Mar 02, 2024
गोष्ट छोटी डोंगराएवढी

राही - संस्कार

Read Later
राही - संस्कार


गोष्ट छोटी डोंगराएवढी

मना घडवी संस्कार


एक छोटी राही तिच्या मैत्रीणींसोबत घराजवळच्या कडूलिंबाच्या पारा जवळ खेळत होती .खेळता - खेळता थोडे भांडण झाले . भांडणाचा आवाज ऐकून पारावर बसलेल्या काकू सहज बोलून गेल्या
" हेच शिकवल का घरच्यांनी ? काही संस्कार दिले का नाही ."

काही वेळाने भांडण संपल .राही आणि तिच्या मैत्रीणी पुन्हा खेळायला लागल्या .

" लहान मुलांच एक छान असत , भांडतातही तेव्हाच आणि लगेच खेळायलाही लागतात ."

खेळून झाल्यावर राही घरी गेली .जेवण केल नंतर अभ्यास केला .रात्री झोपताना आई राहीला गोष्ट सांगत होती तेव्हा राहीला " संस्कार " शब्द आठवला .राहीने आईला विचारले
" संस्कार म्हणजे काय असत ? कोणाकडून शिकावे लागतात ? "
आईने राहीला सांगितले
" संस्कार हे आपल्यातील उणीवा दूर करून आपल्याला चांगले घडवतात ,बनवतात ."

" संस्कार हे काहीवेळा आपोआप होत असता तर काही वेळा आपल्याला शिकावे लागतात . "

आजी आजोबा ,मोठे बाबा आई , त्यांचे दोन मुल मयूर आणि संकेत , आई बाबा ,राही आणि माही दोन बहीणी अस छान मोठ कुटुंब राहीच होते . मयूर आणि संकेत मुल असल्याने आजीचे जास्त लाडाचे होते . राही आणि माही आजोबांच्या लाडक्या होत्या .

राही आणि माही दोघीही बहीणी असल्याने राहीची आजी तिच्या आईला खूप बोलत होती . राहीने कधी अस ऐकल्यावर राही त्यावरून आईला खूप प्रश्न विचारत होती . काही प्रश्ननांचे उत्तर आईकडे होते तर काहींचे नव्हते. आई तिच्या परीने राहीला खूप समजवण्याचा प्रयत्न करत होती .

राहीच्या घराजवळ श्री स्वामी समर्थ महाराजांचा मठ होता . तिथ बालसंस्कार वर्ग घेतला जात होता . राही तिच्या मैत्रीणी सर्व बालसंस्कार वर्गाला जात होत्या . तिथ गेल्यावर खऱ्या अर्थाने " संस्कार " शब्दाचा अर्थ राहीला समजायला लागला . नकळतपणे खूप छान संस्कार राहीवर होत होते . देशभक्तांच्या गोष्टी , गाणी , संताची चरीत्र ,स्वावलंबन ,योगासन यातून खूप छान संस्कार घडत होते .

मठा मधे आरतीला गेल्यावर मोठी आई ,आई सोबत काही छोटी छोटी , शेवटची काम राही मी मी करत असे म्हणून तिला सांगत होत्या . छोट्या मोठ्या कामामधून राही स्वछता ,नीटनेटकेपणा हे संस्कार नकळत घडत होते .

घरी आजी राहीला एकतर काही करू द्यायची नाही . आणि सांगितलेल काम केलतरही मुलगी म्हणून त्यावरून बोलत होती .

मठा मधे होणारे उत्सव , पारायण , आरती त्यानंतर श्लोक ,स्तोत्र यासगळ्याने राहीवर संस्कार घडत होते .

घरातील आणि बाहेरील उलट परीस्थितीत राहीला खूप प्रश्न पडत त्यांची उत्तर कधी आई ,आजोबा तर कधी मठातले काका सांगत होते . यामुळे राहीला संस्कारांच महत्त्व समजल .

राहीच्या मनावर झालेले छान संस्कार राहीला इतरांनाही शिकवावे वाटत होते . राही मोठी झाल्यावर बालसंस्कार वर्ग घेत होती .


Veena
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//