मॅनेजरशीप भाग 4

The story tells how one manager takes immense efforts to save the company

भाग 3 वरुन  पुढे वाचा ........

चक्रवर्ती आणि बर्डे दोघांनाही जे काही घडलं ते अगदीच अनपेक्षित होतं. दोघांनाही कळत नव्हतं की आता काय करायचं ते. शेवटी चहा पिता पिता विचार करू आणि काय ते ठरवू  असा विचार करून ते चहाच्या टपरीवर गेले. दोघांच्याही मते सुशील बाबूंना भेटून,सर्व घटना सांगणे आवश्यक होते. पण आत्ता या वेळी सुशील बाबू भेटणं शक्य नव्हतं. मग संध्याकाळी जाण्याचे ठरले. दोघांनाही दारूची अनिवार तलफ आली होती पण मग सुशील बाबूंच्या वॉचमन ने त्यांना गेट च्या आत पण घेतलं नसतं म्हणून त्यांनी तो विचार झटकून टाकला. रात्री बघू अस ठरवून घरचा रास्ता धरला.

संध्याकाळी दोघंही सुशील बबूंच्या घरी. सुशील बाबू घरी नव्हते, मग एका चहाच्या टपरीवर जाऊन चहा घेतला आणि वापस सुशील बाबू. ते अजून घरी आले नव्हते. त्या दोघांनी वॉचमनला म्हणाले की एकदा मॅडमला  विचारा की केंव्हा येणार आहेत ते. वॉचमन आत गेला आणि विचारून आला.

वॉचमन ने येऊन निरोप सांगितला की बाबूंना यायला रात्री उशीर होणार आहे तेंव्हा तुम्ही उद्या सकाळी येऊन बघा. झालं. सगळंच फिस्कटलं. आता काय करायचं ? सुशील बाबू तर भेटणार नव्हतेच मग सरळ दारूचा कार्यक्रम करायला काय हरकत आहे ? दोघांचही यावर एकमत झालं आणि ते चालू पडणार इतक्यात सुशील बाबूंचीच गाडी येतांना दिसली. ते तिथेच गेटवर थांबले आणि बाबूंना नमस्कार केला. थोड्यावेळाने बाबूंनी त्यांना बोलावलं.

आता काय गोंधळ घातला तुम्ही दोघांनी ?

गोंधळ आम्ही नाही, मधुकर साहेबांनी घातला आहे. ते मधुकर साहेब, आपल्याला वाटलं त्या पेक्षा जास्तीच हुशार आहेत. सुशील बाबू, खूपच गडबड झाली आहे.

त्यांनी आम्हाला सस्पेंड केलं आहे. Suspended pending enquiry. असं लिहिलं आहे. म्हणजे जितके दिवस चौकशी चालेल तितके दिवस.

असं !, काय घडलं ते नीट सविस्तर सांगा.

बर्डे बोलले, बाबू, तुमच्या सांगण्या प्रमाणे आम्ही स्क्रॅप चे ट्रक लोड करायला घेतले होते. ते ही अगदी सकाळी सकाळी, पण का कोण जाणे, मधुकर साहेब आज नेमके खूप लवकर आलेत. त्यांनी ट्रक पाहिले आणि चेक केलेत. मग माल जो लोड केला होता तो उतरवायला सांगितलं.

मग चक्रवर्ती म्हणाला की आम्ही त्यांना सांगितलं की सुशील बाबूंच्या ऑर्डर्स आहेत म्हणून पण त्यांनी ऐकलं नाही.

मग काय झालं ?

आम्ही ट्रक लोडिंग सुरूच ठेवलं. तुमचे आदेशच होते तसे.

मग ?

मग आम्हाला बोलावून काही न बोलता सरळ  ही पत्र हातात दिली. आम्हाला आमच्या टेबलावर सुद्धा जावू दिलं नाही, सरळ बाहेर काढलं.

लेटर मध्ये काय आरोप लावला आहे ?

वरिष्ठांना अंधारात ठेऊन आणि त्यांच्या आदेशाचे उल्लंघन करून कंपनी चा माल परस्पर बाहेर काढण्याचा प्रयत्न करणे हा आरोप ठेवला आहे साहेब. वरतून pending enquiry, म्हणजे आता चौकशी अधिकारी नेमणार आणि चौकशी पूर्ण होईपर्यन्त आम्ही बाहेर, मग साहेब सगळंच बाहेर येणार. सुशील बाबू आता तुम्हालाच काहीतरी करांव लागणार आहे. त्या माधुकरला आवरा साहेब. तो फार भयंकर माणूस आहे.

