मन घे भरारी

Man ghe bharari..

            मन घे भरारी                                                 आयुष्यात नेहमीचं तुमचा performes बेस्ट द्या तुमचे किती प्रेक्षक आहे हे महत्त्वाचे नाही.... एक प्रेक्षक असो व 10000 तुमचा performes हा बेस्ट हवा ... कारण तुम्हाला जे आवडते ते तुम्ही करता त्यात तुम्हाला आनंद वाटतो आजूबाजूला लोक नावे ठेवायला तयारच आहेत ...तुम्ही स्वतःला तयार करा तुमची लढाई तुम्हालाच जिकायची आहे... नावे ठेवणारे लोक असतात तरी कोण हो??? इथे तर प्रत्येक गोष्टीत चुका काढल्या जातात पण आपण नाउमेद होता कामा नये ... चुका काढल्या तर काढा मी मला जे वाटेल तेच करणार ....आणि हो चूक जर खरच योग्य असेल तर ती सुधारण्याचा प्रयत्न नक्की करणार..पण कोणी जाणून बुजून त्रास देण्याचा प्रयत्न केला तर त्याला सोडणार नाही...कारण नाण्याला दोन बाजू असतात काहीना माझे मत आवडेल काहीना आवडणार नाही... जगात व्यक्ती तितक्या प्रवत्ती.... हो पण मला जे आवडते ते इतरांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न नक्की करेल.. पक्षी जसे आभाळात मनमोकळे पणाने भरारी घेतात तशी मला माझ्या आयुष्यात खूप उंच भरारी घ्यायची आहे... नावे मोठे होईल तितका त्रास तर नक्की होणार कारण मोठेपणा हा मागवावा लागत नाही तो कमवावा लागतो त्यासाठी मान अपमान हे सहन करावे लागतील पण एका नव्या उमेदीने आकाशात उंच भरारी घेण्यासाठी मी सज्ज आहे ...