मन हे तुझ्यात गुंतले !
Episode 06
लेखक – पूर्णानंद प्रमोद मेहेंदळे
SWA membership no. 51440
Contact no. 7507734527
( कथेचे सर्व हक्क लेखकाकडे आहेत. )
संकेत कॉफी पित असताना त्याला गौरवचा मेसेज आला, “hi , मला अडकवण्यात आलंय.. मी काहीच केलं नाहीये..” संकेत गौरवला reply करणार तोच समोरून गौरवचा कॉल आला. ह्याचा फोन रिसिव्ह करायचा कि नाही हयाचा विचार करत संकेतने 2 मिनिटं घालवली. शेवटी त्याने न राहवून फोन उचलला.
“ संकेत प्लीज माझं ऐक.. मला फसवलंय यार त्या पल्लवीने!” - गौरव ऑफिसच्या गेटबाहेर उभा राहून संकेतशी बोलू लागला.
“गौरव,प्लीज.. मला काहीही ऐकायचं नाहीये.. जे काही ऐकायचं.. पाहायचं होतं ते सगळं ऐकून आणि पाहून झालंय माझं.. तू असा नीच असशील वाटलं नव्हतं रे.. तुझे खायचे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत. पल्लवीच्या प्रेमाचा फायदा घेतलास आणि त्यात कंपनीत राहून असे प्रकार.. स्वत: सेफ राहण्यासाठी मला अडकवायला निघालास तू ? अजून किती नीच असशील ते तुझं तुलाच माहीत !”
“ अरे, काय बोलतोय्स संकेत ? इतक्या वर्षांची मैत्री आहे आपली. तुला खरंच असं वाटतं कि मी असा असेन? आणि मी पल्लवीचा फायदा नाही घेतलाय तिने माझा फायदा घेतलाय..”
“इनफ.. बस झालं. खूप ऐकून घेतलं.. तू हे करू शकतोस असं माझ्या मनाला जरी वाटत नसलं तरी जे काही पुरावे आहेत ते सगळे तुझ्या विरुद्ध आहेत. जे डोळ्यांना दिसतं त्यावर विश्वास ठेवू शकतो मी.. मग ते मनाला पटो अथवा न पटो.. तू जर निर्दोष असशील तर तू पुरावे आण माझ्यासमोर.. ठेवेन मी विश्वास..”
“ मी खराच आहे संकेत. मला ह्यात त्या पल्लवीने अडकवलंय.. हे एवढंच मी आत्ता सांगेन.. आणि पुरावे लवकरच गोळा करून तुझ्यासमोर उभा राहीन.” हे एवढं बोलून गौरवने कॉल कट केला. संकेत खूप वेळ
विचारात पड.ला बराच वेळ उलटला होता, राधाला संकेत work space मध्ये दिसला नसल्याने ती त्याला शोधत कॅफेट एरिया मध्ये आली. संकेत एका टेबलवर डोक्याला हात लावून बसला होता. राधा त्याच्यापाशी येऊन बसली. संकेतने तिच्याकडे पाहिलं, पण काही बोलला नाही. राधा मात्र समजूतदारपणे त्याचं लक्ष वेधून घेत होती. तिला कळून चुकलं होतं की संकेत केवळ चुकून अडचणीत आलेला नाही, तर त्याचा आत्मसन्मानही खोलवर दुखावलेला आहे.संकेत स्वतःला सावरत होता, पण त्याचं मन मात्र वारंवार अशांत होत होतं.तो निर्दोष होता. पण त्याचा आत्मविश्वास हादरलेला होता.” मी काहीच चूक केलं नाही. पण जे काही घडलं… त्यात माझं नाव आलं. चोरीचा आरोप! माझ्यावर! आणि सर्वांच्या नजरा…सोड, नोकरी सोडून द्यावी असं वाटतंय पण कर्जाचा डोंगर एवढा आहे कि नोकरी पण नाही सोडता येत.” तो अस्वस्थ होत बोलताना राधा त्याला मध्येच अडवते.
"संकेत… तुम टूटे नहीं हो, बस थक गए हो। और थकावट की सबसे अच्छी दवा होती है… किसी अपने की समझदारी और साथ। तुम अकेले नहीं हो। सच की लड़ाई लंबी होती है, लेकिन अंत में वही जीतता है।" संकेत तिच्याकडे बघतो. पहिल्यांदाच कुणीतरी त्याच्या खोल दुःखात डोकावलं होतं.
“ thanks.. ह्या सगळ्यात तू माझ्या सोबत होतीस.”
"Don't say thanks… दोस्त लोग thanks नहीं बोलते।.. Friend बनोगें मेरे ?”
त्याने हलकं स्माईल करत होकारार्थी मान हलवली. त्याने तिच्या हातात हात मिळवला. संकेत थोडा वेळ शांत होता, पण नंतर त्याच्या चेहऱ्यावर थोडं हसू उमटलं. त्याला जाणवलं, की या सगळ्या गोंधळातही कोणीतरी आहे, जी त्याच्यासोबत आहे – मनापासून, निस्वार्थपणे. एवढा वेळ त्यांचं बोलणं एका भिंतीमागून ऐकत असलेली पल्लवी त्यांच्यात वाढणारी मैत्री पाहून रागाने लालेलाल झाली होती. झालेल्या जळफळाटाने पल्लवी निघून गेली. राधा आणि संकेत कॉफी पिता पिता बोलू लागले.