ठीक आहे मी बघतो काय करायचं ते. आता तुम्ही जा. मेहरबानी करा आणि भांडू

नका. शांत रहा.

सुशील बाबू भयंकर संतापले होते. मधुकर आल्या नंतर जवळ जवळ चार महीने सर्व काही ठीक चाललं होतं. त्यांना  वाटलं होतं की हा माणूस पण इतरांसारखाच आहे. याला आपण सहज आपल्या बाजूने वळवू. पण गेल्या महिन्यायाभरात मधुकरने जे उद्योग केले होते त्यावरून हे प्रकरण काही साध सरळ दिसत नव्हतं.

आज तर हद्दच झाली होती. त्यांचा माल रोकण्यात आला होता.

त्यांनी वकील साहेबांना फोन लावला.

हॅलो, वकील साहेब, मी सुशील अग्रवाल बोलतो आहे. मी दहा बारा दिवसांपूर्वी तुमच्यावर एक काम सोपवलं होतं त्याचा काहीच रिपोर्ट मला अजून मिळाला नाही.

साहेब मी आता तुम्हाला फोनच करणार होतो की केंव्हा भेटायला येऊ म्हणून.

आत्ता येऊ ?

या. मी वाट पाहतो आहे.

वकील आल्यावर सुशील बाबू म्हणाले की Let us get in to the business No preamble. तुम्हाला जे काही कळलं आहे ते लगेच आणि सर्व सांगा.

होय सुशील बाबू.

मधुकर हा मूळचा इंदोऱ् चा. त्यांचे आई वडील इंदोऱलाच होते. त्यांचा तिथे मोठा वाडा आहे. दहा पंधरा भाडेकरी राहतात. जवळ जवळ 30000 sq. फूटाची जागा आहे आणि तीही मोक्याच्या जागी. दोन वर्षांपूर्वी सहा महिन्याच्या अंतराने त्यांचे आई आणि वडील दोघंही मृत्यू पावले. एक मोठी बहीण आहे. तिचा नवरा व्यावसाईक आहे आणि ते ही गडगंज श्रीमंत आहेत. प्रॉपर्टी ची देखभाल तेच करतात. मधुकरला प्रॉपर्टी मध्ये फारसा interest नाहीये.

मधुकर हा आखाड्यात घुमलेला माणूस आहे. पिळदार शरीरयष्टी लाभलेला हा माणूस अतिशय हुशार आहे. आणि त्याच बरोबर निर्व्यसनी पण आहे. हा माणूस एकदम स्वछ चारित्र्याचा आहे. Metallurgical इंजीनीरिंग मध्ये डिग्री घेतल्यावर त्यांनी M. tech केल. फौंडरी वर्तुळात त्याचं नाव फार आदराने घेतल्या जातं. साहेब, हा माणूस फक्त आणि फक्त कामावर प्रेम करतो. याचं लग्न झालेलं नाही आणि कुठल्याही मुलीबरोबर याच संधान पण नाही.

सुशील बाबू विचारात पडले. थोड्या वेळाने म्हणाले की वकील साहेब, इतकी सारी माहिती तुम्ही गोळा केलीत. पण यात एकही अशी गोष्ट नाही की जिचा आम्हाला उपयोग करून घेता येईल. मी तुम्हाला म्हंटलं होतं की यांचे weak points शोधा जेणेकरून त्याला कंपनीतून घालवता येईल. पण तुम्ही तर फक्त त्यांची तारीफच करता आहात.

सुशील बाबू आम्ही investigator आहोत. मिळेल ती माहिती गोळा करणे आणि  ती तुमच्यापर्यंत पोचवणं हे आमचं काम. मिळालेल्या माहितीतून तुमच्या उपयोगाचं काय आहे ते आम्हाला कसं कळणार ? ते तुम्ही शोधायचं. Weak points च म्हणाल तर हा माणूस  work alcoholic आहे. काम, काम आणि काम हाच यांचा Weak point आहे. बरं अजून काही नसेल तर मी निघू आता ?

