मनाची सौंदर्यस्पर्धा

शब्द खुप महत्वाचे जपून वापरा..

लघुकथा
मनाची  सौंदर्यस्पर्धा...
      (समोरच्याच्या मनाचा विचार न करता चटकन त्यांच्या दिसण्यावर लेबल लावणाऱ्या लोकांची हि कथा..)
©स्वप्ना...
            "अग दिव्या मी काय ऐकतीये या वर्षी लागलेली बीसी जरा वेगळ्या प्रकारे खर्च करायची ठरवली आहेस तू अग मागच्या महिन्यात तर म्हणाली होतीस ना आई यंदा बीसी स्वतःवर खर्च करते म्हणून,... नेमकं काय करणार आहेस आपल्या आईला सांगशील कि नाही,..?"आईच्या प्रश्नावर हसत दिव्या म्हणाली,"आई वेगळी म्हणजे पाच वर्षात आपण बीसी लागल्यावर ती काहीतरी चांगलउदिदिष्ट ठेवूनच ती खर्च करतो हे माझ्या लक्षात आहे ग,...पहिल्या भिशीत अनाथाश्रमात घेऊन दिलेलं वॉटर प्युरीफायर,..दुसऱ्या भिशीत  भांडेवाल्या मावशींच्या गरजु सुनेला घेऊन दिलेले शिलाई मशिन,... तिसऱ्या भिशीत वृद्ध आश्रमात घेऊन दिलेल्या आरामखुर्च्या आणि या वर्षी मला गाडी घ्यायची होती पण ते राहू दे कारण जरा वेगळं म्हणजे सांगते तुला,.." आई आपण जे निराधार मुलींचे सदनचे सदस्य आहोत ना तिथे काही दिवसांपूर्वी नवीन एक मुलगी आली आहे,...तरुण आहे अगदी सुंदर,सुशिक्षित ती आजीकडे राहात होती,...आजी वारली मग शेजाऱ्यांनी इथे आणुन सोडली आहे,...जरा तोंडाळ आहे ग,...कोणालाही फटकन  नकारार्थी प्रतिक्रिया देते तशी चांगल्या घरातली दिसते पण आईवडील अपघातात गेले आणि आता आजी गेली,.. तिला ना समोरच्या माणसाच्या मनाचा विचार न करता त्याच्या तोंडावरच नावं ठेवायची सवय आहे,..बऱ्याच काळ्या मुलींना ए काळे,फोड असतील तोंडावर तर,... किती फोड ग बाई तुझ्या चेहऱ्यावर बघावं वाटत नाही तुला",.."ए जाडे"असे विशेषण समोरच्याच्या मनाचा विचार न करता देत राहते हिच्या सारख्या आणखी तीन चार जणी आहेत बघ त्यात आता ह्या सगळयांना मोठा धडा द्यायचा ठरवलं आहे मी आयुष्यभरासाठी,.."
