मन हे तुझ्यात गुंतले !
Episode 05
लेखक – पूर्णानंद प्रमोद मेहेंदळे
SWA membership no. 51440
Contact no. 7507734527
Episode 05
लेखक – पूर्णानंद प्रमोद मेहेंदळे
SWA membership no. 51440
Contact no. 7507734527
( कथेचे सर्व हक्क लेखकाकडे आहेत. )
संकेत आणि राधा दोघंही स्क्रीनकडे बघत सुन्न झाले.
“ये तो साफ है… वही थी। उसी ने मेल किया।” राधा ठसक्याने म्हणाली.
“हे पुरावे आहेत! हे footage आपण बॉसला दाखवलं पाहिजे… आणि एकदा का हे समोर आलं, की सगळं स्पष्ट होईल.”
“अभी नहीं। पहले उससे बात करनी चाहिए।” राधाने थांबवत सांगितलं. “उसे मौका देना चाहिए… कि वो खुद बताए… क्यों किया ऐसा?”
“म्हणजे तू म्हणतेस की… तिला आपणच confront करावं?”
“हाँ। तुम अकेले नहीं जाओगे। मैं साथ में रहूँगी।”
संकेत काही क्षण विचारात पडला. मग म्हणाला, “ठीक आहे… तिला बोलावतो.”
त्याने तिच्या डेस्ककडे जाऊन सांगितलं – “पल्लवी, दोन मिनिटं वेळ आहे का? मी थोडं बोलायचंय.”
पल्लवी थोडी बावरली. “आता? पण...”
“फक्त दोन मिनिटं.”
ती अनिच्छेने कॉन्फरन्स रूममध्ये आली. राधा तिथे आधीच होती.
राधा थेट बोलली – “कल आप ऑफिस में थीं, लेकिन attendance log में आपका नाम नहीं है। और… CCTV फुटेज में आप 8:55 पर अंदर आती दिख रही हो… coffee कप लेकर।”
पल्लवी चक्रावली. “म्हणजे? तुम्ही माझ्यावर शंका घेताय? आणि ए राधा, मी तुझी सीनियर आहे, आजच अलीयेस ना ? पहिल्याच दिवशी मी घरी बसवेन तुला.. त्यामुळे चुरू चुरू बोलायचं नाही.”
तिला मध्ये तोडत संकेत म्हणाला, “ एक मिनिट पल्लवी, आम्हाला एक फुटेज सापडलंय…रात्री 10:42 वाजता माझ्या सिस्टीमवरून मेल पाठवला गेला… आणि तो मेल तूच पाठवला आहेस.”
ती काही क्षण गप्प राहिली… मग एकदम डोळ्यांत पाणी येऊन म्हणाली, “हो… मीच केलं. पण मी कुणाचा घात करायचा हेतूने नाही केलं. मी दबावाखाली होते.”
“कसला दबाव?” – संकेतचा आवाज थोडा उंच झाला.
“ मी एका व्यक्तीच्या सांगण्यावरून हे सगळं केलं.” - पल्लवी रडत बोलू लागली.
“ कोण होती ती व्यक्ती?” संकेतने पटकन विचारलं.
पल्लवी रडतच म्हणाली, “ती... ती आपल्या ऑफिसमधलीच आहे… पण मी नाव सांगू शकत नाही. मला अजूनही भीती वाटते… ती कुठल्याही थराला जाऊ शकते.”
संकेत तिच्याकडे थोडा वेळ पाहत राहिला, मग गंभीरपणे म्हणाला,
“हे असं अधांतरी सांगून काही उपयोग नाही पल्लवी. आपण सगळे इथे एकाच टीममध्ये काम करतो. जर खरोखर तुला कुणी ब्लॅकमेल केलं असेल, तर आपल्याला तिला समोर आणावंच लागेल.”
राधा शांतपणे म्हणाली, “पल्लवी… अगर तुम सच में दबाव में थीं, तो हम तुम्हारा साथ देंगे। लेकिन अगर तुम अब भी सब छुपाती रहोगी, तो तुम्हें भी उस गलती का हिस्सा माना जाएगा।”
ती व्यक्ती कोण होती हे पल्लवीने सांगितलं. नाव ऐकून संकेत चमकला. त्याला खरंच वाटत नव्हतं.
“ तू.. हे खरंच सांगतीयेस ?” संकेतने पल्लवीला विचारलं.
“ हो.. पुरावे आहेत माझ्याकडे.. हे बघ..” असं म्हणत तिने तिचा मोबाईल दाखवला. पुरावे पाहून संकेत, राधा आणि पल्लवी work space मध्ये आले. संकेत थोडा रागात होता. त्याची तळ पायाची आग मस्तकात गेली होती. त्याने बॉसला बोलावलं.
“बोल संकेत, तू नाही मग कोणी केलं?” - बॉसने केबिनमधून बाहेर येत मुद्द्याला हात घातला.
बॉसने विचारल्यावर संकेतने शांतपणे मोबाईलमधला स्क्रीन समोर धरला.