“ मग कुठे राहतेस तू ?”
“ यही बंबई मै..”
“ पहिली गोष्ट.. बंबई नाही, मुंबई म्हणायचं.. तुमच्या बनारस ला वनारस बोललेलं चालेल का ? नाही ना ? तसंच मुंबईला बंबई बोललं तर नाही चालणार ! “ हसऱ्या चेहऱ्याने त्याने राधाची चूक दुरुस्त केली.
“हा वही.. म.. म... मबई…sorry मु.. मुंबई ! ये सही है ?”
हलकं हसून त्याने मान हलवली, “ मुंबई ही छोटीशी नाहीये.. मुंबईत नक्की कुठे राहतेस ?”
“ अरे वो पता है , दादर मै रहती हूं ! rent पे.. अभी-अभी आई हूं.. दो हफ्ते भी नहीं हुए… सब कुछ बहुत नया है। ट्रेन्स… ट्राफिक… लोग… सब कुछ बहुत तेज़ है। बनारस इससे बहुत अलग है ना… वहाँ वक़्त थमता है… यहाँ भागता है।”
संकेतने तिच्याकडे पाहून हलकं हसत म्हटलं, “म्हणजे तू अजून पूर्णपणे मुंबईकर झालेली नाहीस, हो ना?”
राधा मिश्कीलपणे म्हणाली होती, “मुंबईकर? अभी तो बस मुंबई में रहनेवाली लड़की हूं… डरती हूं कई बार इस शहर से… इतनी भीड़… इतनी आवाज़… कभी लगता है, खो ना जाऊं कहीं…”
संकेतचं चेहऱ्यावरचं हसू थोडंसं गंभीर झालं. तो म्हणाला, “तुला वाटतंय की हीच खरी मुंबई आहे… पण नाही. ही केवळ वरची पातळी आहे. तुला जशी मुंबई आत्ताच माहिती झालीये, तशी ही मुंबई नाही. इथे अजून एक मुंबई आहे – लोकांच्या चेहऱ्यांमागची. इथे आपले होणारे अनोळखी असतात… आणि अनोळखी असलेलेही कधीकधी आपले होऊन जातात.”
ती गप्प बसली. त्याचं बोलणं ऐकत राहिली. त्याच्या बोलण्यात अनुभवाचा, आत्मविश्वासाचा आणि संवेदनशीलतेचा सुर होता.
“पता है,” ती थोड्या वेळाने म्हणाली, “तुमसे मिलके लगा की शायद ये शहर इतना भी अनजाना नहीं है… शायद, यहाँ भी कोई ऐसा है जो समझता है…”
संकेत तिच्याकडे पाहून गालातल्या गालात हसला. त्याचं मन तिच्या शब्दांनी थोडं हलकं झालं होतं.दोघं काही क्षण न बोलता कॉफीचे उरलेले घोट संपवत बसले. बाहेरचं जग गडबडीत होतं, पण त्या टेबलावर एक शांत कोपरा तयार झाला होता — जिथे संवाद शब्दांत नव्हे, तर शांततेत घडत होते.कॉफी संपली. संकेतने घड्याळाकडे पाहिलं आणि म्हणाला, “चला, आता कामाला जाऊ या.” ती हसत त्याच्यासोबत उठली आणि दोघे वर्क स्पेसकडे गेले.
संध्याकाळची वेळ. संकेत ऑफिस सुटल्यावर नेहमीप्रमाणे त्याच्या बसस्टॉपवर आला. तो बसची वाट पाहत असताना काही वेळाने राधा सुद्धा आली. संकेतची नजर तिच्याकडे गेली.
“ hii.. “
“ hi .. अच्छा हुआ तुम मिल गए।”
“ काय झालं ? “
“ ये 102 नंबर की बस यहा मिलेगी क्या ?”
“ हा। येईल आता थोड्या वेळात ! मी पण त्याच बसने जातोय !”
“ ओहह.. Nice ! चलो तो फिर .. साथ जाते है !”
इतक्यात त्याची नजर बस स्टॉपच्या पलीकडे असलेल्या रोडकडे गेली. तिथे रस्त्यालगत पाणी पुरीच्या गाड्या होत्या. त्यातील एका गाडीपाशी त्याला त्याची बहिण शाश्वती एका मुलाबरोबर दिसली. तो मुलगा दिसायला अगदी टपोरी होता.. कलर केलेले गोल्डन केस, वाढलेली दाढी, fansy शर्ट.. फटकी वाटणारी जीन्स.. असा काहीसा त्याचा अवतार होता. अशा सोबत शाश्वतीला पाहून तो चमकला. त्या मुलाने शाश्वतीच्या कपाळावर किस केलं..
TO BE CONTINUED !
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा