Login

मन हे तुझ्यात गुंतले - भाग 3

राधा पल्लवी सोबत आत येते. बॉस वर्क स्पेस मध्ये सर्व employees कडे पाहत अस्वस्थपणे फेऱ्या मारत होता. सर्व empolyee आपापल्या डेस्कपाशी खाली मान घालून उभे होते. बॉसचे डोळे लालसर झालेले होते. त्याने सर्वांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलंय असं राधाला वाटत होतं. ऑफिसमध्ये संपूर्ण शांतता होती. तिला ह्या ऑफिस मध्ये पाऊल ठेवता क्षणी नकारात्मक ऊर्जा जाणवली होती. सर्व कर्मचाऱ्यांकडे निरखून पाहताना त्याची नजर पल्लवी सोबत उभ्या असलेल्या राधा कडे गेली.
मन हे तुझ्यात गुंतले !
Episode 03
लेखक – पूर्णानंद प्रमोद मेहेंदळे
SWA membership no. 51440
Contact no. 7507734527

( कथेचे सर्व हक्क लेखकाकडे आहेत. )

राधा पल्लवी सोबत आत येते. बॉस वर्क स्पेस मध्ये सर्व employees कडे पाहत अस्वस्थपणे फेऱ्या मारत होता. सर्व empolyee आपापल्या डेस्कपाशी खाली मान घालून उभे होते. बॉसचे डोळे लालसर झालेले होते. त्याने सर्वांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलंय असं राधाला वाटत होतं. ऑफिसमध्ये संपूर्ण शांतता होती. तिला ह्या ऑफिस मध्ये पाऊल ठेवता क्षणी नकारात्मक ऊर्जा जाणवली होती. सर्व कर्मचाऱ्यांकडे निरखून पाहताना त्याची नजर पल्लवी सोबत उभ्या असलेल्या राधा कडे गेली.
“Mrs. Pallavi, who is she?”- बॉस.
"Sir, this is Radha Vashisth. She has joined the Sales Department from today."- पल्लवीने उत्तर दिलं.
“ ओके” असं म्हणत तिच्यावरची रोखलेली नजर पुन्हा बाकीच्या employee कडे वळली.
“ काय झालं मिस्टर गौरव ? कुठाय तुमचा परम मित्र संकेत कानिटकर ?” बॉसने खाली मान घालून उभा असलेल्या गौरवकडे बघितलं.
“येतंच असेल सर..” तो पुढे काही बोलणार तोच संकेत येतो. सगळे असे तोंडं पाडून उभे असल्याचं पाहून तो चक्रावतो. बॉसची नजर त्याच्याकडे जाते आणि पुन्हा ते गुन्हेगारचा वास घेत फेऱ्या मारू लागले.
“ अँड फायनली, आपल्या आजच्या शो चा हीरो आलाय ! गुड मॉर्निंग संकेत सर !” बॉस उपहासाने म्हणाले. नक्कीच काहीतरी घडलंय हे संकेतला कळून चुकलं होतं, “ good morning sir..” ऑकवर्ड होत संकेत म्हणाला.
“सगळ्यांना इथे बोलावण्याचं कारण विचारायचं असेल तर सांगतो,” – बॉस म्हणतो, आता त्याचा आवाज ऑफिसभर घुमतोय, “आपल्या कंपनीच्या confidential data चा misuse झालाय.” बॉसचं हे बोलणं ऐकून सर्व कर्मचारी चक्रवतात.
“आपल्या नेक्स्ट टेंडरची सगळी information … आपल्या competitor कंपनीकडे पोहोचलीय. आणि केवळ काही टेक्निकल एररमुळे नाही… तर clear इंटेन्शनमुळे!” बॉसचा आवाज संपूर्ण वर्कस्पेस मध्ये घुमत होता.
“क्या सच मै किसीने..” राधा हळू आवाजात पल्लवीशी बोलू लागली, पल्लवीने तिला अडवलं, “ चूप, शांतिसे खडी रहे, मुझे भी अभी पता चला है।”
बॉस पुढे चालत पुढे पुढे जात होता, जणू तो एखाद्या थरारनाटकाचा सूत्रधार असावा. तो एका मुलीपाशी थांबला – “स्नेहा, तुम्ही त्या टेंडरच्या pitch साठी initial draft बनवलं होतं ना?”
