मन झाले विरागी.(भाग २)

किती दिवस अशा गोष्टी लपवणार? एक दिवस तिने अविनाश जवळ विषय काढला" मला नीरज ची सोबत हवी आहे .तुमचा माझा स्वभाव वेगळा आहे मी नाही ऍडजेस्ट करू शकत". अविनाश खरेतर हादरले," तू त्याच्याबरोबर खरंच सुखी होशील? आहे तुला गॅरेंटी"? पण मग पुढे स्वतः म्हणाले "माझ्या सोबत तरी तू कुठे खुश आहेस तरीपण परत विचार कर घाईघाईत निर्णय घेऊ नको."---------------------------------------
*.मन झाले विरागी * ( भाग दोन)
नीरजप्रथम भेटले तेऑफिसमध्ये, तिच्याच सेक्शन चे हेड म्हणून.
नेमके त्याच दिवशी नयना ला यायला उशीर झाला .घाबरतच ती केबिनमध्ये गेली. हे येणारे बॉस जरा strict आहेत असे कानावर होते.
"काय मॅडम किती उशीर? आणि स्टेटमेंट ची फाईल कुठे?"
सॉरी सर ,म्हणत तिने फाईल समोर ठेवली. Boss खूपच Youngआणि Smart आहे हे तिच्या लक्षात आले.
"हं--काम परफेक्ट आहे" म्हणत, हसत त्यांनी वर पाहिले, नयना ने ही स्माईल केले ,मनाचा ताण गेला.
लेडीज स्टाफ मध्ये आताशा बॉस , हा चर्चेचा विषय असे, ते मॅरीड की अन मॅरीड, त्यांचे वय, ते किती हँडसम,बरीच वर्ष विदेशात होते, वगैरे वगैरे. त्याच सुमारास सरां साठी वेलकम पार्टीही झाली. नेहमीप्रमाणे नयना चे गाणे झाले. त्याची सर्वांनी विशेषतः सर नीरज प्रधान यांनी तारीफ केली. त्यामुळे नयना खूपच भारावली होती त्याच मूडमध्ये तीगुणगुणतच घरी आली.

घरी नेहमीप्रमाणे अविनाश कॉलेजमधून येऊन स्टडी मध्ये बसले होते .आणि लेक संपदा आपल्या मैत्रिणीकडे, घरातले असे वातावरण पाहून नयनाचा मूड ऑफ झाला. किती उत्साहात ती घरी आली पण तिचं कौतुक ऐकायला घरी कोणालाच वेळ नव्हता.
या प्रसंगानंतर तिचे मन तुलना करू लागले, नीरज प्रधान किती उत्साही वाटत .अविनाश मात्र नेहमी पुस्तक लायब्ररी यातच गढलेले असायचे, मग तिची चिडचिड व्हायची.
मागे बरेच वेळा आईजवळ ती बोलली, पण आईचे नेहमीप्रमाणे अविनाशचेच कौतुक ",तुझी किती काळजी घेतात असा नवरा मिळाला भाग्य लागतं वगैरे". तिला नेमके काय हवे हे समजून घ्यायला कोणीच तयार नव्हते .