“हा पहा सर… हे चॅट्स आहेत. पल्लवीला गेल्या दोन आठवड्यांपासून एकाच व्यक्तीकडून वारंवार मेसेज येत होते… धमकीवजा. हे सगळं गौरवने पाठवलं आहे.” हे ऐकल्यावर सर्वांच्या नजरा गौरववर खिळल्या.
गौरव, जो शांत होता, एकदम दचकला, “काय… काय बोलतोस तू संकेत? मी… मी असं काही…”
संकेतने मध्येच थांबवलं, “थांब गौरव. आता काही लपवू नकोस. तुझं आणि पल्लवीचं नातं सगळ्यांसमोर आलंय. आणि हे बघ, या चॅटमध्ये स्पष्टपणे तू तिला त्या मेलसाठी फोर्स केलं आहेस.”
गौरव गोंधळलेला होता. चेहऱ्यावरचा रंग उडालेला, “माझं आणि पल्लवीचं... ते... ते माझं खासगी आयुष्य आहे! आणि मी काही तिला फोर्स केलं नाही! मला अडकवलं जातंय!”
राधा थोडी पुढे सरसावली, तिचा आवाज सौम्य पण ठाम होता – “गौरव… जो सच होता है, वो सामने आ ही जाता है। तुम्हें जो कहना है, कहो… लेकिन अगर तुमने पल्लवी को emotionally manipulate किया… तो ये गलत है।”
बॉसने कडक सुरात विचारलं, “गौरव, हे सगळं खरं आहे का?”

गौरवने एक क्षण डोळे मिटले, मग म्हणाला, “सर…पण… मी तिला असं काही करायला सांगितलं नव्हतं. मला अडकवलं जातंय!”
संकेत रागाने पुढे आला, “गौरव, मी तुझा मित्र होतो… अगदी जवळचा. पण तू माझा विश्वासघात केलास. पल्लवीच्या भावनांचा वापर केलास… आणि वरून माझ्या नावाने मेल पाठवलास, आपल्या कंपनीची info share केलीस.. आता कुणीही तुझं ऐकणार नाही!”
गौरवने हात जोडत सांगितलं, “संक... संकेत, please ऐक ना… एकदा फक्त माझं बोलणं ऐक.”
पण संकेतने त्याच्याकडे पाहिलंच नाही. बॉसनेही निघळवलेल्या सुरात फर्मान सोडलं, “गौरव, आता तुझं इथे काम संपलंय. HR team formalities पूर्ण करेल. You can leave now.”
गौरव जणू सुन्न झाला होता. काही क्षण तो तिथेच उभा राहिला… मग हळूहळू निघून गेला.बॉसने पल्लवीकडे पाहिलं. “पल्लवी, तू पण हे सगळं का लपवलंस? जर हे चॅट्स आधी दाखवले असतेस, तर...”
राधा शांतपणे मध्ये पडत म्हणाली “सर सॉरी बीच मै बोल रही हू… उसने डर के मारे नहीं बताया। लेकिन आज वो सबके सामने सच बोलने की हिम्मत कर पाई… इसका मतलब है कि उसे दूसरा मौका मिलना चाहिए।”बॉसने थोडा विचार करून मग मान डोलावली.
“ठीक आहे. पल्लवी, तू कामावर राहू शकतेस. पण पुढे असं काही झालं, तर report कर, हे लक्षात ठेव.” पल्लवीचे डोळे पाणावले होते. ती हलकेच राधाकडे बघून हसली. राधाने तिचा हात हलकासा पकडला.
“सब ठीक हो जाएगा… लेकिन अबसे डरना नहीं।”
“ बाय द वे सॉरी संकेत.. मी तुझ्यावर डाऊट घेतला. माझ्यासमोर तसं चित्र उभं राहिलं होतं. किंबहुना केलं होतं.. खरं सांगायचं तर मला गौरव सुद्धा वाटत नव्हता कि तो असं काही करेल असं..”
“ हर किसी कि मजबूरी होती है सर.. मजबूरी के चक्कर मै गलतिया हो जाती है। “
“ हा, लेकिन जुर्म नहीं होना चाहिए, गौरव ने जो किया वो गलती नहीं जुर्म है । “ - बॉस म्हणाला.
“ लेकिन सवाल ये है की गौरवने ऐसे किया क्यू ?”
“ enough! गुन्हा हा गुन्हा आहे.. तो का केला गेला मला नाही ऐकून घ्यायचं! “
“ लेकिन सर.. “
“ चलो, सब काम करो..”
सगळे निघून गेले.. “ मी थोडावेळ एकटा राहू का? “ संकेतने विचारलं. राधाने मान डोलावली. गौरवने असं का केलं हे मात्र आता तिच्या आणि त्याच्या पुढे कोडं होतं. न राहवून राधाने कामाला सुरुवात केली. पल्लवीने राधा निघून गेलेल्या वाटेकडे पाहत आत्ता पर्यंत वाहत असलेले खोटे अश्रु पुसले आणि ती गालातल्या गालात हसू लागली.

TO BE CONTINUED
WRITTEN BY POORNANAND MEHENDALE
WRITTEN BY POORNANAND MEHENDALE