Login

व्यक्ती

Mens

,विचार करण्याची क्षमता असलेला प्राणी,ज्याच्या हृदयात प्रेमाचे अखंड झरे वाहतात तो म्हणजे माणूस,निसर्गाची सर्वोत्तम निर्मिती म्हणजे माणूस.माणसाच्या बुद्धीची झेप एवढी की तो चंद्रावर पोहोचला,मंगळावरही आपल्या बुद्धीची छाप सोडू पाहत आहे.

       जमिनीच्या वादातुन सख्या भावानेच भावाला ठार मारले, ,एवढेच नव्हे तर सांगितलेले काम केले नाही म्हणून आताताईपणे आईने सांडशी फेकून मारली नि मुलीचा जीव गेला.बापाने पैसे दिले नाही म्हणून मुलाने बापाच्या डोक्यात काठीचा प्रहार करून त्याला जिवे मारले.अशा घटना वर्तमानपत्रात वाचल्या,समाजात पाहिल्यानंतर हृदयाचा तिळपापड झाल्याशिवाय राहत नाही. किती शीघ्रकोपीपणा,किती अमानवीपणा म्हणावा हा,की माणुसकीच्या निर्लज्जतेचा कळस म्हणावा.   ही कसली प्रगती,ही तर माणुसकीच्या वाटेवरील अधोगती.

        'मदतीचा हात देऊन माणुसकीची जात' निभावणारा माणूस आज क्वचितच दिसतो..मुलींच्या जन्माचे स्वागत आनंदाने करा.स्वतःची ओळख सांगताना जो मी प्रथम माणूस व तोही भारतीय आहे हे विसरणार नाही .माणूस म्हणून सर्वांना बरोबर घेऊन चला तरच आपणही व इतरही सुख,समाधानाची गोड फळे आनंदाने चाखू.माणसाच्या जीवनाची माणुसकी हीच खरी पुंजी.......

नमस्कार.. सौ.. सोनल गुरुनाथ शिंदे.. ( देवरुख - रत्नागिरी )