सुशील बाबूंनी मान डोलावली. म्हणाले की काही वाटलं तर सांगतो.

दोन महत्वाचे मोहरे चक्रवर्ती आणि बर्डे, गळाले होते. धंद्यावर चांगलाच आणि तो ही लॉन्ग टर्म परिणाम होणार होता. मधुकर च्या चाली वरुन तो पूर्ण investigation केल्या शिवाय थांबणार नव्हता हे लक्षात येत होतं. मधुकरची नेमणूक जयंत आणि किरीट ने केली असल्याने त्याला हात लावणं अवघड होतं. सुशील बाबू विचार करत होते की काय करांव ? Investigation त्यांच्या पर्यन्त पोचण्याची शक्यता त्यांच्या ध्यानात आली होती.  प्रकरण आंगावर येण्या आधीच झटकणं आवश्यक होतं. पण कसं ? धवन ला हे सगळं सांगण्याची त्यांची इच्छा नव्हती पण आता त्यांना दूसरा मार्ग दिसत नव्हता. त्यांनी धवन ला फोन लावला.

***

ऑफिस मध्ये आल्यावर मधुकर वर्षभरातले जे रीजेक्शन रिपोर्टस होते ते आणि टाइम ऑफिस मधून आलेले ड्यूटि चार्टस घेऊन बसला होता. सातपुते आल्यावर त्यांना सांगितलं की जे ट्रक मध्ये मटेरियल भरल्या गेलं होतं त्यांच्या डेट्स काय आहेत ते त्यांच्या markings वरुन  काढा. त्या हिट्स  कोणच्या शिफ्ट मध्ये

टॅप झाल्या आहेत ते आणि शिफ्ट मध्ये सर्व डिपार्टमेंट चे कोण कोण लोक होते त्यांची लिस्ट काढा आणि झाल्यावर लगेच घेऊन या. आणि हो सगळ्यांचे केमिकल अनॅलिसिस पण घेऊन या. दीड तासानंतर सातपुते सगळे डिटेल्स घेऊन आले.

बराच वेळ लागला ?

हो साहेब नीट रचून ठेवायला वेळ लागला. पुन्हा reference लागला तर चटकन मिळावा म्हणून व्यवस्थित लावून ठेवलं.

छान. आता मला सांगा जे ingots ट्रक मध्ये होते ते सर्व high speed steel चे होते ?

हो साहेब.

ते का रीजेक्ट झाले ?

Tungsten आणि molybdenum प्रमाणा पेक्षा खूपच जास्त होतं. क्लायंट ने दिलेल्या रेंज च्या बाहेर होतं म्हणून रीजेक्ट करावे लागले.

ओके आता मला हे सांगा की या हिट्स वर कोण melter होते.

ठाकूर दोन हिट्स वर, ओझा तीन हिट्स वर आणि थॉमस तीन हिट्स वर.

आत्ता कोण आहे ?

थॉमस

बोलवा त्याला.

निरोप आला की हीट टॅप होते आहे म्हणून सगळं आटोपल्यावर येतो.

साहेब थॉमस, ठाकूर आणि ओझा, तिघेही अत्यंत कर्तव्य दक्ष इंजीनियर आहेत. त्यांच्या शिफ्ट मध्ये इतक्या साऱ्या  हिट्स ऑफ गेल्या हे नवल आहे. मी प्रत्येकाशी या बाबतीत बोललो आहे. त्यांनी जे डिटेल्स दिलेत त्यावरून त्यांचा काही दोष दिसत नाहीये.

Additions इतक्या जास्त प्रमाणात कशा केल्या गेल्या हे विचारलं ?

होय साहेब त्यांनी जे आकडे सांगितले ते बरोबरच आहेत आणि मी स्टोअर च्या रजिस्टर वरून चेक केलं साहेब. सगळं बरोबर दिसतंय.

तरीही हिट्स ऑफ गेल्यात ? रीजेक्शन करावं लागलं  ?

होय साहेब.

तासा भराने थॉमस आला. माधुकरने त्याला बसायला सांगितलं.

थॉमस, माझ्या समोर हे तीन हिट्स चे डिटेल्स पडले आहेत. हे सर्व प्रॉडक्शन प्रमाणा बाहेर additions केल्या म्हणून रीजेक्ट झालं आहे. या सर्व हिट्स वर melter तू होतास. Can you explain why this has happened?

