Login

मन हे तुझ्यात गुंतले - भाग ४

बॉसने नाकावरचा चष्मा खाली केला. “तुला माहितेय का याचा काय अर्थ होतो?”“हो. म्हणजे, मला माझ्या colleague वर शंका घ्यावी लागेल… कदाचित माझ्या आजूबाजूच्या कुणावर. पण हे मला करावंच लागेल, कारण मी निर्दोष आहे.”राधा त्याच्याकडे बघत होती. आता तिच्या डोळ्यांत त्याच्याविषयी आदर होता.
मन हे तुझ्यात गुंतले !
Episode 04
लेखक – पूर्णानंद प्रमोद मेहेंदळे
SWA membership no. 51440
Contact no. 7507734527

( कथेचे सर्व हक्क लेखकाकडे आहेत. )

बॉसने नाकावरचा चष्मा खाली केला. “तुला माहितेय का याचा काय अर्थ होतो?”
“हो. म्हणजे, मला माझ्या colleague वर शंका घ्यावी लागेल… कदाचित माझ्या आजूबाजूच्या कुणावर. पण हे मला करावंच लागेल, कारण मी निर्दोष आहे.”
राधा त्याच्याकडे बघत होती. आता तिच्या डोळ्यांत त्याच्याविषयी आदर होता.
“ठीक आहे.” – बॉसने सांगितलं. “तुला 2 तास देतो. दोन तासात जर तू स्वत:ला सिद्ध करू शकला, तर चांगलं. नाहीतर… you’re fired. And if necessary, we’ll file a complaint against you under data breach act.”
संकेतने मान डोलावली. “डन, सर. मला चालेल.”
“चला, तोपर्यंत सगळ्यांनी कामाला लागा.. 2 तासांनी पुन्हा इथेच ह्या ठिकाणी भेटू !” असं म्हणत बॉस अस्वस्थपणे केबिन मध्ये निघून गेले. इतर कर्मचारी आपापल्या डेस्ककडे परत गेले, पण त्यांच्या चेहऱ्यावर अजूनही संशय, भीती स्पष्ट जाणवत होती — आता सर्वांचं सगळं लक्ष संकेतवर होतं.संकेत निघून जाण्याच्या तयारीत असताना, राधा त्याच्या मागे येते. “एक्सक्यूज मी...आप ठीक हो ” राधाने हलक्या आवाजात विचारलं. “थँक्स... हा, ठीक आहे मी.. मला एक सांग, आपली साधी 10 मिनिटांची ओळख, ह्या ओळखीत तुला कसं काय जाणवलं कि मी निर्दोष आहे ते ?” त्याने एवढा वेळ मनात साठवून ठेवलेला प्रश्न विचारला.
“ कभी कभी ना आदमी को पहलीबार देखके भी पता चलता है कि आदमी का स्वभाव कैसे हो सकता है, फेस रीडिंग ही समझ जावो !” ती हसऱ्या चेहऱ्याने बोलली.
“ हा. But खरंच thanks, आजकाल आपण ओळखीच्या लोकांवर सहज विश्वास ठेवू शकत नाही तू तर डायरेक्ट मी अनोळखी असताना विश्वास ठेवलास. बघ ना, एवढा माझा चांगला मित्र.. माझी बाजू घेऊन बॉसशी बोलला नाही.. कदाचित बॉस ओरडेल म्हणून असेल पण तुझा ऑफिस मध्ये पहिला दिवस असताना डायरेक्ट बॉसशी भिडलीस!”
“अब मेरी तारीफ करना बंद करोगे या नहीं ? मेरी तारीफ करते करते 2 घंटे यही निकलेंगे..”
“यार आता हे सगळं प्रूव्ह करणं तितकंच कठीण आहे. मी भलेही बोललो कि सिद्ध करू शकतो म्हणून पण पुरावे कसे शोधू समजत नाहीये” संकेत निराश होत म्हणाला.
राधा एकदम पुढे सरसावत म्हणाली, “We’ll do it. मुझे technically कुछ पता नहीं , लेकिन investigation मै help कर सकती हूं। मैं आपके साथ हूँ। आप सच हो , मैं आपके साथ खड़ी रहूँगी।”
“तू यामध्ये मला मदत करशील का?”
राधा थोडंसं हसत म्हणाली, “जब किसी पर यकीन हो जाए… तो मदद करने के लिए सोचना नहीं पड़ता। वैसे हमें सबसे पहले CCTV footage देखनी चाहिए… मेल भेजने के टाइम पर, कौन उस डेस्क के पास था।”
संकेत विचार करू लागला, त्याने कंपनीच्या manegment कडून cctv footage मागवून घेतलं. त्याने त्याचे मेल चेक केले, त्याने बघितलं कि रात्री 10:42 ला एक मेल त्याच्या सिस्टिम वरुन पाठवण्यात आला होता. एकीकडे राधा cctv footage तपासू लागली. साधारण रात्री साडे नऊ वाजल्यापासून कोणीतरी cctv बंद केला होता. ही नक्की काय भानगड आहे हेच तिला कळत नव्हतं. नक्कीच कोणीतरी संकेतला कोणीतरी ठरवून अडकवतंय हे मात्र नक्कीच जाणवलं होतं. पण कोण आणि का ?
राधा सतत स्क्रीनकडे डोळे लावून बसली होती. तिच्या कपाळावर आठ्या उमटल्या होत्या, “ये देखो… ये CCTV फुटेज अचानक ब्लँक कैसे हो गया 9:30 से? इसका मतलब किसी ने जानबूझकर फुटेज डिलीट किया है।” तिचा आवाज आता गंभीर झाला होता.
