मनाची घालमेल

मनाची घालमेल सुरू झाल्यावर काय करायचं हे लिहीलं आहे.


मनाची घालमेल

* मनाचा व्यापार,मनाची रचना खूप अगम्य आहे. त्यामुळे तिच्या वेगवेगळ्या अवस्थाही कळण्यापलीकडच्या आहेत. त्यातीलच एक म्हणजे मनाची घालमेल अवस्था.

* मनाची घालमेल सुरू झाली की चित्र-विचीत्र विभ्रमांना सुरवात होते. या विभ्रमांमुळे मनाला इथे थांबू कि तिथे थांबू असं होऊन जातं.आणि क्षणाक्षणाला ते एका विचीत्र परीस्थितीत गुरफटत जातं.आत्ताच्या क्षणाला ते जगू शकत नाही. इतरांच्या सांगण्यानुसार जगायचा प्रयत्न केला तरी मध्येच कुठेतरी ते भरकटत जातं.हे असं वारंवार घडत.याचं उदाहरण बघायचं ठरवल तर आपल्याला आजूबजूला अश्या व्यक्ती सापडतील.असं दिसलं की आपण सहज म्हणून जातो,"हा काय वेंधळ्यासारखा करतोय." हे वेंधळेपण मनाच्या घालमेल अवस्थेमुळेच त्याच्या कृतीतून दिसून येतं.

* मनाची घालमेल व्हायला बरीच कारणं असतात.
१---नातेसंबंधात तणाव असेल तर,
२---एखादं नातं तुटायच्या परीस्थितीत असेल किंवा तुटलं असेल.
३---- एखाद्या व्यक्तीकडून किंवा एखाद्या परीस्थितीमध्ये अपेक्षाभंग झाला असेल.
४---- करीयरमधला तणाव.
५----करीयरमधली स्पर्धा.
६---- मनातील भावना, विचार,चिंता बोलून दाखवण्यासारखी विश्वासाची व्यक्ती न मिळणं.
अशीच आणि आणखी बरीच कारणं आहेत .ज्यामुळे मनाची घालमेल सुरू होते.

सुरवातीला आपण त्याकडे लक्ष देत नाही . पण सुरवातीलाच त्याकडे लक्ष दिलं तर ती मनाची घालमेल आहे कळतं ते कळल्यावर आपण त्यावर औषध शोधतोच. माणसाचा स्वभाव आहे हा. ही घालमेल अवस्था आपण दूर करू शकतो.ती दूर करण्यासाठी आपण आपल्या मनातलं बोललं पाहिजे. आपल्या जवळच्या,विश्वासाच्या व्यक्तीजवळ बोललं पाहिजे. पुष्कळदा फक्त बोलूनच ही घालमेल अवस्था संपते.समोरच्यानी काही बोलायचीपण गरज पडत नाही. कारण पुष्कळदा मनातलं उघड बोलून मनावरचा ताण दूर होतो आणि मनाची घालमेल थांबते.

खरतर इतका साधा सोपा उपाय आहे.पण नेहमी आपण आपला अहंकार, समाज काय म्हणेल याची भीती यामुळे गप्प राहतो आणि तिथेच चुकतो. असं करत नाही म्हणून ही घालमेल वाढत जाते. आणि एक दिवस आक्राळ विक्राळ रूप धारण करते. असं होऊ नये म्हणून मनाला कसतरी होतय असं जाणवलं की समजावं ही मनाची घालमेल सुरू झालीय . त्यावर उपाय करायला हवा.

*--- वेळेवर उपाय केला नाही तर .....मनाला समुपदेशन करून घेण्याची गरज पडते. ही गरज तुमच्या आजुबाजूच्यांनी ओळखली तर ...आणि त्यांनी तुम्हाला समुपदेशकापर्यंत नेलं तर तुमची जीवनघडी विस्कटण्यापासून वाचते.

*----मन हे बराच काळ आलेल्या ताणाचं विरेचन करत असते. निसर्गानीच त्याला ही क्षमता दिलेली आहे.पण जर मनाच्या सहनशक्तीपलीकडे ताणाचं ओझं वाढलं तर मन तरी काय करणार?त्याची कुरकूर सुरू होते. त्याकडे वेळीच लक्ष द्यायला हवं पण आपण देत नाही. वेळेवारी त्या कुरकुरीकडे लक्ष दिलं तर मनात निर्माण होऊ लागलेल्या नकारात्मक उर्जेला आपले हातपाय पसरायला वेळच मिळणार नाही.

*--- नकारात्मक उर्जेपासून मुक्त असलेलं मन गरडझेप घेऊ शकतं. स्रुजनात्मक कार्य करू शकतं. सामाजिक कार्यकर्ते बाबा आमटे,संत मंडळी,उद्योकपती यांची उदाहरणं घेता येतील.

नकारात्मक ऊर्जा मनासाठी केव्हाही घातकच असते.या मोठ्या व्यक्तींना आपलं दिवास्वप्ने पूर्ण करतांना काहीच अडथळे आले नसतील का? त्यांच्या मनावरही ताण आला असेल.पण ते सतत सकारात्मक दृष्टीनी आपल्या अडथळ्यांकडे बघतात म्हणुनच त्या अडथळ्यातूनही त्यांना मार्ग सापडतो.आणि त्या अडथळ्यांमधून त्यांना सहजपणे वेगळे अनुभव मिळतात.हे अनुभव त्यांचं व्यक्तीमत्व आणखी समृद्ध करतात.

म्हणूनच मनाला प्रत्येक येणा-या प्रसंगातून सकारात्मक क्षण वेचण्याची सवय लावा. मनाला त्यातून ऊर्जा घ्यायला शिकवा. यामुळे तुमचं कणखर होईल.कोणत्याही प्रसंगात त्याची घालमेल होणार नाही.अडथळे आले तरी तुमचं मन शांतपणे त्यावर विचार करू शकेल. येणा-या पुढील समस्या विक्राळ रूप धारण करण्यात आत सुटतील.

मन जेवढ शांत,कणखर आणि सकारात्मक दृष्टी ठेवणारं असेल तेवढं माणसाचं आयुष्य सरळ सोपं होतं. समस्या येणारच नाही असं नाही पण आलेल्या समस्या सहजपणे कश्या सोडवायच्या यांचा मार्ग मनाला मिळालेला असेल.
म्हणून मनाला जपा.शरीरातील इतर अवयवांप्रमाणे मन दाखवू शकत नाही पण ते असतं.म्हणून त्याची स्थिती वेळेवर ओळखा आणि त्याला स्वस्थं ठेवा.

\" कसा चांगली शेती मनाची,
खते घाला हो कष्टाची.
बीजं घ्या सकारात्मकतेची,
बाग फुलवा जीवनाची.
सोडा सगळी जुनी जळमटं,
नवी स्वतंत्र वाट धरा.
हाच आहे हो मंत्र खरा,
मनास तुमच्या फुलवणारा.\"
------------------–------------------------------------------------
### मीनाक्षी वैद्य.