मनाला समाधान बाकी काही नाही...

स्लो गाडीने पोहोचायला उशीर होईल म्हणून नंतरची जलद लोकल पकडुन पुढे जायच, पण पुढे जाऊनही तिच लोकल भेटावा. प्रवासाचा वेळ तेवढाच, फक्त मनाला समाधान जलद गाडी पकडली.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (मुंबई) वरून घरी चाललो होतो टिटवाळ्याला. दुपारची वेळ होती.

आसनगाव लोकल स्टेशनला लागली होती. पण ती स्लो होती. तिच्या मागे १० मिनीटांनी बदलापूर लोकल होती, ती जलद होती. कल्याण पर्यंत त्या गाडीचा मार्ग सारखाच असतो. 

मग विचार केला, स्लो लोकलने जाण्यापेक्षा, १० मिनीट थांबून जलद लोकलने जाउ. कल्याणला आधीची एखादी टिटवाळा लोकल तरी भेटेल. गरमीने हैराण झाले होतो. कधी घरी पोहोचतो अस झाल होत.

मग मी ती आसनगाव लोकल सोडुन दिली, १० मिनीटांनी बदलापूर लोकल लागली.
त्या बदलापूरच्या लोकलमध्ये बसलो. आता लवकर जाईल या खुशीत होतो.

कल्याणला जाउन पोहोचलो. इंडीकेटर बघीतल तर तीच आसनगाव लोकल लागली होती जी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वरून स्लो म्हणून सोडली होती.

१० मिनीट वाट पाहिल्यानंतर ती आली. मग त्याच गाडीत बसले. 

प्रवासाला वेळ तेवढाच लागला, जेवढा स्लो गाडीला लागतो, फक्त मनाला समाधान भेटल की जलद गाडीने आलो. ????