मन झाले विरागी

.पुढचे चार दिवस कामाचे प्रेशर वाढले, सुर्वे मॅडमनी सुट्टी आणखी वाढवली. घरी येताना बस मध्ये मीनल शी बोलताना जीव घाबरायला लागला, चक्कर आल्यासारखे वाटत होते," नयना तू चल बरं आजच डॉक्टर कडे" मीनल ने तिला डॉक्टर कडे नेले. वाटत होते त्यापेक्षाही बी.पी वाढलेले होते.पूर्ण आराम नियमित औषधे अशा सूचनांचा मारा घेत नयना घरी आली. मीनल ने आज तिच्यासोबत थांबायचा निर्णय घेतला. पुढचे दोन दिवस ती औषधांच्या गुंगीतच होती मीनल ने नयना च्या आईला ही कळवले पण येणार नाही माहीतच होते. -----------------------------------------
* मन झाले विरागी दीर्घ कथा भाग 1

शिवाजी पार्क,--बस कंडक्टर चा आवाज येताच ,बसमधले इतर प्रवासी पटापट उतरले. पण. नयना पर्स तोंडासमोर धरुन बसून राहिली. स्टॉप वर तिने अविनाश ला दुरूनच पाहिले होते, हा? आज इथे बस साठी?
तेवढ्यात बस सुरू झाली आणि तिने सुटकेचा निश्वास सोडला, व पुढच्या स्टॉप चे तिकीट घेतले.

अविनाश -- तिचा पहिला नवरा, त्यांचा सामना करण्याची तिची हिंमत होत नव्हती .आपला पराभव झाला झाला, हे त्याच्या नजरेतून पाहणे तिला लज्जास्पद वाटत होते.
पुढच्या स्टॉप वर उतरून तिने टॅक्सी केली व ऑफिस गाठले.
संध्याकाळी ऑफिस सुटल्यावर इतर सहकर्मी घाईघाईने निघाल्या.
काय " नयना ओव्हर टाइम की काय"? तिची खास मैत्रिण मीनल ने विचारले.
"आता कुणाबरोबर?" एकीने हसत टोमणा मारला तो जिव्हारी लागला, तरीही वरकरणी न दाखवता नयना टेबल आवरू लागली.
घरी आल्यावर कॉफी व बिस्कीट घेऊन टीव्हीवरचे चैनल बदलून बदलून मन रमवायचा बराच प्रयत्न केला.

रात्री झोप लवकर येत नव्हती, सकाळी स्टॉप वर अविनाश ना पहिले, तसेच दिसत होते वरून शांत, मनातले न दिसू देणारे.
कां आपले धैर्य नव्हते त्यांचा सामना करण्याचे,?? मग तेव्हा कुठून आली होती हिम्मत एवढा मोठा निर्णय घेताना?
अविनाश तिला परत परत हेच समजावत होते, \"विचार कर अजून थोडा.\"
पण-- तिला घाई झाली होती. फार दिवस दोलायमान मनस्थितीचा नयनाला त्रास होत होता, नयना ची आई, भाऊ सर्वच तिच्यावर नाराज होते. एवढेच काय तिची मुलगी संपदा, या सगळ्या पायी तिच्याशी बोलेनासी झाली.
नयना चा निर्णय झाला होता वयाच्या चाळिशीला तिने अविनाश ला डिवोर्स देऊन दुसरे लग्न केले.
स्वतःचा जॉब असल्याने आर्थिक अडचण नव्हती, पण-- जर नोकरी नसतीतर?--तर नीरजही भेटले नसतेच आणि ही पुढची फरफट---विचार करता करता डोळे जड व्हायला लागले.

सकाळी जाग खूप उशिरा आली, उठायचीच इच्छा नव्हती. तरीही बाथरूम कडे वळली. डोके गरगरते आहे असे वाटत होते, आताशा मधून मधून असे का होते? चहा प्यावा का? पण देणार कोण? पूर्वी सकाळचा चहा अवि करत, ती चहा समोर आला की उठायची.
काल ते दिसल्याने जुन्या आठवणी जाग्या होत होत्या. त्यातून बाहेर पडायला हवे, हिम्मत करून तिने आवरायला सुरुवात केली.

आज सुर्वे मॅडम सुट्टीवर आहे त्यांचेही काम काम पाहावे लागणार तेव्हा यायला उशीर होणार. दोन पोळ्या जास्तच करून ठेवाव्या आल्यानंतर त्राण राहील का नाही कोणास ठाऊक?
.
पुढचे चार दिवस कामाचे प्रेशर वाढले, सुर्वे मॅडमनी सुट्टी आणखी वाढवली. घरी येताना बस मध्ये मीनल शी बोलताना जीव घाबरायला लागला, चक्कर आल्यासारखे वाटत होते," नयना तू चल बरं आजच डॉक्टर कडे" मीनल ने तिला डॉक्टर कडे नेले. वाटत होते त्यापेक्षाही बी.पी वाढलेले होते.
पूर्ण आराम नियमित औषधे अशा सूचनांचा मारा घेत नयना घरी आली. मीनल ने आज तिच्यासोबत थांबायचा निर्णय घेतला. पुढचे दोन दिवस ती औषधांच्या गुंगीतच होती मीनल ने नयना च्या आईला ही कळवले पण येणार नाही माहीतच होते. नयनाची
तब्येत थोडी स्थिरावल्यावर मिनल घरी गेली.

हे काय बरे झाले ? --किती स्वप्न पाहिली आणि काय मिळाले? झोपेच्या गोळ्यांची डोळ्यावर गुंगी असायची पण मनात विचार चक्र उलट्या दिशेने फिरत होते.
क्रमशः
-----------------------------------------
लेखन.. प्रतिभा परांजपे

🎭 Series Post

View all