मन झाले विरागी ( भाग चार)

पक्ष्यांचा मधुर कलरव हलके हलके कानावर येत होता, कुणीतरी भूपाळीचे मधुर स्वर छेडतआहे. निनू---ऊठ रियाज करायची वेळ झाली .आईची हाक व हलकासा स्पर्श जाणवला नी नयनाने डोळे उघडले. आजूबाजूला कोणीच नव्हते औषधाच्या गुंगीत झालेले भास होते. डोळ्यांच्या कडा भरून आल्या .तिची चाहूल लागताच नर्सने पुढे येऊन तिचे बी.पी. तपासले व हसून गुड मोर्निंग केल
मन झाले विरागी(भाग चार)

नयनाला सकाळी नेहमीप्रमाणे जाग आली. आज तब्येत थोडी बरी वाटत होती. हिम्मत करून तिने स्वतः उठून चहा केला, व बाकीचे आवरले.

. आज ऑफिसला जायला हवे कामात दुर्लक्ष करुन चालणार नाही. बॉस सुट्टी संपून परत येण्याच्या आधी पेंडिंग कामे हातावेगळी केलेली बरी.
पुढचे काही दिवस मग नयनाने स्वतःला कामात झोकून दिले, घरी आले की खूप थकलेली असायची
. मीनल एक दिवस बोलली ही, " अगं आत्ता कुठे तब्येत सुधारते आहे इतके स्ट्रैस बरे नव्हे", पण जुन्या आठवणीतून बाहेर पडायला हा एकच मार्ग तिला दिसत होता.
ऑफिस मध्ये पोहोचते तो मीनल वाटच पाहत होती.नैना ,काल तू येशील असे वाटले होते,
"अग पण काय झाले ते तर कळू दे."
"म्हणजे तुला काहीच माहित नाही अगं संपदा, तुझी लेक, तिचा साखरपुडा होता काल .तुझा तिच्याशी काहीच कॉन्टॅक्ट नाही का"?

नयनाला आतून भरून आले. तिच्या मुलीने अजूनही माफ केले नाही, स्वतःचे सुख शोधताना बरेच काही हरवून बसल्याचे जाणवले. डोळ्यांचे डोह भरून येतात असे वाटताच ती वॉशरूम कडे गेली, उगाचच स्टाफ मध्ये चर्चेला विषय नको.

लंच मध्ये प्यून ने इन्व्हिटेशन कार्ड देत बातमी दिली," उद्या रविवारी, बॉस पार्टी देतात आहे नातू झाल्याची."
नयनाला आताशा पार्टीत जाणे नको वाटत असे ,ती नाही म्हणेल हे ठाऊक होते .
मीनल ने तिला, "मी तुला पिकअप करायला येईन, शार्प बाराला तयार रहा काही कारण सांगू नको" असे म्हणून पार्टीत नेलेच.
पार्टी खूपच भारी होती आर्केस्ट्रा, गाणी, ड्रिंक, जल्लोष, नीरज बरोबर अशा पार्टीज ना ती नेहमी जात असे तेव्हा त्या छान वाटायच्या पण आता सगळाच चार्म गेला.

सक्सेना साहेबांना गाण्याची खुपच आवड ,त्यांनी नेहमीप्रमाणे नयनाला \"आपकी सुरीली आवाज मे, कोई गझल सुनाइये ना\" म्हणून आग्रह केला.

नयनाला नीरज ची राहून राहून आठवण येत होती मन ही उदास होते तेव्हा, तिच्या ओठी,
"किसी नजर को तेरा इंतजार आज भी है" ही गज़ल होती. गाता गाता ती भावनाकुल होत गेली, इतके दिवस मनात लपवलेले दुःख गाण्याच्या रूपात व्यक्त होत होते. अंतरा सुरु होता- होता तिचे अवघे शरीर कापायला लागले. डोळ्यासमोर गडद अंधार पसरला नि ती खाली पडली....

पक्ष्यांचा मधुर कलरव हलके हलके कानावर येत होता, कुणीतरी भूपाळीचे मधुर स्वर छेडतआहे.
निनू---ऊठ रियाज करायची वेळ झाली .आईची हाक व हलकासा स्पर्श जाणवला नी नयनाने डोळे उघडले.
आजूबाजूला कोणीच नव्हते औषधाच्या गुंगीत झालेले भास होते. डोळ्यांच्या कडा भरून आल्या .तिची चाहूल लागताच नर्सने पुढे येऊन तिचे बी.पी. तपासले व हसून गुड मोर्निंग केले.

आठ च्या सुमारास मिनल ने तिला हाक मारली. मीनलला पाहतात नयनाने प्रश्नांचा भडिमार केला. तिला जवळ घेत शांत करत मीनल ने तिला तब्येतीविषयी सांगितले. माइल्ड हार्ट अटॅक आला होता,पार्टीत ती बेशुद्धपडली ते चार दिवसांनी शुद्धीवर आली.
कालपर्यंत मीनल सतत दवाखान्यात ये,जा करत होती. आज आय .सी. यु मधून स्पेशल रूम मध्ये नयना शिफ्ट झाली.
मीनल कडूनच तिला अविनाश व आई येऊन गेल्याचे समजले, प-ण नीरज-- कोण जाणे मन अजूनही त्याच्यातच गुंतले आहे पण, त्याला कुठे पर्वा आहे? नयना चे डोळे परत भरून आले, हृदयाचे ठोके वाढायला लागले.

नयनाची मेडिकल लिव्ह एप्लीकेशन साईन करून मीनल गेली. अजून वीस दिवस तरी दवाखान्यातून सुट्टी नाही. डॉक्टर दोन्ही वेळेस येत असत.
एक दिवस त्यांच्यासोबत एक मनोरोगतज्ञ डॉ. होत्या . नयनाला तपासल्यावर त्यांनी तिला "तू काही दिवस विश्रांती व तब्येत सुधारण्यासाठी मालेगावच्या विपश्यना केंद्रात रहा .तिथे तुला बरे वाटेल असा सल्ला दिला.

. मीनल ने पण वातावरण बदल झाला की मन शांत होईल असा सल्ला दिला. तुझे तिथे जाणे मी नक्की करते अशी आशाही दाखवली तेव्हा मग नयना ने ही मनावर घेतले.-
--------++++-----+++++++-----
क्रमशः

🎭 Series Post

View all