संकेतने तेच फुटेज पुन्हा पुन्हा बघितलं. साडे नऊ वाजेपर्यंत स्पष्टपणे सर्व हालचाली दिसत होत्या, पण नंतर अचानक स्क्रीन काळी दिसत होती. “म्हणजे यात कोणीतरी इन्व्हॉल्व्ड आहे हे नक्की… आणि त्याच्याकडे IT access असायला हवं. कारण सर्व्हरमध्ये लॉगीन न करता हे करणं अशक्य आहे.”
राधा काही क्षण विचारात पडली. “आपके ऑफिस में कौन है जो late तक रुकता है और जिसे सिस्टम एक्सेस है?”
जरा आठवून संकेतने उत्तर दिलं, “पल्लवी, आणि कधीमधी रोहन पण उशीरापर्यंत असतो… पण त्याच्याकडे सगळ्यांचं सिस्टम access नाही. पल्लवी एकमेव आहे जिच्याकडे सर्वजण आपलं सिस्टीम देतात updates साठी.”
राधाने लगेच विचारलं, “क्या पल्लवी की कल entry थी attendance log में?”
संकेत लगेच log check करू लागला. “नाही… हे बघ, तो दिसत नाही. म्हणजे ती officially ऑफिसमध्ये नव्हती.”
राधा भुवया उंचावून म्हणाली, “लेकिन CCTV फुटेज में वो 9 बजे के पहले तो दिख रही है”
संकेतने फुटेज स्क्रोल करून बघितलं…त्याला 8:55 ला पल्लवी एका coffee cup सोबत ऑफिसमध्ये शिरताना दिसत होती.
“ही तर खरी key आहे… पल्लवी इथे होती, पण attendance मध्ये तिचं नाव नाही, आणि त्याच्या वेळेनंतरच फुटेज गायब आहे.”
“मतलब पल्लवी कुछ छुपा रही है।” – राधा ठामपणे म्हणाली.
“पण पुरावा हवाय… आपण हे footage घेऊन काही करू शकत नाही, कारण हे incomplete आहे. आणि direct तिच्यावर आरोप केला तर ती पलटी मारेल.”
राधा थोडं विचार करून म्हणाली, “क्या आपके सिस्टम में कोई auto backup होता है? मतलब footage का बैकअप जो central server में जाता हो?”
संकेतने डोळे मोठे केले. “हो! एक mirror backup असतो जो admin server वर जातो… पण त्याचा access फक्त network head – शिंदेंकडे आहे. आणि आज तो leave वर आहे!”
राधा हसत म्हणाली, “क्या leave मतलब unreachable है क्या?”
संकेत थोडं हसत म्हणाला, “तोच तर प्रॉब्लेम आहे. ते साहेब कोकणात गेलेत… आणि फोन range मध्ये नाही.”
राधा काही क्षण गप्प झाली. मग ती एकदम म्हणाली, “एक आइडिया है… क्या आप शिंदे सर का system remotely access कर सकते हो?”
संकेत विचार करत म्हणाला, “ risk आहे… पण जर फक्त logs पाहण्यासाठी असेल तर probably शक्य होईल. माझ्याकडे एक emergency code आहे जो training time ला दिला होता. पण त्याचा वापर केला तर नंतर explain करावं लागेल.”
“अगर आप कुछ साबित करना चाहते हो, तो रिस्क तो लेना ही पड़ेगा। बाद में explain करने के लिए आप जिंदा नौकरी में तो रहो!”
हे ऐकून संकेत हसला.
“तू खरंच कमाल आहेस.”
तो लगेच त्याचा लॅपटॉप सुरू केला. त्याने emergency access वापरून admin server ला connect केलं. काही security prompts ओलांडल्यावर तो central storage पर्यंत पोहोचला.
त्याला एक फोल्डर सापडला – “CCTV_Backup_Logs”
तो थोडा वेळ access मिळेपर्यंत थांबला… आणि मग एक एक करून logs दिसू लागले.
“बघू, साडे नऊ ते अकरा या वेळेत काय फुटेज आहे का?”
… संकेतने उत्सुकतेने त्या फोल्डरमधील लिस्ट स्क्रोल केली. त्याला अचानक 9:32 PM नावाची एक फाईल दिसली – "CAM3_0932_DeletedCopy.mp4"
"राधा, बघ! इथे एक ‘डिलीटेड कॉपी’ नावाची फाईल आहे… म्हणजे हे फुटेज कुणीतरी delete केल्यावरही mirror backup मध्ये सुरक्षित राहिलंय!"
राधा उठून त्याच्या स्क्रीनपाशी आली. "Play करो!"
संकेतने ती फाईल cautiously प्ले केली… आणि दोघंही स्क्रीनकडे डोळे लावून बसले. काही सेकंदातच फुटेजमध्ये पल्लवी स्पष्टपणे दिसत होती – ती signals वाचत होती, ऑफिसमधील एक सिस्टम ऑन करत होती आणि मेल draft करत होती. तेही संकेतच्या डेस्कवरून.
फुटेजमध्ये timestamp होता – 10:42 PM.
"हेच ते वेळ आहे… हा तो मेल पाठवला गेला तोच क्षण," संकेत हळू आवाजात बोलला.
फुटेजमध्ये पल्लवीने मेल पाठवून सिस्टम बंद केली, आणि सावधपणे हातातले ग्लोव्हज एका छोट्या pouch मध्ये ठेवले. तिचा चेहरा थोडा तणावात दिसत होता, पण तिच्या हालचाली शांत, ठरवून केलेल्या होत्या.