साहेब, additions किती करायच्या याचे प्रमाण ठरलेले आहे. आणि त्या नुसारच केल्या गेलं आहे. तरीही हिट्स कशा ऑफ गेल्यात ही कळत नाही साहेब.

मटेरियल चं वजन कोणी केलं त्या दिवशी ?

साहेब, एका मागोमाग तीन हिट्स चा प्रोग्रॅम होता  आणि ते ही सेकंड, आणि नाइट शिफ्ट मध्ये. त्यामुळे ज्या, ज्या मटेरियलच अॅडिशन करायचं होतं ते ते सर्व वेगवेगळ्या प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये भरून हीट नंबर आणि वजन लिहून, प्लॅटफॉर्म वर, दिवसाच आणून ठेवलं होतं.

मी विचारलं की वजन कोणी केलं ?

माहीत नाही साहेब कारण स्टोअर च्या माणसानेच आणून ठेवलं होतं.

त्या माणसाला बोलवा.

थॉमस गेला आणि त्या माणसाला, भानाजी ला  घेऊन आला.

भानाजी, या तारखेला तू जे मटेरियल थॉमस साहेबांना नेऊन दिलं त्याचं वजन तू केलं  होतास का ?

नाही साहेब, वजन करायचं काम बर्डे साहेबच करतात. पण त्या दिवशी चक्रवर्ती साहेब तिथे होते आणि त्यांनी आधी सहज कांटा चेक केला आणि म्हणाले की काहीतरी गडबड आहे म्हणून त्यांनी कांटा उघडून तो ठीक केला साहेब, काय ते मला माहीत नाही. मग बर्डे साहेबांनी वजन करून मटेरियल पाठवलं.

चक्रवर्ती नेहमीच कांटा चेक करतो का ?

बरेच वेळा करतात.

या घटनेनंतर केंव्हा हात लावला ?

सामान दिल्यानंतर लगेचच ते म्हणाले की त्यांचं समाधान झालं नाही म्हणून त्यांनी पुन्हा कांटा उघडला.

सातपुते, थॉमस तुमच्या लक्षात आलं का काय प्रकार आहे ते ? आधी कांटा बिघडवायचा मग वजन करून मटेरियल पाठवायचं मग पुन्हा कांटा पूर्ववत करून ठेवायचा. कोणाला काही कळण्याचा मार्गच नाही. Clean job.

ते दोघही आ वासून पहात होते. त्यांच्या लक्षात सर्व प्रकार आला होता. त्यांनी अस काही असेल यांचा विचारच केला नव्हता.

मधुकर नी थॉमस आणि भानाजीला जायला सांगितलं. ते गेल्यावर मधुकर सातपूत्यांना म्हणाला.

आपल्याला चक्रवर्ती आणि बरड्यांच्या विरुद्ध केस बिल्ड अप करायची आहे. थॉमस आणि भानाजी ची साक्ष अगदी तारिखवार नोंदवून घ्या. ती उपयोगी पडेल. तुमच्या लक्षात आलच असेल की या आंगोदार जेवढ्या हिट्स रीजेक्ट झाल्या त्याच्यामागे कोणाचा हात आहे ते. आता उलगडा झाला. आणखी एक गोष्ट, कांटा एकदा प्रमाणित केल्यावर त्याला उघडता येत नाही. दुरुस्ती करायची असेल तर त्यानंतर पुन्हा प्रमाणित करून घ्यावा लागतो. बरड्यांनी ही गोष्ट आपल्यापासून लपवून ठेवली. या गोष्टीची नोंद करा. हा गुन्हा आहे. या दोघांनी अजून काय काय गुण उधळले आहेत यांचा शोध घ्या आणि ते पुरावे पण गोळा करा. या दोघांना आता पुन्हा कंपनी त एन्ट्री नाही. पण हे काम चुपचाप करा, जरूर पडल्यास वेणूगोपाल आणि फिरके साहेबांना मदतीला घ्या. पण एक लक्षात ठेवा  तुम्ही ही माहिती गोळा करता आहात यांची गंधवार्ता सुद्धा कोणाला लागता कामा नये.

सातपुते गेल्यावर माधुकरने पुन्हा सगळ्या शीट्स चाळायला सुरवात केली. आणि त्यांच्या लक्षात आलं की ब्रेक ड्रम बद्दल आपण सातपूत्यांशी काहीच बोललो

नाही. तोच मग उठून सातपूत्यांच्या केबिन मध्ये गेला.

