Jan 23, 2022
वैचारिक

मन माझे भटकंती करीत आहे

Read Later
मन माझे भटकंती करीत आहे

       असंख्य विचारांच्या गर्दीत मन माझे भटकंती करत आहे. ना वेळेचं बंधन आहे , ना कोणती सीमा. कधी भुतकाळात रमतं तर कधी भविष्याची स्वप्न सुद्धा रंगवतं. 

        मधेच आपल्या- परक्यांच्या आठवणींना उजाळा देते. हलकेच स्वतःला नव्याने ओळखायला पण शिकवते.

         आठवांच्या हिंदोळ्यावर स्वच्छंद झुलताना मन नकळत कित्येक ठिकाणी पाखरासारखं भिरभिरत असते. 

 

        एखाद्या फिरस्त्याने जगभर प्रवास करावा तसं हे मन साऱ्या कानाकोपऱ्याची सैर करून येतं. त्या फिरस्त्याला तरी विश्रांती घ्यावी वाटते, पण या मनाला मात्र क्षणभरही उसंत नाही. 

याच्या अनोख्या प्रवासात किती अनुभव अन् आठवणींची शिदोरी देतो बरं हा. ! 

          आज इथे तर उद्या तिथे अशा या चंचल मनाला जेव्हा वेळेनुसार कठोर व्हावे लागते, तेव्हा तेही अगदी उत्तमरीत्या करतेच की . याचा ठाव घेणे हे महाप्राय कठीण.!!! 

            सुख दुःख, चांगले वाईट, आणि इतर कित्येक प्रकारचे विचार दडलेले असतात याच्याकडे. कधीतरी या मनाचीच सैर करून आनंद लुटावा. कदाचित भावनांचं काहूर आपोआप शमेल. 

-©® कामिनी खाने

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now