स्नेहाने फक्त मान हलवली.
बॉस पुढे एका मुलाकडे मान वळवली, “अजय, तुम्ही presentation handle करत होता, right?”
आवंढा गिळत अजय म्हणाला,– “Yes sir... but I didn’t—”
“Relax,” – बॉस खवळलेल्या पण खूपच संयत सुरात म्हणतो – “You’re not the suspect. आम्ही सगळ्यांचे systems verify करत होतो. आणि... एका workstation वरून त्या external email वर unusual activity आढळली.” हे बोलताना संकेतच्या चेहऱ्यावर निर्माण झालेल्या आठ्या बॉस न्याहाळत होता.
“त्या computer वरून काही confidential documents, ज्या encrypted format मध्ये होत्या… त्या एका नेहरा Tech कंपनीच्या मेलवर forward झाल्या.“आता तुम्ही म्हणाल, हे सगळं शक्य तरी आहे का? पण हे घडलंय. आणि... त्या मेल ID वरून केलेले attachments… हे कोणत्या एका ‘S.Kan...' नावाने registered ID वरून पाठवले गेलेत.”
हे ऐकून गौरवच्या हातून मोबईल खाली पडला. थरथरत्या हाताने त्याने मोबाईल उचलला.
“ मिस्टर गौरव, काय झालं ? ok आहात का तुम्ही? “ - बॉसने खोटी काळजी करत विचारलं.
“ ह.. हो सर..” पडलेला मोबईल उचलत गौरव म्हणाला.
“बाय द वे, तुला काही सांगायचं आहे का संकेत?” बॉसची नजर पुन्हा संकेतवर रोखली गेली. बॉसला नक्की काय बोलायचंय हे त्याला कळलं नव्हतं.
“म्ह.. म्हणजे नक्की काय बोलायचंय सर ?” त्याने शंकेने विचारलं.
“मला काय म्हणायचंय हे तुला चांगलं कळतंय ! राइट ?”
“ एक मिनिट सर, सर… मी नाही केलं… मी—मी असं काही करणार नाही. तुम्हाला माझं काम माहितेय…” बॉस हात वर करतो. त्याला थांबवतो, “Enough. Defence नको. पुरावे बोलतात. आणि पुरावे… तुलाच दोषी ठरवतायत.” हे ऐकून राधाला संकेतवरचा आरोप पचत नाही, “ये झूठ है… ये शक्ल किसी गद्दार की नहीं हो सकती…” – ती नकळत बोलते. बॉस वळतो. राधाकडे पाहतो. त्याच्या चेहऱ्यावर पहिल्यांदाच काहीसा गोंधळ उमटतो, “Excuse me?”
राधा थेट त्याच्या डोळ्यात डोळे घालून म्हणते – “शक के आधार पर किसी को गुनहगार नहीं ठहराते सर। और शक भी उन्ही पर होता है जो... सबसे कमज़ोर दिखाई देते हैं। शायद आपने बहुत जल्दी फैसला कर लिया।” बॉस काही बोलणार तोच पल्लवी हळूच तिला बोलते, “ जस्ट शट अप राधा, first day आहे तुझा, नको काहीही माहीत नसताना ह्यात पडू! “ राधा तिचं काहीच ऐकून घेत नाही.
बॉस तिच्या जवळ येत विचारतो, “ ओहह ! ये बात है, एक बात बता.. अ… क्या नाम बताया आपने ?”
“ राधा !”
“ हा, तो राधा.. तुम इस आदमी को जानती हो?” - बॉस ने संकेतकडे बोट दाखवत विचारलं.
“ जानती तो नहीं ज्यादा, लेकिन चेहरा देखकर बता सकती हू.. ये आदमी कभी भी ऐसा काम कर नही सकता।” संकेत आणि तिची फक्त 10 मिनिटांची ओळख असताना ती मोठ्या आत्मविश्वासाने बोलत होती.