सातपुते, आपलं  ब्रेक ड्रम बद्दल बोलायचं  राहिलं. त्यांची पण काय कहाणी आहे ते बघायला हव. चला आपण मटेरियल बघू. ते दोघंही यार्ड मध्ये जिथे मटेरियल ठेवलं होतं तिथे पोचले. संध्याकाळ होत आली होती आणि प्रकाश अंधुक झाला होता. माधुकरने मटेरियल पाहिलं आणि विचारलं की

ब्रेक ड्रम्स कुठे आहेत. ?

हे काय साहेब तुमच्या समोर रचलेले आहेत.

हे ब्रेक ड्रम्स आहेत ? हे एवढे मोठे ? कोणच्या गाडीचे आहेत ?

८०  टनर डंपर चे आहेत अस म्हणाले.

कोण म्हणालं अस ?

सुशील बाबू.

मधुकर ने एक ड्रम काढायला सांगितलं आणि वर्कशॉप मध्ये जिथे भरपूर उजेड होता तिथे ठेवायला सांगितलं. जवळून निरीक्षण केल्यावर त्याच्या लक्षात सार काही आलं. तो म्हणाला चला आपण माझ्या केबिन मध्ये जाऊन बोलू. केबिन मध्ये गेल्यावर मधुकर म्हणाला की

सातपुते, तुम्हालाही असच वाटत की हे ब्रेक ड्रम्स आहेत म्हणून ?

नाही साहेब. मला जरा संशय आला तेंव्हा मी जरा माहिती गोळा केली आणि माझ्या अंदाजा प्रमाणे हे windmill चे hub आहेत. पण या टाइप च्या windmills आपल्या देशात अजून तरी बसवत नाहीत. या प्रकारच्या mini windmills युरोप आणि लॅटिन अमेरिकेत चालतात.

म्हणजे जो आपला क्लायंट आहे त्यांची ही एक्सपोर्ट ऑर्डर आहे आणि तो आपल्याला खूपच कमी रेट देऊन मूर्ख बनवतो आहे.

होय साहेब, आहे खरं तसं.

सातपुते एवढं सगळं माहीत असून तुम्ही काहीच अॅक्शन घेतली नाही ? कंपनी चं नुकसान होऊ दिलत ?

मी काय करणार साहेब, माझा फक्त अंदाजच होता, त्या आधारा वर सुशील बाबूंशी कोण वैर घेणार ?

किरीट साहेबांना माहीत आहे ?

नाही साहेब.

बरं हे dimensional रीजेक्शनस झालेत ते ordinary scrap च्या रेट ने चालले होते अस का ? कोणाला पाठवता हे स्क्रॅप ?

या बद्दल फक्त बर्डे आणि सुशील बाबूच तुम्हाला सांगू शकतील.

एवढी secrecy ?

होय साहेब.

ठीक आहे जा तुम्ही मी बघतो काय ते. सुशील बाबू तुम्हाला फोन करण्याची शक्यता आहे पण यांची वाच्यता करू नका.

होय साहेब.

सातपुते गेल्यावर थॉमस आला.

साहेब एक सांगायचं होतं.

काय ?

साहेब, तुम्ही विक्रमसिंग ला ऑपरेशन मधून ट्रान्सफर केलत, आणि आम्हाला एक सुपरवायझर कमी पडतोय. आम्हाला weekly off पण घेता ये नाहीये. काही तरी करा साहेब.

डोन्ट वरी मला यांची कल्पना आहे. मी नवीन सुपरवायझर साठी जाहिरात दिली आहे. येत्या दोन तीन दिवसांत त्यांचे इंटरव्ह्यु होतील आणि तुम्हाला नवीन माणूस मिळेल. तो पर्यन्त जरा कळ काढा. आणि एक आज आपल्याला जे काही कळलं ते तुमच्या पर्यन्तच ठेवा. कोणांशीच अगदी ठाकूर आणि ओजाशीही बोलू नका. योग्य वेळी ते सर्वांना कळेलच. पण सध्या मौन पाळा. Promise me.

होय साहेब नाही बोलणार. I promise.

क्रमश: .....

🎭 Series Post

View all