले वापस आलेल्या माटेरियलची
सगळी माहिती गोळा करा. सातपुते साहेबांना घ्या मदतीला. झालं की घेऊन या.
आणि हो स्क्रॅप डीलर कोण आहे ?
लोहाणा स्टील स्क्रॅप म्हणून आहेत त्यांच्याकडेच सर्व स्क्रॅप जातं.
ओके वर्षभरात त्यांच्याकडे जे काही स्क्रॅप गेलं त्यांचे कंप्लीट डिटेल्स मला हवेत.
जमेल ना ?
हो साहेब.
ठीक, या तुम्ही. .
एव्हाना बराच उशीर झाला होता म्हणून माधुकरने सगळं आवरलं आणि घरी जायला निघाला.
दुसऱ्या दिवशी सातपुते आणि फिरके त्यांची वाटच बघत होते. सर्व डिटेल्स च्या शीट त्यांच्या समोर होत्या आणि त्या बद्दलच ते बोलत होते. थोडं इकडच तिकडचं बोलणं झाल्यावर मधुकर म्हणाला की
फिरके हा स्वामिनाथन कसा माणूस आहे ? या माणसावर आपण विश्वास ठेऊ शकतो का ?
हो साहेब क्लीन माणूस आहे. अबोल आहे, त्याचं जे काम आहे ते तो चोख करतो आहे. सुशील बाबू त्यांच्या वाटेला फारसे जात नाहीत. त्यांनी एकदाच सुशील बाबूंना सुनावलं होतं की कुठलंही, कायद्यात न बसणार काम ते करणार नाहीत म्हणून. . मोठ्या देसाई साहेबांनी त्यांची हुशारी आणि प्रामाणिक पणा पाहूनच त्याला इथे आणलं होतं. त्यामुळे त्याला हात लावण्याची सुशीलबाबूंना हिम्मत झाली नाही.
ओके म्हणजे आपण त्यांच्याशी बोलू शकतो..
हो साहेब.
माधुकरने फोन करून त्याला बोलावून घेतलं.
स्वामिनाथन साहेब, आपल्या कंपनीची आर्थिक स्थिति ही गेल्या दोन तीन वर्षांपासून हळूहळू ढासळते आहे हे खरं आहे का ?
हो साहेब.
मग याचं अनॅलिसिस केलं का ? कोण कोणते फॅक्टर्स आहेत की ज्यांच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. हे सांगू शकाल का ?
फिरके आणि सातपुते मधुकर कडे प्रश्नार्थक मुद्रेने बघत होते. त्यांना कळेना की मटेरियल च्या डिसकशन मध्ये आर्थिक स्थिति बद्दल मधुकर का विचारतो आहे. पण त्यांनी गप्प बसण्यात शहाणपणा आहे अस ठरवून पुढे काय होतं ते बघत बसले.
हो साहेब, मी आणि फिरके साहेब दोघांनी यावर बराच वेळ खर्ची घातला आहे. आणि निष्कर्ष पण काढलेत.
मग ते कोणाला दाखवले ?
सुशील साहेबांना प्रिंट आउट काढून दिले होते आणि तोंडी पण सांगितलं होतं.
मग ?
ते म्हणाले की ते किरीट आणि जयंत साहेबांशी बोलतील, आणि यावर ते corrective action घेतील म्हणून. पण तसं काही झालेलं दिसत नाहीये.
फिरके तुम्ही याबद्दल किरीट साहेबांशी काही बोलला का ?
हो साहेब, ते म्हणाले की यावर उपाय सापडला आहे. काळजी करू नका. लवकरच सर्व ठीक होईल.
ओके. ते जे काय निष्कर्ष असतील ते जरा सांगता का ?
साहेब, नंबर 1
Rejections पार्टी ने ठरवून दिलेल्या प्रमाणापेक्षा जास्त असल्याने दोन पार्ट्या आपल्या कडून माल घेत नाही. हा एक मोठा सेट बॅक बसला आहे.
नंबर 2
पार्टी कडून माल वापस येण्याचं प्रमाण खूपच वाढलं आहे. वापस आलेला माल स्क्रॅप च्या भावाने विकला जातो आहे. वरतून ऑर्डर पूर्ण करण्यासाठी पुन्हा तो माल बनवावा लागतो. आणि त्यांच्यातही काही प्रमाणात वापस येतो. या सगळ्यात कंपनीच आतोनात नुकसान होतं आहे. डबल प्रॉडक्शन घेण्यात वेळ आणि लेबर वाया जातंय ते वेगळंच. खूप नुकसान होतेय साहेब.