“ राधा, मी मागची 28 वर्ष काम करतोय.. ही कंपनी आणि माणसांना इतकी वर्ष सांभाळतोय, कोणाची..कधी.. केव्हा.. कशी.. नियत बदलेल ह्याचा भरवसा राहिला नाहीये.”
“ सॉरी सर मै ज्यादा बोल रही हो तो, लेकिन आप इतने यकीन के साथ कैसे बोल सकते हो की इसने कुछ किया है।”
“सबूत, सबूत है मेरे पास. पुरावे असल्याशिवाय मी कधीच कोणावरही असे आरोप करणार नाही..आणि बाय द वे.. तू काय ह्या संकेतचं वकीलपत्र घेतलंस का ? तसं असेल तरच बोल.. आणि दे पुरावे तो निर्दोष असल्याचे..”
“उसकी आँखे बता रही है की उसने कुछ नहीं किया। सबूत तो नहीं है मेरे पास लेकिन में साबित कर सकती हू की संकेत निर्दोष है।”
ओळख होऊन तासभर सुद्धा झाला नसेल आणि ही मुलगी आपली का बाजू घेतीये हेच संकेतला समजत नव्हतं. राधाचं असं बॉस समोर बेधडकपणे बोलणं बाकी सर्व कर्मचाऱ्यांना आगऊपणाचं वाटत होतं.. राधा मात्र बॉस समोर वेगळ्याच आत्मविश्वासाने उभी होती.
“ मराठी समझमें आती है ना ?”
“थोडी बहुत..” - राधा.
“आमच्या मराठीत ना एक म्हण आहे.. जसं दिसतं तसं नसतं.. चेहरा भोळा नि भानगडी सोळा.. शक्ल जितनी शरीफ दिखे वैसी होती नहीं है। भोली शक्ल वाले लोग ही क्राइम कर देते है।” - बॉस एका वेगळ्याच attitiude ने तिच्याशी बोलू लागतो.
“सही कहा सर आपने, जैसा दिखता है वैसा होता नहीं। क्या पता, आपके पास जो सबूत है वो झूठे निकले.”
“ काहीही बोल, मला खरंच तुझी हिम्मत आवडली.. माझ्याशी अशी निर्भीडपणे बोलणारी मुलगी मी पहिल्यांदाच पाहतोय. सो, मिस.. राधा.. सॉरी.. संकेत च्या advocate राधा.. तुम्ही प्रूफ करू शकाल का कि संकेत निर्दोष आहे ते!”
“ ते तर मी स्वत: करू शकतो सर स्वत:ला सिद्ध..” संकेत शांतपणे बोलला. संकेतचा आवाज ऐकून बॉसने त्याच्याकडे मान वळवली.
बॉसचे डोळे थेट संकेतवर स्थिरावले होते.
“स्वतःला सिद्ध करू शकतोस? म्हणजे नेमकं काय करणार आहेस तू?”
संकेतने सुस्कारा टाकला. त्याच्या चेहऱ्यावरचा गोंधळ आता हळूहळू स्थिरावत होता. त्याच्या डोळ्यांमध्ये शांतपणे काहीतरी सिद्ध करण्याची तयारी स्पष्ट दिसत होती.“माझ्या system वरून जर मेल गेलाच असेल… तर मला खात्री आहे की ती activity मी केलेली नाही. कुणीतरी माझं लॉगिन वापरलंय, किंवा काहीतरी deep सेटअप केलंय. मी आयटी डिपार्टमेंटसोबत काम करून हे सिद्ध करू शकतो.”
बॉसने नाकावरचा चष्मा खाली केला. “तुला माहितेय का याचा काय अर्थ होतो?”
“हो. म्हणजे, मला माझ्या colleague वर शंका घ्यावी लागेल… कदाचित माझ्या आजूबाजूच्या कुणावर. पण हे मला करावंच लागेल, कारण मी निर्दोष आहे.”
TO BE CONTINUED
WRITTEN BY POORNANAND MEHENDALE