         आईने ऐकून घेतलं,...आई म्हणाली,.." हो पण कसा शिकवणार आणि हे बीसीचे पैसे कशाला लागतील त्याला,...?"ती म्हणाली ,"आई आपण सदन मध्ये सौंदर्य स्पर्धा घेऊ सहभाग सगळयांना कम्पलसरी काळ्या गोऱ्या सगळ्या मुली ह्यांना एकसारखे सुंदर ड्रेस घेऊ,..ज्वेलरी देऊ,...माझ्या कॉलेजमैत्रिणी मिळुन त्यांना चालण्या बोलण्याचं प्रशिक्षण पण देऊ,...पण हि स्पर्धा नावाला सौंदर्य स्पर्धा असेल पण त्याला मनाचे सौंदर्य हा शब्द जोडायचा आहे,...बघ आई ह्यात दुसऱ्याला वाईट म्हणणाऱ्या मुलींना चांगली समज बसेल,..आणि ह्या स्पर्धेने मुलींमध्ये आत्मविश्वास पण वाढेल तुम्ही संस्थेच्या सदस्य नेहमी म्हणता ना ह्या मुली थोडया बुजऱ्या,भित्र्या असतात म्हणुन पण बघ यात दोन्ही फायदे आपले,...करू ना मी ह्या पैश्यांचा असा उपयोग,..?आई म्हणाली,"कल्पना तर अगदी छान पण तुला यंदा तुझी टू व्हीलर घ्यायची होती ह्या पैश्यात,... त्याच काय,..?"आई ती नंतर घेता येईल पण आता गरज आहे तुटणारी मन तोडणाऱ्या अहंकाराला नष्ट करण्याची,.. ते जर आता नाही झालं तर फार नुकसान होईल,...कारण मी परवा डान्स शिकवायला सदनात गेले होते तर ती कोमल जिच्या चेहऱ्यावर खुप पिंपल्स आहेत ती खुप रडली माझ्याकडे मला म्हणाली,..."ती मुलगी मला म्हणते ,तुला हि देवाची देण आहे सांभाळ हि घाण चेहऱ्यावर आयुष्यभर,..." कोमल खुप निराश झाली आहे ,..म्हणते "ताई स्वच्छ, चांगलं राहणं माझ्या हातात पण हे सौंदर्य ते मला स्वतःला नाही ना ठरवता येत,..."आई कोमल किती सुंदर नाचते पण त्यादिवशी तिच्यातील ते चैतन्य असं दुसऱ्याच्या दुखावण्याने हरवताना मी पाहिलं म्हणून हा प्रयोग,...आई गाडी आयुष्यात कधी घेईल ग मी पण आता जर हे थांबलं नाही तर सदनातल्या कितीतरी मुली सुंदर रूप नसुन मनाचं चांगलं सौन्दर्य हि हरवून बसतील मला करू दे हे,.."
          आईने होकार दिला,...स्पर्धेची सगळी तयारी झाली,...स्टेज सजलं, मुली सजल्या,... कुणी भेदरत,कुणी आनंदात तर काही गर्वात मिरवत होत्या,...पण खरं गर्वहरण अहंकार मिरवणाऱ्या सौंदर्याचं झालं,..जेंव्हा स्पर्धेचे जज स्टेजवर आले कारण ते दोघेही अंध होते,...छान दिसणाऱ्यांना आता हे चॅलेंज वाटू लागलं कारण बुद्धी आणि मन ह्याच गोष्टींची इथे गरज होती,...दिसणं इथे शुन्य झालं,...
माणुसकीचे,समानतेचे,सुंदर जगण्याचे सगळ्या प्रश्नांची कुरूप दिसणाऱ्या कोमलनेच जास्त छान उत्तर दिली,...स्पर्धा संपली यात विजयी कोणालाच घोषित केलं नाही,... उलट सर्व स्पर्धकांना बक्षिस दिलं,.. हातात हृदय अश्या प्रतिमांची बक्षीस प्रत्येक स्पर्धकाला  देण्यात आले,..ती मन दुखवणारी मुलगी कोमल जवळ येऊन रडत होती,....आणि दिव्या  आपली स्पर्धा योग्य हेतुने सफल झाली म्हणून मनात हसत होती,...प्रत्येकीच्या हातात असलेलं  हृदय दिव्याकडे बघुन हसत होतं....आणि दिव्याची आई आजपर्यंत सुंदर दिसत नाही म्हणुन नाकारलेल्या आपल्या मुलीच्या मनाच्यासौन्दर्यांला निरखुन बघत होती,..
©स्वप्ना मुळे (मायी)औरंगाबाद
      वाचकहो असतात ना अशी माणसं अवतीभोवती जी समोरच्याला त्याच्या रूपावर चटकन वाईट प्रतिक्रिया देतात,..खरंतर त्यामुळे समोरचा आतुन खचुन जात असेल,..तुम्हाला काय वाटतं नक्की कळवा,..फोटो गुगल साभार,शुद्धलेखन चुका माफी असावी,...धन्यवाद