Oct 21, 2020
Poem

मन खूप लाजायचं

Read Later
मन खूप लाजायचं

मन खूप लाजायचं 

अशा गोष्टींना 

कुणाचं प्रेम जुळलेलं 

या डोळ्यांनी पाहताना 

खूप लाजून झाल कि 

डोळ्यांनी घट्ट मिटायचं 

मग आठवन्नीच्या हिंदोळ्यावर 

विचारांनी बसून झुलायचं 

आठणींच्या पारंब्यांनी मग 

जमिनीत जाऊन घट्ट रुतायच 

फांद्यांवरच्या कोवळ्या पानांवर 

मृगजळाने रिमझिम बारसायचं 

माझही प्रेम खरं असं असावं 

ह्या विचारांनी पुन्हा आठवणीत जावं 

आठणींना उगाळायला हे मन 

पुन्हा त्या आठवणीत विलीन व्हावं... 

 

​​​​