मनाचं सौन्दर्य

वरवरच्या सौन्दर्यावर न भाळता मनाचं सौन्दर्य ओळखता आलं पाहिजे

शितल ठोंबरे (हळवा कोपरा )
मनाचं सौंदर्य....

स्वप्ना आपली मोठी  बहिण  शमा पेक्षा दिसायला अधिकच उजवी होती....म्हणूनच की काय स्वप्नाला आपल्या सौंदर्याचा  गर्व वाटत होता...

आपल्या बहिणीपेक्षा आपण देखण्या आहोत..म्हणून ती आपला राग राग करते असच स्वप्नाला वाटे...त्याची 
ती आपल्या आईवडिलांकडे करी...

स्वप्ना चे आईवडील आपल्या दोन्ही मुलींना चांगल ओळखत होते...त्यामुळे स्वप्नाच्या तक्रारी कडे ते दुर्लक्ष करत...उलट स्वप्नालाच चार समजुतीच्या गोष्टी सांगत ...

पण याचा परिणाम उलटच होत होता..आपले आईवडील आपल्यावर प्रेमच करित नाहीत...त्यांचा सगळा जीव त्यांच्या मोठ्या मुलीवरच आहे माझ्यावर नाही अशी ओरड  तिने सुरु केली..

शमा आपली बहिन अजून लहान आहे..अल्लड आहे अस मानून स्वत:ची समजूत काढे...तिच्या विचित्र वागण्याकडे दुर्लक्ष करीत...त्यामुळे स्वप्नाची हिम्मत चांगलीच वाढली होती...

स्वप्ना आपल्या दिसण्याची फार काळजी घेई...तिच वार्डरोब बूक्स पेक्षा कॉस्मेटिक आणि कपड्यांनी भरलेलं होतं...अभ्यासात तर तिचं मुळीच लक्ष नसे...अभ्यास करायचा तो फक्त परिक्षेपुरता...तोही पास होण्याइतपत...

शमा मात्र अभ्यासात फार हुशार होती...अगदी पुस्तकी किडा म्हणावं इतकी..तिने स्वत: ला अभ्यासात पूर्ण झोकून दिलेलं...तिच स्वप्न होतं डॉक्टर होण्याच ...त्यादिशेने तिने अभ्यासही सुरु केलेला...

स्वप्ना फक्त नावाची स्वप्ना होती ...पण ना कसले ध्येय ना कसले स्वप्न...स्वत: च्या सौंदर्याला सगळीकडे मिरवण्यातच तिला धन्यता वाटे...

आई तिला समजावे.."स्वप्ना अगं दिसणं आयुष्यात इतकंही महत्वाच नाहिये...जितके तू बनवते आहेस..तुझ्या मोठ्या बहिणीकडे बघ...तिच्या कडे बरच काही आहे तुझ्यासाठी शिकण्यासारख...तिच्या सोबत राहशील तर तुझाच फायदा आहे."

"ए आई मला नाही ताईकडून काही शिकायचं...तिला साध कसं रहायचं...कसं बोलायचं याचा सेन्स नाही...ना कपड्यातल्ं काही कळतं...कशी राहते काकू बाई सारखी..."

"स्वप्ना अगं मोठी बहिण आहे ती तुझी...त्याची तरी जाण ठेव...ती तुझ्या बद्दल किती चांगला विचार करते आणी तू..."

"आता तू नको मला लेक्चर देऊ...कॉलेज मधे मला माझे सगळे फ्रेंडस् हसतात...तिच्या सोबत मी दिसली की...इरिटेट होते मी..."

स्वप्नाच्या आईने कपाळालाच हात लावला...आपली पोटची पोर आपल्याच सख्ख्या बहिणीचा इतका दुस्वास करतेय...

स्वत: च्या सौंदर्याची भुरळच पडली होती स्वप्नाला...

यातून तिच्या येणारया भविष्यात काही अघटित नको घडायला... स्वप्नाच्या आईने देवा समोर हात जोडले...''देवा सुखी ठेव रे माझ्या दोन्ही मुलींना...."

खरतर दोष स्वप्ना पेक्षा तिच्या कुटुंबाचाच अधिक होता...स्वप्नाच्या मनात आपल्या सौन्दर्याचा अहंकार अन शमा बद्दल दुस्वासाची भावना पेरायला कुटुंबानेच सुरुवात केली होती...