मला जरा वेगळाच संशय येतो आहे. म्हणजे आत्ता पक्क सांगता येणार नाही. क्रॉस चेक केल्यावरच सर्व गोष्टी उघड होतील. सातपुते साहेब, आपण जे मटेरियल
स्क्रॅप म्हणून पाठवतो, त्यांचे हीट नंबर्स रेकॉर्ड करून ठेवतो का ?
हो साहेब. तो सगळं रेकॉर्ड आहे माझ्याकडे.
आता जे मटेरियल वापस येतं त्याचं केमिकल कोंपोझिशन चेक करता का आणि रेकॉर्ड ठेवता का ?
हो साहेब.
मग आता एक काम करा, जरा किचकट आहे पण करा. स्क्रॅप मटेरियल च्या हीट नंबर वरुन त्यांची केमिस्ट्रि काढा. आणि वापस आलेल्या मटेरियल शी मॅच करून घ्या. हीट नंबर्स वेगवेगळे असतील पण केमिस्ट्रि will speak the truth. काही लक्षात येतेय का ?
होय साहेब, बापरे, हे जर असं असेल तर हे बरंच मोठं अतिशय हुषारीने केलेलं कारस्थान असेल. My god.
माझ्या मते हे असच असण्याची शक्यता बरीच आहे. तेंव्हा आता आपल्याला सांभाळूनच पुढची पावलं उचलायची आहेत. तुम्ही सगळे तयार आहात न ?
होय साहेब. सगळेच एकसुरात बोलले.
ठीक तर मग. शक्यतो आजच गेल्या वर्षभरातले आकडे तयार करून या म्हणजे आपल्याला काही महत्वाचे निर्णय घेता येतील. आणि हो तुम्ही कसल्या कामात गुंतले आहात हे कोणालाही कळू देऊ नका. भिंतीला कान असतात हे लक्षात घ्या.
ठीक आहे साहेब. मीटिंग संपली.
संध्याकाळी पुन्हा मीटिंग भरली. सातपुते साहेबांनीच बोलायला सुरवात केली.
साहेब, तुमचा संशय खरा ठरला. स्क्रॅप आणि वापस आलेलं मटेरियल यांचं कोंपोझिशन मिळतं आहे.
मग यांचा काय अर्थ काढला तुम्ही ?
आपलं मटेरियल आपण लक्ष्मी मेटल मध्ये जॉब वर्क ला पाठवतो आणि तेथूनच पार्टी ला पाठवतो. आणि स्क्रॅप आपण लोहाणा कडे पाठवतो. निष्कर्ष असा निघतो की लोहाणा आणि लक्ष्मी मेटल यांचं कनेक्शन आहे आणि स्क्रॅप लक्ष्मीला जात असलं पाहिजे आणि पार्टीला पाठवतांना हे मटेरियल त्यात मिसळून पाठवल्या जात.
करेक्ट.
मग साहेब आता काय अॅक्शन घ्यायची ?
लक्ष्मी मेटल मध्ये असलेलं सर्व मटेरियल जसं असेल तश्याच स्थितीत वापस बोलवा. त्यांचं जे काही पेमेंट असेल ते देऊन टाका. त्यांना सांगा की आता यापुढे सर्व मटेरियल आंमच्याकडूनच पार्टीला जात जाईल.
साहेब फक्त फिनिश मटेरियलच मागवु. बाकीच जॉबवर्क कंप्लीट झाल्यावर आणू. म्हणजे त्यांना फारसा संशय येणार नाही. आपण त्यांना सांगू की हा नवीन साहेबांचा निर्णय आहे. मग सुशील साहेब काय स्टेप्स घेतात बघता येईल.
वा स्वामिनाथन साहेब एकदम बरोबर बोललात. सातपुते, असच करा. पण उद्याच्या उद्याच करा.
होय साहेब. उद्याच सर्व फिनिश मटेरियल मागवून घेतो आणि लवकरात लवकर जॉबवर्क कंप्लीट करायला सांगतो.
ओके चला let us call it a day. Don’t forget to keep this confidential.
क्रमश:..........
दिलीप भिडे पुणे
मो :9284623729
dilipbhide@yahoo.com