तिला हवा होता तिच्यासोबत कधीतरी रोमॅण्टिक डिनरला जाणारा, कधीतरी बागेत बसून गप्पा मारणारा, तिच्यासोबत फिरणारा उत्साही साथीदार .यावरून तिचे अविनाश शी बऱ्याच दा वाद होत. तिला गाण्याची आवड होती तेव्हा तिच्या कलासक्त मनाची घुसमट होत असे. मग कधीतरी अविनाश तिच्यासोबत जात ही, पण मग त्यात तिला अपेक्षित असे थ्रिल नसे त्यामुळे मग इतके करूनही ती उदासच असे
.तिला खुश करायचा अविनाश प्रयत्न करीत. तिला सकाळी चहा करून देत.
वेळ मिळत नाही पाहून घर आवरून ठेवत .त्यांचे हे प्रयत्न पाहून तिला ओशाळल्या गत व्हायचे .मग मग तिने अपेक्षा करणे सोडले रुटीन जीवन आपल्या गतीने चाललेच होते.
त्याच दिवसात ऑफिसमधल्या सोहनींच्या मुलाच्या लग्नाचे रिसेप्शन होते. ऑफिसचा सगळा स्टाफ होता, लेडीज स्टाफ मध्ये नीरजप्रधान सर डिव्होर्सी आहेत व एकटेच आहेत अशी खुसुर पुसुर चालली होती.
काही कुवाऱ्या कन्या त्यांच्या मागे पुढे करत होत्या.
पार्टी संपून घरी येताना प्रधान सरांनी नयनाला" तुम्हाला घरी सोडू कां" असे विचारले. मीनल आली नव्हती तेव्हा मग, हो नाही करता करता नयना तयार झाली.
नीरज चे सफाईदार गाडी चालवणे, त्यांच्या सूट ला येणार धूंद सुगंध सारे काही खूपचExciting होते.
पुढचे दोन-तीन दिवस नयना नणंदेकडे लग्न होते म्हणून रजेवर होती. रजा संपवून ऑफिसमध्ये येताच मीनल ने" सर तुझी विचारपूस करत होते "म्हणत चिमटा काढला. मनातल्या मनात नयना खूप सुखावली.
हळूहळू नयनाच्या वागण्यात बदल होत होते, आताशा अविनाश सोबत ती Bed-Share करताना काही ना काही कारण सांगून त्यांना टाळत असे, तिच्यात होणारे बदल हळूहळू अविनाश च्या लक्षात येत होते. पण असे काही असेल याची त्यांना कुठे कल्पना होती.

ऑफिसमध्येही टी -टाईमला बरेच वेळा ती व नीरज बरोबर असत. तिच्या सहकर्मीच्यां हे लक्षात येत होते. मीनल ने तर, ,,"हे सीकेपी लोक गोड बोलण्यात एक्सपर्ट असतात," असा इशाराही दिला पण--, नयना तर वेगळ्या दुनियेत वावरत होती.

एक दिवस एका गाण्याच्या प्रोग्राम ची दोन तिकीट घेऊन नीरजने तिला चलतेस का असे विचारले तिला गाण्यात खूप इंटरेस्ट होता त्यामुळे ती सहज तयार झाली.
त्या दोघांना तिथे बरोबर पाहणाऱ्या मध्ये तिची दूरची नणंद ही होती. तिने घरी येऊन अविनाश समोरच विचारले नयनाची मुश्किल झाली.
हळूहळू अविनाश लक्षात येत होते. ऑफिसला जाताना नयनाचे छान तयार होणे त्यांच्याकडे दुर्लक्ष करणे .
ऑफिसमध्ये तर स्टाफ मध्ये ती नसताना त्यांच्या रिलेशन बाबत बरेच बोलले जात असत.
एक दिवस नीरज ने सरळ-सरळ तिचा हात हातात घेत तिला विचारले आर यु इंटरेस्टेड?

किती दिवस अशा गोष्टी लपवणार?
एक दिवस तिने अविनाश जवळ विषय काढला" मला नीरज ची सोबत हवी आहे .तुमचा माझा स्वभाव वेगळा आहे मी नाही ऍडजेस्ट करू शकत".
अविनाश खरेतर हादरले," तू त्याच्याबरोबर खरंच सुखी होशील? आहे तुला गॅरेंटी"? पण मग पुढे स्वतः म्हणाले माझ्या सोबत तरी तू कुठे खुश आहेस तरीपण परत विचार कर घाईघाईत निर्णय घेऊ नको.

पण नयनाला घाई होती. नीरज सारख्या साथीदाराचे स्वप्न दिला साद घालत होते
".प्रेमात मन कुठे विचार करते" नयनाच्या इच्छेपुढे अविनाश ने माघार घेतली. डिव्होर्स लगेच मिळाला, सगळे बंध तोडून ती मिसेज प्रधान झाली.
क्रमशः
---------------------------------------

🎭 Series Post

View all