तर झालं असं...शमाचा जन्म झाला ती रंगाने थोडी सावळी होती... नाकही थोडं चपटं होतं त्यामुळे जन्मापासूनच सगळे तिला नाकावरून चिडवत असतं... त्यांनंतर स्वप्नाचा जन्म झाला...रंगाने अगदी गोरिपान...नाक तर जणू चाफेकळीच...तेव्हापासूनच स्वप्ना अन शमा ची तुलना व्हायला सुरुवात झाली...

खरतर थट्टा  मस्करी सुरु असायची...स्वप्ना कशी देखणी आहे...शमाच नाक असचं आहे तसचं आहे..शमा बिचारी गाल फुगवून कोपर्यात बसायची..त्यावेळी हे सारं गमतीत चालायचं...

पण मस्करी करता करता शमा अन स्वप्नाचं आयुष्य मात्र पार बदलून गेलं.

स्वप्नाला आपल्या सौंदर्याचा गर्व वाटू लागला ....आपल्याच बहिणीला ती कमी लेखू लागली....

स्वप्ना अन शमा एकाच कॉलेज मध्ये शिकत होत्या...पण दोघींचे फ्रेंड सर्कल पूर्ण वेगळे होते...

शमाचा मित्रपरिवार तिच्यासारखाच अभ्यासू तर स्वप्नाचा ढोंगी अन बनावटी दिखाऊ पणा करणारा...

दरवर्षी प्रमाणे याही वर्षी कॉलेज मध्ये विविध स्पर्धा होत्या...पण या स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांच लक्ष मात्र लागून होतं ते 'कॉलेज क्वीन' स्पर्धेकडे ...मागिल दोन वर्षांपासून 'कॉलेज क्वीन' चा किताब स्वप्ना मिळवत होती..

पण यावर्षी मात्र या स्पर्धेत अनेक ट्वीस्ट होते...विद्यार्थ्यांच्या वर्षभराच्या ऐक्टिविटी ,अभ्यासातिल प्रगती,आणि वर्तणूक ,त्यांच सोशल कनेक्शन या सगळ्या गोष्टी विचारात घेतल्या जाणार होत्या...

स्वप्ना तर स्पर्धेत उतरलीच होती .... यावर्षीही मीच जिंकणार हा ओवर कॉन्फीडन्स  घेऊनच...

शमाच्या मैत्रिणींना स्वप्ना मुळीच आवडत नसे...यावर्षी स्पर्धेचे नियम पाहून त्यांनी शमा ला स्पर्धेत उतरण्या साठी आग्रह केला...आपल्या मैत्रीच्या आणाभाका दिल्या...आणि शमा ची इच्छा नसतानाही तिचे नाव स्पर्धेसाठी दिले...

स्वप्नाला जेव्हा हे समजले तिला हसूच आले...'अगं ताई तुला झेपणार आहे का ही स्पर्धा उगाच आपलं नाकापेक्षा मोती जड नको व्हायला..'

'माहित आहे ग स्वप्ना मला ...पण मुळात मी जिंकण्यासाठी नाहीच उतरले या स्पर्धेत ...मी फक्त माझ्या मैत्रिणीच्या भावनांचा आदर करण्यासाठी या स्पर्धेत उतरलेय...'

'जिंकणं माझ्यासाठी फारसं महत्वाचं नाहिये..'

'मी स्पर्धेत असताना तुला जिंकताही येणार नाही...स्वप्ना कुत्सीत पणे म्हणाली...

दोघीही आपापल्या परिने स्पर्धेची तयारी करु लागल्या...आईवडील मात्र चिंता करु लागले...कारण कोणीही जिंकलं तरी एक कोणीतरी दुखावणारच होती...अन तेच त्यांना नको होतं...

स्पर्धेचा दिवस उजाडला...मुली एक एक लेवल पार करत पुढे जात होत्या...पण यावर्षी सगळ्यात उजवी ठरत होती ती म्हणजे शमा...तिची वर्षभराची मेहनत कुठे तरी कामी येत होती...

आता होती ती अंतीम फेरी आणी या अंतीम फेरीत केवळ पाच मुली उरल्या होत्या...या पाच मुलींमधून केवळ एक विजेती ठरणार होती...

अंतीम फेरी होती ती प्रश्नउत्तर फेरी ....पहिलाच प्रश्न पाचही जणीना एकत्रित पणे विचारला...तुमच्या आयुष्यात तुमच्या साठी सर्वात महत्वाचं कोण आहे?

