मन झाले विरागी भाग (पांच)

रोज सकाळी पाच ते सात गाण्याचा रियाज गुरुजींसमोर.खूप वर्षांनी तानपुरा घेऊन वरचा सांs लावताना एक अनामिक आनंद वाटत होता सुरुवातीला न जमणारा सांs हळूहळू जमू लागला एक एक राग, त्यांचे स्वर माधुर्य, त्या कोमल स्वरांनी मन व हृदयाच्या ठोक्यात होणारे बदल हे ती स्वतः अनुभवू लागली.प्रत्येक रागाची वेळ व त्यांच्या स्वरातील उतार-चढाव यांनी शरीराच्या प्रत्येक अवयवांवर होणारे परिणाम, असे अनेक नवे पैलू समोर येऊ लागले.आईच्या आग्रहाखातर लहानपणी शिकलेले संगीत आज नव्या रूपाने नयना अनुभवत होती.रोजच्या नियमित रियाज़ा ने नयनाचा आवाज ही स्पष्ट - साफ होत गेला. नयनाला जगण्याची नवी दिशा मिळाली.
# मन झाले विरागीभाग-पांच(अंतिम)

सुखाच्या शोधात अनेक प्रयत्न करूनही नयनाला सुख भेटेल कां,? सुखाचा असा ठरलेला कोणताच मार्ग नसतो. आयुष्यात ते सुख कुठल्या मार्गाने येईल हे समजणे कठीण.
नयना ने नवा मार्ग शोधला त्यात तरी तिला सुख व मनशांती लाभावी अशी आशा करून कथेचा शेवट ,किंवा नयना च्या आयुष्याची नवी वाटचाल सुरु करते.

??धन्यवाद??
# *मन झाले विरागी*. भाग पांच (अंतिम)

मालेगांवचे हे विपश्यना केंद्र, शहराबाहेर असलेल. मोठ्ठा शांत आवार, , बाग बगीचा,बागेत अनेक पक्षी, एकूणच मन प्रसन्न होईल असे वातावरण.

जवळजवळ तीस ते पस्तीस मेंबर या दहा दिवसाच्या विपश्यने साठी केंद्रात आलेले होते.
पहिले तीन दिवस \"आनापाना\" करून चित्ताची एकाग्रता साधून मनातील विकार दूर कसे करावे याचे प्रशिक्षण दिले गेले. या दहा दिवसात मौन पाळावे लागते
.
सायंकाळी सात ते नऊ गुरुजींचे व्हिडिओद्वारे प्रवचन असे, गुरुजी संवाद साधून या साधनेचे मूळ काय याचे विश्लेषण करत. त्यामुळे प्रत्येक दिवसाचे प्रवचन हा एक प्रसादच होता.
गुरूजी सांगत"मन आणि शरीर याचा निकटचा संबंध असल्याने, शरीरात होणाऱ्या बदलाचे कारण चित्ता मध्ये आहे ,तेव्हा हे मूळ दूर केल्याशिवाय मनाची अस्वस्थता दूर होऊन शकत नाही."
मन आंतरीक दृष्ट्या पूर्ण शुद्ध झाले म्हणजे दुःखाने कोलमडत नाही व सुखाने वाहवत नाही"
हे दहा दिवसांचे शिबिर व, ही विपश्यना ची साधना करता करता नयनात खूप बदल होत गेले. आतून" फिलगुड" वाटू लागले.

दहा दिवसाचे मौन पाळूनही थकवा जाणवत नव्हता. पुढचे दोन-तीन दिवस नयना तिथेच राहिली.
इतर साधकांशी परिचय झाला त्यातच डॉक्टर रोहिणी ताईंशी विशेष ओळख झाली.
ताई "तुम्हि gynecologist मग इथे का?" तेव्हा ताई म्हणाल्या "डॉक्टर ही शेवटी मनुष्यच नाही का? डिलिव्हरीच्या केसेस हाताळताना त्यांनाही ताण-तणाव असतातच ,बऱ्याच दा तुमच्यापेक्षा जास्तच", म्हणून मी दरवर्षी दहा दिवस येते रिफ्रेश होते खूप छान वाटते
कामाचा परत उत्साह येतो आपले स्ट्रॉंग व वीक पॉईंट ही लक्षात येतात.
"तूही तुझे स्ट्रॉंग पॉईंट लक्षात घे. तुझा आवाज अत्यंत मधुर आहे तुझ्याजवळ संगीताची डिग्री आहे तुझी ताकद तू ओळख आणि त्या दिशेने प्रयत्न कर."
एक संस्था आहे तिथे म्युझिक थेरपी चे ट्रेनिंग सेंटर आहे तिथे तू डिप्लोमा किंवा सर्टिफिकेशन कोर्स करू शकते यांनी तुला जगण्याची नवीन दिशा मिळेल.
नयनाला रोहिणी ताईंच्या रूपात एक मार्गदर्शक भेटला.

या मधल्या काळात मीनल शी तिचा काहीच कॉन्टॅक्ट नव्हता तिला कळवून सुट्टी ,विदाऊटपे ची एप्लीकेशन पाठवली. व म्युझिक थेरपी ऍकॅडमी दिल्ली च्या ट्रेनिंग सेंटरला फोन करून ऍडमिशन घेतली...

दिल्लीचे म्युझिक थेरपी सेंटर, एक आणखीनच नवा अनुभव ,नवीन आयुष्य .

रोज सकाळी पाच ते सात गाण्याचा रियाज गुरुजींसमोर.
खूप वर्षांनी तानपुरा घेऊन वरचा सांs लावताना एक अनामिक आनंद वाटत होता सुरुवातीला न जमणारा सांs हळूहळू जमू लागला एक एक राग, त्यांचे स्वर माधुर्य, त्या कोमल स्वरांनी मन व हृदयाच्या ठोक्यात होणारे बदल हे ती स्वतः अनुभवू लागली.
प्रत्येक रागाची वेळ व त्यांच्या स्वरातील उतार-चढाव यांनी शरीराच्या प्रत्येक अवयवांवर होणारे परिणाम, असे अनेक नवे पैलू समोर येऊ लागले.
आईच्या आग्रहाखातर लहानपणी शिकलेले संगीत आज नव्या रूपाने नयना अनुभवत होती.
रोजच्या नियमित रियाज़ा ने नयनाचा आवाज ही स्पष्ट - साफ होत गेला. नयनाला जगण्याची नवी दिशा मिळाली.
या सहा महिन्याच्या कोर्सनंतर नयनाने रोहिणी ताईंच्या सल्ल्यानुसार म्युझिक थेरपिस्ट म्हणून एका मनोरोग हॉस्पिटल ला एप्लाय केला, रोहिणी ताईंनी राहण्याचीही व्यवस्था केली.
चार दिवस पुण्या ला जाऊन‌ नयना परत दिल्लीला आली.

मीनल ला तिने नोकरीचा राजीनामा आधीच पाठवला होता .
मागचे सर्व सोडून त्यातून बाहेर पडून नव्या आयुष्याची सुरुवात करायसाठी हा नवा मार्ग.

मनाचे स्वास्थ्य मिळवण्यासाठी नयनाला नव्या दिशेने वाटचाल करायची होती.
"संगीताशी सूर जुळवून जनसेवा करायची, संसारातले सगळे- सगळे राग, अनुराग विसरून आता नयना चे मन" विरागी" झाले होते.


संपूर्ण ?.( शुभं भवतू)🎭 Series Post

View all