कोणी म्हणे आई कोणी म्हणे बाबा कोणाची ताई तर कोणाचा दादा कोणाचं करिअर महत्वाचं होतं...शेवटी शमाने उत्तर दिलं ...माझं कुटुंब माझ्यासाठी सर्वात महत्वाचं आहे...कारण माझी ओळख माझ्या कुटुंबामुळे आहे...

परिक्षकांनी दुसरा प्रश्न विचारला...समजा तुम्ही भरधाव गाडीने रस्त्यात जात आहात अचानक तुमच्या समोर लहान मुलं आलं तर तुम्ही काय कराल?

शमा सोडून चौघी स्पर्धकांनी एकच उत्तर दिलं आम्ही आधी त्या मुलाचा जीव वाचवू....

पण शमाच उत्तर परिक्षकांना जास्त भावलं...मुल रस्त्यात येतं याचा अर्थ तो रस्ता रहदारिचा आहे...अश्या भागात गाडी भरधाव चालवणे हा गुन्हा आहे...दूसरं म्हणजे गाडी वेगात चालवून मी माझा व इतर कोणाचाही जीव धोक्यात घालणार नाही...

शमाचं उत्तर ऐकून प्रेक्षकांनी टाळ्यांचा कडकडाट केला...

थोड्याच वेळात निकाल लागणार होता...प्रत्येकाची उत्कंठा शिगेला पोहचली होती...कोण जिंकणार...गेल्यावर्षीची क्वीन की दुसरच कोणी हा किताब आपल्या नावावर करणार...

परिक्षकांनी विजेत्या स्पर्धकाचे नाव जाहीर केले...यावर्षीची आपली कॉलेज क्वीन आहे" शमा" ....शमाने आपल्या बुद्धीचातुर्यावर हा किताब मिळवला होता...आपल्या कडे नसलेल्या सौंदर्याने तिच काहिच बिघडवल्ं नव्हतं...उलट आज ती कॉलेजात सर्वात अधिक सुंदर दिसत होती...

टाळ्यांचा आवाज चोहिकडे घुमला...शमाच्या डोक्यावर कॉलेज क्वीन चा क्राऊन गेल्यावर्षीची क्वीन म्हणून स्वप्नाच्या हातूनच घालण्यात आला...

स्वप्नाचा नुसता जळफळाट होत होता...शमामुळे आज संपूर्ण कॉलेजात आपलं हसू झालं...अपमान झाला...तो धक्का स्वप्नाला सहन झाला नाही...

घरी आल्यावर स्वप्नाने झोपेच्या गोळ्या खाऊन आत्महत्येचा प्रयत्न केला...पण वेळीच घरच्यांच्या हे लक्षात आलं आणि तिला हॉस्पिटलात भर्ती केलं...स्वप्नाचे प्राण वाचले पण गोळ्यांची मुदत संपलेली होती 

त्यामुळे त्याचा परिणाम तिच्या चेहर्यावर झाला...चेहरा अति काळवंडला...इतका की स्वप्नाला स्वत: लाच आरशात पाहायची लाज वाटू लागली..तिचा चेहरा पुर्ववत व्हायला बराच वेळ गेला...

डॉक्टरांनी स्वप्नाला सांगितले ...हा तुझा पुनर्जन्म आहे तो ही शमा मुळे तुला मिळालाय...शमाने प्रसंगावधान राखले म्हणूनच तुझा जीव वाचला...खूप नशीबवान आहेस ...

या घटनेनंतर शमा तिच्यासोबत खंबीरपणे उभी राहिली...स्वप्नाचा आत्मविश्वास डगमगू नये यासाठी तिने कसोशीने प्रयत्न केले...तीची ढाल बनून सोबत राहिली...रात्रंदिवस तीची काळजी घेतली...

स्वप्नाला त्यांनतर कोणाला काही समजावयाची गरजच भासली नाही...आपल्या बहिणीचं प्रेम तिला दिसत होतं...त्याहीपेक्षा जास्त महत्वाच तिला आज समजलं होतं ते म्हणजे....

चेहर्याच्या सौंदर्यापेक्षा मनाचं सौंदर्य महत्वाचं असतं...

( कथा आवडल्यास नक्की लाइक करा शेअर करा पण लेखिकेच्या नावासहित)
शितल ठोंबरे...( हळवा कोपरा)